Dec 29, 2016

कालिकाई मनोकामना मासिकातील लेख

#दंगल

3 दिवसात #100कोटी असा आकडा ऐकायला मिळतोय #दंगल चित्रपटाचा! तोही फक्त भारतातील कलेक्शनचा!! #demonitisation मुळे एटिएम समोरच्या रांगा, बॅकेत रोज बघायला मिळणारी तुडुंब गर्दी या पार्श्वभूमीवर भारतीयांनी एक वेळ उपाशी राहून चित्रपट पाहिला आहे की काय असे वाटते. असे अर्थातच नाही.मग दोनच शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात. * #cashlesseconomy चा पहिला फायदा #dangal चित्रपटाला झाला असं म्हणता येईल. * किंवा मग सगळ्यांच्या 500-1000 च्या सगळ्या नोटा बदलून झाल्या असतील. What Say? - प्रज्ञा http://majheviewsanireviews.blogspot.in

#दिव्यांग

2016 च्या जानेवारी महिन्यापासून पंतप्रधान #मोदी सरांनी अपंगांना '#दिव्यांग' म्हणा असा आदेश दिला. अजुन तरी हा शब्द समाजात रुळलेला नाही, आपलासा झाला नाही. याचे कारण म्हणजे हा शब्द कितीही संस्कृताळलेला असला, वाचायला-म्हणायला चांगला वाटला, त्या मागचा हेतू चांगला असला तरी उगाचच एखाद्याचे र्दुर्दैवी अपंगत्व अधोरेखित केल्यासारखे वाटते. आपल्या आसपासच्या एखाद्याला मनातल्या मनात जरी 'दिव्यांग' म्हंटले तरी काळजाचा ठोका चुकतो. आपल्यातीलच तर आहेत की हे सगळे, फक्त काही शरीराने अधु असतात, काही बुध्दीने तर काही सदसद्विवेक बुद्धीने!! - प्रज्ञा

Nov 28, 2016

वृध्दाश्रम भेट

Great start of last weekend... Visited Smit Old Age Home to meet Naanis and Daadis there. They all too enjoyed playing with my Daughter 'Tejasvi'. वृध्दाश्रमाला एक धावती भेट. आपुलकीच्या, मायेच्या चार शब्दांसाठी आसुसलेल्या आजीआजोबांना आपण बाकी काही नाही तर निदान आपला थोडासा वेळ तर देऊच शकतो. आपल्या फक्त काही मिनिटांच्या भेटीमुळे तिथल्या आजीआजोबांचा आख्खा दिवस आणि तुमचं मन आनंदाने भरून जातं. - प्रज्ञा

वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असते असे म्हणतात. खरंतर या दोन्ही वयात आपल्याला जवळच्या, प्रेमाच्या माणसांची खुप गरज असते. दुर्दैवाने काही जण याच प्रेमाला पारखे होतात. आणि मग आश्रमात आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. अनाथाश्रम आणि वृध्दाश्रम ह्या दोन्ही गोष्टी आज महत्त्वाच्या सामाजिक गरजा आहेत. अनाथाश्रमातील लहानग्या चिमुरड्यांना आजीआजोबा, आईबाबांची गरज असते तर वृध्दाश्रमातील वृध्दांना नातवंडांची ओढ. समाजाची दोन अगदी विरुद्ध, extreme टोकं, एकमेकांची गरज असलेली. यातील एका टोकावर असलेल्या प्रत्येक पिल्लाला दुसर्‍या टोकावर आयुष्यात एकाकी राहणार्‍या आजीआजोबांचा सहवास लाभला तर किती बरं होईल ना. असं होणं कठीण, खुपच कठीण आहे, कदाचित अशक्य आहे पण झालंच तर "सुखी माणसाचा सदरा" या सगळ्याजणांनाच मिळेल. नाही का? What Say! - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

'झोंबी' चे आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

काही व्यक्ती गेल्यावर खरोखरच खूप दुःख होते. आपल्या विचारांवर, लेखनावर, विचारशैलीवर बराचसा परिणाम या अवलियांचा असतो. आज सकाळी लेखक (नटरंगचे जनक) आनंद यादव गेल्याची बातमी वाचली आणि असंच खुप वाईट वाटले. वाचनाची आवड निर्माण व्हायला कारणीभूत ठरलेली त्यांची पुस्तके डोळ्यासमोर तरळून गेली. त्यांचे लेखन वाचून 'एखादा माणूस इतकं हलाखीचे आयुष्य कसे काय जगतो.' असा विचार कोणाच्याही मनात येईल. यादवांच्या सर्व पुस्तकांत महत्वाचे ठरले ते त्यांचे 'झोंबी' हे आत्मचरित्रपर पुस्तक. काॅलेज मध्ये असताना या आत्मचरित्रातील एक लेख अभ्यासक्रमात होता. तो लेख इतका प्रचंड आवडला की संपूर्ण आत्मचरित्र वाचायचा मोह कसा आवरणार! इतकं मनस्वी, काळजाचा ठाव घेणारे पुस्तक एकदा वाचून पोट भरलं नाही. ते पुस्तक परत परत वाचून काढले. 'झोंबी' म्हणजे दारिद्र्याची आणि शिकण्यासाठी केलेली लढाई. या पुस्तकाला पुलंनी प्रस्तावना लिहिली आहे, त्याला त्यांनी समर्पक शीर्षक दिलंय - “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड”, बालकांड म्हणजे बालमनावर झालेले आघात! प्रस्तावनेत पु.ल. लिहितात की, "हे आनंद यादवांचं आत्मकथन आहे आणि जर हे असं असेल तर आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा. ... "! हे सगळं आठवलं सकाळी बातमी वाचल्यावर! ह्या माझ्या आवडत्या लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली.......! - प्रज्ञा

Nov 25, 2016

#thanksgiving words

Hi all, Thank you so much all for your valuable time given to read my blog. its #2000 plus viewers and still many more to go! #Thanks a lot. नमस्कार, सध्या जो #thanksgiving week सुरू आहे त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना खुप खुप धन्यवाद आणि आभार. वेळात वेळ काढून तुम्ही वाचलेल्या पोस्ट ची पोचपावती मला वेळोवेळी मिळते. असाच तुमचा प्रतिसाद मिळत राहो. धन्यवाद - प्रज्ञा

रिझल्ट

आपल्याकडच्या प्रेक्षकांना ना सतत काही ना काही, कोणाची ना कोणाची काळजी असतेच. जान्हवीच्या डिलिव्हरीची काळजी नाही का, आपण जवळपास वर्षभर तरी केली. आता 'खुलता कळी खुलेना' ही जुलै मध्ये चालू झालेली मालिका ज्या स्पीड ने सुरु आहे ते बघता आयडियली 7 महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या मोनिकाची डिलिव्हरी व्हायला अजून एखादं वर्ष तरी नक्कीच लागणार. मालिकेत इतर मातब्बर कलाकार असल्याने त्यांच्यासाठी प्रेक्षक समजून घेतीलच. Options च नाहीत. कारण इतर वाहिन्यांवरही काही फार मोठा उजेड पडला नाही. .. ... काही असो, पण निदान तो पर्यंत प्रेक्षकांना कपूरांच्या आय मीन खानांच्या करीनाचा रिझल्ट तरी कळेलच. - प्रज्ञा

Nov 21, 2016

प्रतिक्रिया

तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो ते जरूर कळवा. Awaiting for your comments and suggestions

Nov 20, 2016

गंमत जंमत

थोरातांची कमळा, मोहीत्यांची मंजुळा या नावांच्या धर्तीवर लवकरच नवीन हिंदी चित्रपटाची घोषणा - गुप्त्यांची सोनम! (ता.क. - फक्त नावातच काय ते साधर्म्य, बाकी का अतापता कुछ नही.) - प्रज्ञा http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 19, 2016

#demonetisation

आज नवीन काही लिहीणार नाही. 500-1000 च्या नोटांबद्दलचे बरेच माहितीपर आणि एन्टरटेनिंग (Yes, Very Much Entertaining) मेसेजेस फेसबुक, व्हाॅट्सपवर धडाधड येतायत. ते सगळे वाचायचे आहेत. - प्रज्ञा

Nov 18, 2016

विकत घेतले पैसे

#demonetisation Now Rs 2000 notes are being sold online on e bay. What a Day! Today People are Buying Money too. e bay ह्या ऑनलाईन शाॅपींग साईट ने 786 हे अंक असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा विकायला ठेवल्या आहेत. अजब दिवस आहेत ना! सध्या पैसेही विकत घेत आहेत लोक....! - प्रज्ञा Http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 17, 2016

#जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक #digitaldiwali2016.com

लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घेण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत  गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे. गुजरात्यांचा प्रवासातला डबा लग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती  खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत. मलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात भूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्‍या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत. भारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या  करता येईल. गुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा. गुजराती थाळी पारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल  असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते. त्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक  हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार,  याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो. एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग. थाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच. काठियावाडी गुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते. पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी. भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो.  भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे. याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम! भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्‍या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते. खिचीया पापड खिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा!  नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल. चूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं. छुंदा छुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार! मकर संक्रांत आणि उंधियो पौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती. वैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत  एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो. सढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले,  लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर  हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात. हा  पदार्थ  अधिक रुचकर करण्यासाठी  भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस!! असा हा रुचकर उंधियो तय्यार. नवरात्र आणि जिलेबी-फाफडा आपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा! जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच! गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच! लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या  व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. अशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.   काही पाककृती गुजराती कढी साहित्य २ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी कृती मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका. डाळ वडे साहित्य १ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग कृती सर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. गुजराती पात्रा साहित्य अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी  तेल कृती प्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर  त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा. प्रज्ञा पंडित

#खवय्येगिरी

#500-1000 चा विषय बदल म्हणून जरा न्यूज चॅनल सोडून इतर चॅनेल सर्फिंग केले. एका प्रतिथयश मराठी चॅनल वर एक अति लोकप्रिय रेसिपी शो सुरू होता. त्यात एका रेसिपी मध्ये ब्रेड स्लाईसवर केळ्याचे काप, स्ट्रॉबेरी (?) आणि बरंच काही ठेवून banana sandwich दाखवले. त्यांचे म्हणणे हा लहान मुलांसाठी पौष्टिक खाऊ आहे जो तुम्ही टिफीन मध्ये ही देऊ शकता. (विचार करा तुम्ही केळी-पाव डब्यात भरून दिले आहेत आणि 2-3 तासाने रिसेस मध्ये तुमच्या लेकराने डबा उघडल्यावर तो डबा किती आणि कसा दरवळेल!!). दुसर्‍या रेसिपी मध्ये मसाला लावुन तळलेली वांग्याची कापे साखरेच्या पाकात (o my god)घोळवून साईड ला डेकोरेशन म्हणून ऑलिव्ह आणि ब्रोकोली नामक भाज्या परतून ठेवून सर्व्ह केली गेली. घरी पाहुणे आल्यावर म्हणे एक नवीन पदार्थ म्हणून ही डिश तुम्ही बनवू शकता. ( hmm ) पाहुणे आल्यावर बनवा वगैरे ठिके, म्हणजे आम्ही बनवू देखील, पण ते खाल्यानंतर ते पाहुणे परत येतील की नाही याची गॅरंटी काय? What Say! - प्रज्ञा https://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 16, 2016

500-1000 #demonetisation #blackmoney

Defination of Sense of Humour किंवा किमान विनोद बुद्धीची परिभाषा नक्की काय आहे हो? नोटा चलनातुन बाद झाल्या आहेत पण त्या नोटाच आहेत ना? पैसेच आहेत ते! काही दिवसांपुर्वी धन,लक्ष्मी म्हणून पुजले होते ना ते पैसे?? सध्या विनोदाचा भाग म्हणून सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या त्या पुजलेल्या नोटांचा आता पायपुसणे, ओटा पुसणे असा वारंवार आक्षेपार्ह उल्लेख झालेले विनोद वाचले. असे टुकार विनोद लिहीणारया विनोदवीरांच्या So Called विनोदबुद्धीची कीव करावीशी वाटतेय मला. I am Speechless! - प्रज्ञा http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 12, 2016

#काहेदियापरदेस #zeemarathi #kahediyapardes #blackmoney

अगंssssssबाई, निशावहिनीने सासऱ्यांची फसवणूक करून विकलेल्या घराचे मिळालेले 70 लाख उशीत लपवले आहेत. आणि ते तर जुन्या 500-1000 च्याच नोटांचे आहेत. म ssss ग ?? आता?? सिरियलचा ट्रॅक #blackmoney दाखवण्यासाठी 'वक्त की मजबुरी' की 'वक्त के चलते' की काय म्हणतात तसं बदलणार ना? #काहेदियापरदेस #kahediyapardes #zeemarathi - प्रज्ञा Http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 11, 2016

#blackmoney हटाव मोहीम आणि support of #Bank

तुफान गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, घाबरलेल्या ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. याही परिस्थितीत काळजीपूर्वक, अतिशय जबाबदारीचे काम. जे करताना थोडीशी जरी चूक झाली की स्वतःच्याच अकाउंट मधुन पैसे वजा होण्याची भीती. अशा परिस्थितीत सतत, तासन तास, तेच तेच आणि तसेच काम करायचे तेही अचानक हक्काच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करून ! प्रत्येक ठिकाणच्या बँके समोरच्या लांबच लांब रांगा बँकेच्या शाखेत बसलेला तोच तेवढाच 10-20 जणांचा स्टाफ नेटाने हँडल करत आहे. शेवटी बँक कर्मचारी सुद्धा माणसंच आहेत. मान्य आहे की बँकेच्या स्टाफला नेहमी खासगी क्षेत्रा पेक्षा जास्त रजा मिळतात. इतर क्षेत्रात काम करणार्‍या 100 % जनतेच्या मनात हा छुपा राग कणभर तरी असतोच. पण तरी, तो राग सध्याच्या घडीला विसरा आणि समजून घ्या की बँक कर्मचारी आत्ता करत असलेले काम म्हणजेही देशसेवाच आहे. What Say? पटलं असेल तर जरूर शेअर करा. - प्रज्ञा

Nov 9, 2016

#500-1000 आणि उरलेला फराळ

आता करायचेच आहेत म्हटल्यावर करुच ना 500-1000 रुपये बॅकेत जमा. करुया, त्यात काय एवढे!  पण ते जरा दिवाळीच्या फराळातील उरलेले लाडु, शंकरपाळी, अनारसे पण 500-1000 बरोबर बॅकेत जमा करावेत असे फर्मान पण काढले असते तर बरं झालं असतं नाही? Whay Say! - प्रज्ञा Http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 8, 2016

500-1000 #demonetisation #blackmoney

आज नवीन काही लिहीणार नाही. 500-1000 च्या नोटांबद्दलचे बरेच माहितीपर आणि एन्टरटेनिंग (Yes, Very Much Entertaining) मेसेजेस फेसबुक, व्हाॅट्सपवर धडाधड येतायत. ते सगळे वाचायचे आहेत. - प्रज्ञा

Nov 7, 2016

माझे मत

स्वतः वर काॅन्फीडन्स असणे कधीही चांगले. परंतु काॅन्फीडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खुपच नाजुक सीमारेषा आहे. ती ओळखायला हवी ज्याची त्याने. ती रेषा ओलांडली की मग ती ओव्हर कॉन्फिडन्ट व्यक्ती आसपास असणेही नकोसे वाटते. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे अॅरोगन्स. तो तर अगदीच नकोसा. अॅरोगन्ट लोकांच्या संगतीत राहणे म्हणजे इतरांना एक प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा आहे. तुम्ही कसेही, कितीही चांगले वागा त्यांना तुमच्या प्रत्येक वागण्यात चुक दिसते, खोट दिसते. "आपण चांगले वागलो तर समोरचा चांगले वागेल" या टाईपच्या म्हणी, सुविचार वगैरे या अॅरोगन्ट आणि ओव्हर कॉन्फिडन्ट लोकांना अज्जिब्बात लागु होत नाहीत. भगवान बचाए ऐसे लोगोंसे! What Say! - प्रज्ञा

#व्हेंटिलेटर #प्रियांकाचोप्रा

#प्रियांकाचोप्राने #व्हेंटिलेटर चित्रपटात बाबांसाठी गायलेले गाणे खुप लोकप्रिय होतेय. फेसबुक, ट्विटर सर्वत्र या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या आधीही सलील कुलकर्णींचे 'दमलेल्या बाबांची कहाणी' ऐकुन कित्येकांचे काळीज पिळवटले. मलाही पर्सनली ही गाणी खुप आवडली. त्यातील भावना शब्दांत अलगद आणि अचूक गुंफली आहे. पण मला एकच प्रश्न पडलाय.... की प्रियांकाच्या ऐवजी हेच गाणे जर अन्नु मलिक किंवा बाबा सहगल किंवा अगदीच अनुप जलोटांनी किंवा इतर कोणत्याही लोकप्रिय गायकांनी गायले असते तरी एवढेच हिट झाले असते का? What Say! - प्रज्ञा

Nov 6, 2016

खवय्ये गिरी

जगात कितीही मतभेद असले तरी एका बाबतीत मात्र कोणाचेच दुमत होणार नाही की... जेवढी मज्जा प्लेटवर प्लेट, प्लेटवर प्लेट पाणीपुरी, शेवपुरी खाताना येते त्यापेक्षा जास्त मज्जा नंतर मिळणार्‍या मसाला पुरी खाताना येते. - प्रज्ञा Http:// majheviewsanireviews.blogspot.in

Nov 5, 2016

जुन्या मालिका

धुम, हेराफेरी, वेलकम या सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सिक्वेल येऊन गेले. येत्या काही दिवसांत राॅकस्टार, फोर्स हे चित्रपटही आपापले पार्ट 2 घेऊन येतायत. आधीच्या पुण्याईच्या बळावर (कसेही असले तरी) हे सिक्वेल देखील हिट होतील. असो! मुद्दा हा आहे की चित्रपटांप्रमाणेच मालिकांचेही सिक्वेल आले तर किती बरं होईल! म्हणजे बघा, ऑफिस ऑफिस, ये जो है जिंदगी, देख भाई देख, जबान संभालके, श्रीमान श्रीमती, मराठी मध्ये गोट्या, संस्कार आणि अशा खूप छान छान मालिका....! या मालिकांचेही सिक्वेल आले तर सध्याचा दूरदर्शन जरा तरी बघणीय म्हणजेच दर्शनीय होईल. What Say! - प्रज्ञा Http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 4, 2016

#Selfesteem #Selfrespect अधिकार आणि कर्तव्य

अनाठायी, उगीचच, जातायेता हक्क आणि अधिकार गाजवणारी मंडळी नेहमीच प्रत्येकाच्या अवतीभवती असतात. काही ना काही कारणास्तव आपण त्यांना ते हक्क गाजवूही देतो. पण योग्य वेळी - Somewhere Down The Line - त्या मंडळींना ही समज द्यायला हवी की हक्क आणि अधिकार इज इक्वल टू ऑर लेस दॅन ( = किंवा < ) कर्तव्य आणि जबाबदारी. कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत असाल तर हक्क आणि अधिकार ओघाने येतीलच तुमच्याकडे. पण तसं जर होत नसेल तर 'Stay in Your Limits' असे ठणकावून सांगण्याची सवय अंगात भिनवायला हवी. Learn #Selfrespect #Selfesteem - प्रज्ञा Http://majheviewsanireviews.blogspot.in

Nov 2, 2016

मालिका आणि महिला

प्रत्येक वाहिनीवरील जवळजवळ सर्वच मालिका स्त्री प्रधान असल्या तरी त्यात आजच्या काळातील स्त्रीचे वास्तवदर्शी चित्र फार कमी प्रमाणात दाखवले जाते. त्यातील स्त्री अगदी सौजन्याचा कळस तरी असते किंवा खलनायिका तरी असते! दर्शक महिलावर्ग या मालिका पाहताना त्यातील व्यक्तिरेखांशी स्वतःला रिलेट करतात. त्यात दाखवल्या जाणार्‍या परिस्थितीची त्या आपल्या घरात सांगड घालतात. परंतू मालिकांमधले विचार घरात रुजवताना वास्तव मात्र निराळे असल्यामुळे घरगुती नात्यांमधे दुरावा निर्माण होतो. माझ्या लहानपणी आठवणीतील मालिकांमध्ये एक होती ‘उडान’, आणि दुसरी होती ‘रजनी.’ या मालिकांमधील व्यक्तीरेखांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक मुलीला ‘उडान’मधली हुशार व कर्तृत्ववान कविता आणि 'रजनी'सारखं खंबीर आणि सडेतोड व्हायचं होतं . त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या तुलसी किंवा पार्वती व्हायचं होतं. आजच्या घडीला समाजातील वाईट चालीरीती व दुष्ट प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी गरज आहे स्त्रीला शारीरिक व मानसिक रित्या सशक्त व धीट बनवण्याची! टीव्ही हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच टिव्हीची जबाबदारीही मोठी!  चांगली किंवा वाईट अशा व्यक्तीरेखा रंगवण्यापेक्षा आजच्या काळात गरज आहे ती खंबीर, सशक्त, सारासार विचार करणारी, सदसद्विवेक बुद्धीची व न्यायासाठी झगडणारी परंतु त्याचबरोबर आपल्या घराचे घरपण आणि नाती जपणाऱ्या नायिकेची!

Nov 1, 2016

#aedilhaimushkil #एदिलहैमुष्कील

आयुष्यात कधी ना कधी असा दिवस येतोच की त्या वेळी आपल्याला काहीच काम नसते. खुपच कंटाळवाणा असा एखादा दिवस येतो. अशा वेळी #एदिलहैमुष्कील नावाचा चित्रपट बघा. मग तुम्ही अजुन कंटाळाल! आधीच कंटाळलेले असल्यामुळे तुम्हाला मग फार फरक पडणार नाही. सारांश - म्हणजे Bottom Line- काय आहे तर... Yefilmhaimushkil साॅरी साॅरी #aedilhaimushkil बघितला न बघितला का ssssssss ही बिघडणार नाही. - प्रज्ञा

मुलींची सुरक्षितता

मुंबईतील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर विनयभंग केल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. दिवसेंदिवस वाढतच जाणार्‍या या विकृत घटना मन विषण्ण करणार्‍या आहेत.  शाळेसारखे पवित्र विद्यास्थानही मुलींसाठी सुरक्षित नाही हे एक भयाण वास्तव समोर आले. या गुन्हेगारांवर तत्परतेने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच याबाबत नुकत्याच हायकोर्टाने दिलेल्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर खाजगी व सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे आणि शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी. शाळेतील शिस्त व सुरक्षेसंबंधी नियमावली अधिक कडक करून शाळासंबंधित अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांवर बंधनकारक करण्यात यावी.

Oct 29, 2016

#आकाशकंदील

पतंजली ब्रॅण्ड कडून आकाशकंदील बनवायचे राहून गेले वाटतं! विसरले असतील May Be!

#Team India

आज भारत-न्यूझीलंडमधील शेवटच्या मॅच मध्ये विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर आपला धोनी दादा आणि बाकी टीम इंडिया मधील सगळ्या खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव झळकतेय हे बघून जाम म्हणजे जाम म्हणजे जाम छान वाटले. आज, त्यांची आई नसलेल्या आईचाही ऊर अभिमानाने भरून आला असणार! God Bless You Team India! http://majheviewsanireviews.blogspot.in

शुभ दीपावली

देश विदेशातील माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.

चायनीज बंदी

जिकडेतिकडे चायनीज वस्तूं, खेळणी, फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रचार मेसेजेस द्वारे जोरदारपणे सुरू आहे. I Totally Agree With it. पण.. चायनीज खाद्य पदार्थ खाऊ नयेत असा आतापर्यंत एकही मेसेज आलेला नाही. का बरं!

Oct 28, 2016

चायनीज बंदी

जिकडेतिकडे चायनीज वस्तूं, खेळणी, फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रचार मेसेजेस द्वारे जोरदारपणे सुरू आहे. I Totally Agree With it. पण.. चायनीज खाद्य पदार्थ खाऊ नयेत असा आतापर्यंत एकही मेसेज आलेला नाही. का बरं!

Oct 27, 2016

गुजराती खाद्य संस्कृती

लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घझाला आहे. ण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत  गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे. गुजरात्यांचा प्रवासातला डबा लग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती  खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत. मलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात भूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्‍या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत. भारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या  करता येईल. गुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा. गुजराती थाळी पारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल  असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते. त्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक  हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार,  याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो. एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग. थाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच. काठियावाडी गुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते. पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी. भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो.  भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे. याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम! भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्‍या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते. खिचीया पापड खिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा!  नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल. चूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं. छुंदा छुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार! मकर संक्रांत आणि उंधियो पौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती. वैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत  एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो. सढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले,  लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर  हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात. हा  पदार्थ  अधिक रुचकर करण्यासाठी  भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस!! असा हा रुचकर उंधियो तय्यार. नवरात्र आणि जिलेबी-फाफडा आपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा! जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच! गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच! लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या  व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. अशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.   काही पाककृती गुजराती कढी साहित्य २ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी कृती मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका. डाळ वडे साहित्य १ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग कृती सर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. गुजराती पात्रा साहित्य अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी  तेल कृती प्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर  त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा. प्रज्ञा पंडित - वरील लेख #डिजीटलदिवाळी2016 #जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक या दिवाळी अंकात प्रकाशित झ

#digitaldiwali2016.com #डिजीटलदिवाळी2016 #जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक

लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घेण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत  गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे. गुजरात्यांचा प्रवासातला डबा लग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती  खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत. मलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात भूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्‍या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत. भारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या  करता येईल. गुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा. गुजराती थाळी पारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल  असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते. त्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक  हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार,  याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो. एवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग. थाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच. काठियावाडी गुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते. पंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी. भाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो.  भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे. याच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम! भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्‍या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते. खिचीया पापड खिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा!  नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल. चूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं. छुंदा छुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार! मकर संक्रांत आणि उंधियो पौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती. वैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत  एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो. सढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले,  लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर  हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात. हा  पदार्थ  अधिक रुचकर करण्यासाठी  भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस!! असा हा रुचकर उंधियो तय्यार. नवरात्र आणि जिलेबी-फाफडा आपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा! जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच! गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच! लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या  व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. अशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.   काही पाककृती गुजराती कढी साहित्य २ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी कृती मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका. डाळ वडे साहित्य १ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग कृती सर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. गुजराती पात्रा साहित्य अळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी  तेल कृती प्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर  त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा. प्रज्ञा पंडित

अमे गुजराती

https://digitaldiwali2016.com/ Read My Article 'अमे गुजराती' in Diwali Magazine. डिजिटल दिवाळी अंक 2016 मधील 'अमे गुजराती' हा माझा गुजराती खाद्य संस्कृती वरील लेख वाचा आणि अभिप्राय जरूर कळवा. #डिजीटलदिवाळी2016 #जागतिकखाद्यसंस्कृतीविशेषांक

Oct 18, 2016

हे देवा

रियल लाईफ मधुन थोडासा विरंगुळा म्हणुन फेसबुक, वॉट्सअपवर फिरकावं म्हटलं की इकडे ही जातपातीवर, धर्म भेदावर कधी शालजोडीतले  तर कधी स्पष्टपणे टिप्पणी करत राहणारे पाहायला मिळतात.  बाहेर ही तेच,इथे ही तेच..सध्या सगळीकडं हेच..! खरं तर आता बाहेर जेवढा जातीयवाद,द्वेष,मत्सर जाणवतो त्याहुन तो इतका जास्त सोशल मिडियात दिसतो की 'यह किधर रे आगया मै द्येवा' असं वाटण्याचेच चान्सेस जास्त! - Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 17, 2016

अभिप्राय

मित्र मैत्रिणींनो, माझ्या पोस्टवरचे तुमचे मत, तुमचे विचार आणि प्रतिक्रिया जरूर कळवत रहा. - प्रज्ञा पंडित

Oct 15, 2016

#वेळ

एक फिलॉसॉफिकल गोष्ट - आयुष्यात खूप सारा वेळ हा हेडसेट चा गुंता सोडवण्यात जातो.

Oct 14, 2016

# दिवाळी आली

दिवाळीची आठवण करून देण्यासाठी 'उठा उठा,दिवाळी आली,मोतीस्नानाची वेळ झाली'! या जाहिरातींचे प्रक्षेपण परवापासूनच टीव्हीवर सुरु झालंय. SO.... आता सर्वानीच दिवाळीच्या तयारीला सुरुवात करावी. - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 13, 2016

सासर माहेर

लेखक चंद्रशेखर गोखलेंची एक गोष्ट वाचनात आली. एका तालेवार घराण्यातील लाडात वाढलेल्या लेकीचे - 'मेघनाचे' लग्न झाले. टुमदार आणि सधन अशा माहेरी जन्माला आलेल्या मेघनाचे सासर मात्र त्या मानाने मध्यमवर्गीय, सर्वसामान्य आर्थिक स्थितीतील होते. लग्नानंतर काही वर्षे उलटतात. दरम्यान माहेरी तिच्या भावांची खुप प्रगती होते, श्रीमंती ओसंडून वहाते. जुन्या चिरेबंदी वाड्याच्या जागी आधुनिक टुमदार बंगला येतो. बंगल्याच्या आवारातच दोन्ही भावांची ऑफिसेस समाविष्ट होतात.   बंगल्यातही आईवडिल, भाऊ, त्यांची मुले प्रत्येकाला स्वतंत्र रुम्स त्यांच्या आवडीनुसार तयार केल्या जातात.  वास्तुशांतीला जेव्हा मेघना माहेरी येते तेव्हा हे सगळे वैभव पाहुन खुप आनंदून जाते. मग सहजपणे भावाला विचारते की "अरे दादा,  माझी रुम कुठे आहे? " त्यावर दादा म्हणतो की अगं तुझ्यासाठी कशाला हवी स्पेशल रूम?   'गेस्ट रूम' आहे,  'स्टडी रूम' आहे,  तिथे रहा की! तसेही तु कुठे रोज असतेस इथे!" इथपर्यंतच ही गोष्ट वाचताना घशात काहीतरी अडकल्या सारखे वाटून, मनात कालवाकालव होते की नाही! बर्‍याच घरात जवळपास हीच परिस्थिती असते. लग्नानंतर मुली मनात सासर माहेर दोन्ही मनात जपतात. वेळोवेळी, प्रसंगा दाखल माहेरचे कौतुक करत असतात, प्रशंसा करतात, तुलना करत असतात. परंतु माहेरचे लोक मात्र लेक आता परकी झाली, दुसर्‍याची झाली हे गृहीत धरूनच आयुष्य जगायला लागतात. खरं तर आताच्या काळात मुलीची घरातील जागा कायम अबाधित असते हा विचार घराघरात रुजायला हवा. असो. निदान आपण तरी आपले विचार आता पासूनच ठाम करूया. घर लहान असो वा मोठे, आपल्या लेकीबाळींना कायम त्यांची हक्काची आणि मायेची जागा ठेवूया. - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 11, 2016

#happy dasara

HBD (Happy birthday) किंवा KIT (Keep in touch) किंवा TY ( Thank you) अशा महत्वाच्या आणि भावनिक मुल्ये असणाऱ्या शब्दांचेही निव्वळ वेळ वाचवण्याच्या हेतूने जे शॉर्टफॉर्मस लिहीतात त्यांचा असे शॉर्टफॉर्म लिहुन किती बरं वेळ वाचत असेल आणि त्या 1 सेकंदाच्या वाचवलेल्या वेळात लोक कोणती इतर महत्वाची कामे पूर्ण करत असतील ह्याचे नेहमीच कुतूहल वाटते. असो! म्हणून म्हटलं आपणही ट्राय करून बघू! HDTAOY अर्थात Happy Dasara To All Of You! - प्रज्ञा Https://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 10, 2016

दसरा, नाही आनंदा तोटा

आता पासूनच तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस यायला सुरुवात झाली असेल. यात 90 % मेसेजेस काॅपी पेस्टed असणार आहेत. काही to do list चा भाग म्हणून तर काही आद्य कर्तव्य पार पाडायचे आहे असे समजून! असो! पण उरलेले 10% मेसेजेस मात्र कळकळीने, आपुलकीने, जिव्हाळ्याने पाठवलेले असतील. माझ्या कडुन ही तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा, अगदी मनापासून! खुप खुप आनंदोत्सव घेऊन येवो हा सण तुमच्या आयुष्यात. - प्रज्ञा

परत एकदा बरं का #काहे दिया परदेस

लग्नमंडपात नटूनथटून आलेल्या नवरी अन तिच्या घरच्या मंडळींवर नवरदेवाच्या अंघोळीचे पाणी 'शादी की रस्म' म्हणत बनारसी वरमाई अगदी उन्मादाने गंगाजल उडविल्याच्या थाटात शिंपडते व वधूकडील महाराष्ट्रीय मंडळी अनिच्छेने ते सहन करतात.!! 'काहे दिया परदेस' या झी मराठीवरील मालिकेतील हा प्रसंग. असतं का असे काही? असो .. असं असेलही !

झाडे लावा झाडे जगवा

मध्यंतरी आपल्या महाराष्ट्र सरकारने दोन कोटी झाडं लावायची - म्हणजेच दोन कोटी झाडांची रोपं लावायची भीषण भीष्मप्रतिज्ञा केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. 1.आता आपलं काही खरं नाही या भीतीपोटी तर महाराष्ट्राभर इतका प्रचंड पाउस झाला नसेल ना ? 2.ती रोपे आता सद्य स्थितीत जिवंत आहेत का? 3.त्या रोपांची व्यक्तीशः जबाबदारी कोणी घेत आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे - 4.ती दोन कोटी झाडे वाढायला कमीतकमी पंधरा-वीस वर्ष तरी नक्कीच लागणार, तो पर्यंत रस्ता रुंदीकरण, नवीन सदनिका निर्मिती, (अर्थात new building construction) होळी, इत्यादी इत्यादी इत्यादि कारणांमुळे किंवा कारणासाठी ती झाडे त्या पंधरा-वीस वर्षात पाडली जाणार नाहीत याची गॅरंटी म्हणजे हमी कोण देणार? Httpa://majheviewsanireviews.blogspot.in .

Oct 7, 2016

https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

Hi All. तुम्ही माझ्या ऑफिशियल फेसबुक पेज वर संपर्कात राहू शकता. You all are invited to read my quotes and thoughts on my fb page https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

मनःपूर्वक धन्यवाद

Thank you so much All for your amazing response. Keep in touch. Your suggestions, feedback and comments are always welcome. - Pradnya

Oct 6, 2016

#काहे दिया परदेस

प्रिय गौरी, आईवडिलांना कर्ज काढायला लावुन लग्न करू नकोस. एका मध्यमवर्गीय घरातील पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी आहेस तू. स्वतःच्या लग्नासाठी बाबांना नको लाखोंचं कर्ज काढायला लावुस! प्रेमविवाह करायचा आहे तर स्वतःच्या हिमतीवर कर. ठामपणे मत मांड स्वत:चं की मी लग्नासाठी एवढा खर्च करण्याच्या विरूद्ध आहे आणि माझ्या वडीलांना कर्जबाजारी करून तर नाहीच नाही. अगं एकदा सांगून तर बघ तुझं मत! कुठे वृध्द आईवडिलांना या वयात EMI फेडायला लावतेस? तुझी मालिका बघणाऱ्या आणि तुला आदर्श मानणाऱ्या खुप लेकीबाळी आहेत महाराष्ट्रात. त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल तुझ्याकडून. Be Sensible. आणि हो, त्याच्या नावाचा उच्चार 'शिव' असा आहे, तु 'शीव'-'शीव' असा उच्चार करतेयस. तिथेही जरा लक्ष दे. #काहे दिया परदेस - (तुझ्याच सारखी एक मध्यमवर्गीय मुलगी) प्रज्ञा

Oct 5, 2016

आनंदाचे डोही

गरजू आणि मदतीची अपेक्षा असणार्‍या अनोळखी व्यक्तीची त्याच्या कळत नकळतपणे काळजी घेण्यात, सेवा करण्यात किंवा त्याला आनंद देण्यात एक वेगळीच मजा असते.. मला यातुन काय मिळतं विचाराल तर अगदी 'पोटभर आनंद' मिळतो.. बर्‍याचदा आपल्या मदतीच्या बदल्यात समोरच्या कडून काहीच मिळणार नाही हे ठाऊक असतं.. ती व्यक्ती पुन्हा कधी भेटेल की नाही हे ही ठाऊक नसतं.. पण तरीही त्याला निस्वार्थीपणे मदत केली किंवा कुठल्या ना कुठल्या रुपात आनंद दिला.. तर यातुन आपल्याला मिळणारं समाधान हे, 'लहानपणी कुणीतरी आपल्या हातावर अचानक भरपुर चॉकलेट्स ठेवल्यानंतर जसं वाटायचं ना ...तस असतं!' अर्थात हे सगळं करताना जरासं भान आणि थोडी जागरुकताही गरजेची बरं का! कारण कोणीतरी कुठेतरी म्हंटलच आहे 'ये दुनिया जीतनी अच्छी है ना.. उससे कईsssss ज्यादा बुरी भी है...!!' Http://majheviewsanireviews.blogspot.in

Oct 4, 2016

शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

नवरात्रीच्या पहिल्या माळेपासुन येणारा 'शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा........." हा मेसेज अजुन येतोच आहे हो... आता तर देवी ही म्हणत असेल... "भक्तांनो, आता पुरे करा की 'कॉपी-पेस्ट' केलेल्या शुभेच्छा....." "आलेय ना मी..!!"

सर्जिकल स्टाईक

" #सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय रे भाऊ?" असा प्रश्न आपल्या पैकी बर्‍याच जणांना पडला असेल! त्याचे हे स्पष्टीकरण - एखादी विशिष्ट माहिती मिळाल्यावर त्यापुरती करावयाची कारवाई म्हणजे #सर्जिकल स्ट्राईक! उदा. एका ठिकाणची शत्रूची एक चौकी उडवायची असेल तर फक्त ती चौकी उडवण्याची कारवाई म्हणजे सर्जिकल स्टाईक. त्याच्या आजुबाजूला काय आहे, कोण आहे, कोण राहतात याच्याशी या कारवाईचा संबंध नसतो. सोप्या शब्दात उदाहरण द्यायचे झाले तर - बायपास करायची असेल तर त्यापुरतीच शरीराची कापाकापी करतात, तसे. बायपास करताना जसे याला अजून काही रोग आहेत का बरे शरीरात...! असतील तर तेही पाहून घेऊ ...असे न करता बायपास नीट करण्यावरच फक्त लक्ष दिले जाते, तसे. - इति कर्नल श्री. का. खाजगीवाले

पासवर्ड

पासवर्ड बदलणे आणि तो लक्षात ठेवणे हे खूपच जिकीरीचे काम आहे की नाही!? उदाहरणार्थ - Step 1 - Please enter your new password: "imissu" Step 2 - Sorry, the password must be more than 8 characters. " imissyou" Step 3 - Sorry, the password must contain 1 numerical character. ' imissyou 10' Step 4- Sorry, the password cannot have blank spaces. . ' imissyou10' Step 5 - Sorry, the password should have one upper case alphabet ' Imissyou10' Step 6 - Sorry, the password should have one special character. ( e.g !@$/&^ ) ' Imissyou&10' Step 7 - *SORRY, THAT PASSWORD IS ALREADY USED* --------------------------------------------------

Oct 3, 2016

घालीन लोटांगण

आमच्याकडे गणेशोत्सव आणि नवरात्र दोन्ही कुळधर्म भक्तिभावाने साजरे केले जातात. या कुळधर्मात मला प्रचंड आवडतात त्या आरत्या..... आरतीच्या ठराविक वेळी घराघरांत निरनिराळ्या आरत्यांचे सुर ऐकु आले की मनातल्या मनात अगदी नास्तिक माणूस देखील त्यातील दोन शब्द म्हणुन जातो. गाता येवो न येवो, पोटतिडकीने, हातात ताम्हण, झांज, अगदी ताटली चमचा जे असेल ते वाजवत आरती म्हणणे हीच तर आपली खरी संस्कृती आहे. काही लोक मला खरच खूप ग्रेट वाटतात. . कारण वर्षभरात एकदाही एकही आरत्या न म्हणता देखील यांना त्या अगदी पहिल्या दिवसांपासून 100% आरत्या पाठ असतात. पण काही जणांना ( माझ्या सारखे ) 'त्रिभुवनी भुवनी पाहता' आधी की 'प्रसन्न वदने प्रसन्न होसी' आधी हे कन्फ्युजन दसऱ्यापर्यंत कायम असते.  मग नवरात्रीची दहा कडव्यांची आरती पाठ करणे म्हणजे 29 चा पाढा पाठ करण्या इतके अवघड नव्हे तर अशक्य काम! बर्‍याच घरात आरती म्हणण्याची पध्दत, चाल वेगवेगळी असते. अशा घरात आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो किंवा आपल्याकडे कोणी आले, की आरती म्हणताना धमाल गोंधळ उडतो. उदाहरणार्थ जयदेव जयदेव जय श्री शंकरा नंतर काही जण स्वामी शंकरा म्हणत असतानाच काही जण भावार्थी उवाळू पर्यंत पोहोचलेले असतात.  किंवा अच्युतम केशवम 'स्लो' म्हणायचे की 'फास्ट' हे ही ठरलेले नसल्याने अजून एक गोड गोंधळ. अशीच मजा "पंढरपुरी आहेsssss" वगैरे ओळ म्हणताना येते. काही घरांमध्ये मात्र आरत्या करायला महा कंटाळा करणारी माणसे पाहायला मिळतात. आज नको उद्या मोठी आरती करू, आज दोनच आरत्या करू चारच आरत्या करू असा हिशोब करणारे लोक बघितले की फक्त देखावा करण्यासाठी एवढे तरी का करतायत हे लोक असे वाटते. बरोबर की नाही? बाकी' पिढ्या बदलल्या, काळ बदलला,  तरी 'घालीन लोटांगण' म्हणण्या साठी आतुरतेने वाट बघणारी व नंतर प्रसाद वाटायला तत्परतेने तयार असणारी घराघरातील किंवा सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणची लहान मुले पाहीली की खुप खुप छान वाटते. आपल्या लहानपणचा काळ थांबल्या सारखा वाटतो. आपणही हेच करत होतो की! असं वाटतं आणि मन भरून येतं. बरोबर ना? .

Oct 1, 2016

मानधन

मध्यंतरी 'पर्यवेक्षकांना देण्यात येणारे मानधन हा एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला गेला. दरवर्षी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना वर्षानुवर्षे निव्वळ रूपये पंचवीस इतके कमी मानधन दिले जाते. हे पंचवीस रुपये तरी का घ्यावे असा प्रश्न पर्यवेक्षकांना पडतो. मुलांचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचे पर्यवेक्षण करणे हे अतिशय महत्वाचे व जबाबदारीचे काम पर्यवेक्षक करत असतात. त्यामुळे या कामाला
न्यायिक असे मानधन द्यायला हवे.

Sep 29, 2016

जियो जी भर के

रिलायन्स जियो ने एक अनलिमिटेड बॅटरी पण द्यायला हवी होती! बरोबर ना

मत मनोगत

तुमचे मत, तुमचे विचार आणि प्रतिक्रिया जरूर कळवा. - प्रज्ञा पंडित

बाप्पा मोरया

आजकाल घरगुती गणेशोत्सवात सजावटीवर खुपच भर देण्यात येतो. घरोघरी खूप सुंदर डेकोरेशन केले जाते. फक्त नमस्कार करण्यासाठी.. डेकोरेशनच्या गर्दीत बसलेल्या गणपती बाप्पाला शोधावे लागते, इतकेच!

काही आठवणी

School Syllabus for 1st to 8th standard is going to change again from next year! Does anyone remember the group of Gopal,Seeta,Ahmed from the 20 years back school English Syllabus? ...... Missing those stories...

विसर्जन करतात का हो

आधी काही जणांना झाड, नारळ वगैरे मध्ये गणपतीची प्रतिमा दिसायची. आता सोशल मिडियावर बरेच जण स्वयंपाकघरात लागणार्‍या आले, लसुण इत्यादी वस्तूंमध्ये दिसणारी (!) बाप्पांची छबी फॉरवर्ड करतायत. मग गणेशोत्सवाच्या विधीवत विसर्जन प्रथेनुसार बाप्पाच्या मुर्ती प्रमाणेच या आले-लसुण वगैरेचे देखील विसर्जन होत असेल का?

एकदम नवा जोक

व्हाॅट्सप वर वेगवेगळ्या गृपमध्ये 'एकदम नवा जोक' असे लिहून जवळपास पाच वर्षांपूर्वीचे विनोद पाठवणारे लोक मला Nokia 3310 वगैरेच्या काळातले वाटतात.

#लिफ्ट

इमारतीत असलेल्या लिफ्ट मध्ये "कृपया दरवाजा बंद करा" या इरिटेटींग आवाजाची निर्मिती कोणी केली? हा आवाज ऐकून लोक वैतागून तरी दार नीट बंद करतील ही सुपीक आयडिया कोणाची?

महत्वाचे काही...

नगर शहर, परिसरात किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एखादी अनाथ, वेडसर व रस्त्यावर फिरणारी महिला असल्याचे डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांना कळाले की ते लगेचच त्या व्यक्तीला घेऊन येतात अन तिथपासून धामणे दाम्पत्याची सुरु होते न संपणाऱ्या वेदनांची लढाई. नगर-मनमाड रस्त्यावर अहमदनगर शहरापासून साधारण वीस किलोमीटरवरचं शिंगवे गावं. साधारण तीन हजार लोकसंख्या. या गावाला गावपण आलं ते डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या 'इंद्रधनु' अनाथलयामुळे. या अनाथालयात तब्बल १०५ अनाथ, मनोविकलांग महिला आणि त्यांची १५ मुले कायमस्वरूपी राहत आहेत. हे सगळं कसं सुरु झालं त्याची ही गोष्ट. डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता यांचे नगर शहरात खाजगी रुग्णालय. स्वभाव संवेदनशील. त्यामुळे मदतीलाही तत्पर. एक दिवस त्यांना एक वेडसर व विकलांग महिला विष्ठा खाताना दिसली. ही गोष्ट त्यांच्या नजरेसमोरून हटेना. या महिलांचं आयुष्य नेमक काय, कसं आहे याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर त्यांनी वेडसर, विकलांग, अपंग महिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरुन निघाले की या महिलांना देण्यासाठी खाद्यपदार्थ सोबत ठेवू लागले. दिवसभरात तब्बल साठ ते सत्तर अनाथ, निराधार, अपंग, मनोरुग्णांना रोजच घरचं जेवण द्यायला सुरुवात झाली. एकदा एक विकल अवस्थेतील आजीबाई त्यांना रस्त्यात दिसल्या. सारखं ‘मरायचं आहे’ असं म्हणत होत्या. त्यांच्या मुलाने त्यांना त्या मनोरुग्ण, अपंग झाल्या म्हणून रस्त्यावर टाकून दिलं होत. या आजीबाईंना डॉक्टरांनी घरी आणायचं ठरवलं. ‘मी त्यांना घरी घेवून येवू का?’ असा प्रश्न मी माझी पत्नी डॉ.सुचेताला फोन करून विचारल्याचं डॉक्टर सांगतात. हाच खरा दोघांच्याही कसोटीचा क्षण! कारण या लोकांना खायला घालण्यासाठी दररोज ६०-७० डबे तयार करण, रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण ठीक होतं. पण, एकदम अशा घाणीने माखलेल्या.. देहधर्माची शुद्ध हरवलेल्या एखाद्या महिलेला घरीच घेवून यायचं म्हणजे अतिच झालं. पण काहीही विचार न करता सुचेता यांनी मात्र लगेच घेऊन या..असं सांगितल. इथूनच खऱ्या अर्थाने 'इंद्रधनू'ची सुरुवात झाली. महामार्गावर, शहरात, गावखेड्यात येथील शहाण्या म्हणवल्या गेलेल्या व्यवस्थेने मनोरुग्ण आणि गंभीर आजारांनी त्रस्त महिला मरण्यासाठी सोडून दिलेल्या असतात. त्या अनन्वित लैंगिक अत्याचाराची शिकार होतात. त्यामधून कधी गर्भवती होतात आणि रस्त्यावरच फिरत राहतात. त्याचं पुढे काय होत? गायीची पवित्रता आणि संगोपन याची काळजी असणारा आपला समाज रस्त्यावर जगणाऱ्या बाईला मात्र माणूसही मानण्यास तयार नसतो. हा विरोधाभास पाहून आपणचं अशा महिलांच्या सेवेसाठी स्वखर्चातून अनाथालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. राजेंद्र सांगतात. 'इंद्रधनू' मुळे त्यांना हक्काच घर मिळालं. महामार्गावर, एखाद्या गावात, शहरात बेवारस, मनोरुग्ण महिला सापडल्या की त्यांना तातडीने तेथून घेऊन यायचं. आल्यावर प्रथम स्वच्छ करायचं. त्यांच्या सर्व वैदकीय तपासण्या, मनोविश्लेषण करून त्यांच्यावर उपचार सुरु करायचे. एखादी महिला रस्त्यावर झालेल्या बलात्कारातून गर्भवती झालेली असते. आपल्या पोटात बाळ आहे ही जाणीवही तिला नसते. तिच्या प्रसूतीपूर्व तपासण्या करायच्या. ती मुळातच उकिरड्यावरच अन्न खाऊन कुपोषित आणि आजारी असते. मग तिची विशेष काळजी धामणे दाम्पत्य घेतात. बाळंतपण पार पाडायचं, तिची काळजी घ्यायची आणि पुढे या मुलांना आपलं नाव देवून त्यांचे पालकत्व स्वीकारायचं. ही मुलं कायदेशीर अडचणीमुळे दत्तक जात नाहीत. त्यांचा सांभाळ आपली मुलं म्हणून करायचा हेही एक महत्वाचं काम. यामुळेच आज 'इंद्रधनू' या नावाबरोबरच 'माऊली' या नावानेही संस्था ओळखली जाते. डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे संपर्क - ९८ ६० ८४७९५४

पितृपक्ष

माणसांचे लाड,ते जिवंत असेपर्यंतच का नाही करत लोक..? त्यांचा " कावळा "झाल्यावर ..... मग त्यांच्या आवडीचे पदार्थ करून 'पान वाढण्यात', काय अर्थ आहे? !

काहे दिया परदेस रे

काहे दिया परदेस मध्ये सध्या शिव-गौरी च्या प्रेम कहाणी पेक्षा बनारस विरूद्ध मुंबई हाच वाद कमालीचा रंगला आहे. मराठी भाषेची व संस्कृतीची यथेच्छ अवहेलना अगदी सहज राजरोसपणे सुरू आहे. मराठी माणसाचं अतिशय हिडीस आणि अवास्तव चित्रं उभं केलं जात आहे ही अक्षम्य गोष्ट आहे. मराठी संस्कृतीची, राहणीमानाची अवहेलना होत आहे. एका एपिसोड मधे दहीहंडी उत्सवात शिव घायाळ होऊन पडलेला असताना मराठी तरुण मुलं निष्क्रियपणे काहीही मदत न करता उभी होती असे दाखवले. असे दाखवून मराठी माणसाची निष्ठुरताच जणू सिद्ध करायची होती. कथेच्या दृष्टीने हा ड्रामा बसवला होता असे म्हटले तरी एक मात्र गंमत बघायला मिळाली. पहिल्यांदाच 80-85 किलो चा हट्टा कट्टा गोविंदा हंडी फोडताना पाहिला

नाटकाचे बारसे

नाटक’ हा मराठी रसिक प्रेक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत असो की व्यावसायिक  अशा प्रत्येक नाट्य प्रकाराला प्रेक्षकांनी कायमच कमी अधिक प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला. मात्र लोकप्रिय झालेल्या किंवा नव्याने सुरू झालेल्या काही नाटकांची नावे अचानक बदलण्याचा ट्रेंड बघायला मिळत आहे. राजकीय हस्तक्षेप, काॅपी राईटचा मुद्दा, लोकप्रियतेचे बदलणारे अंदाज किंवा इतर कोणत्याही कारणास्तव हे बदल केले जातात. अर्थात जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात यावे ही या मागची मनोधारणा असली तरी यामुळे प्रेक्षक संभ्रमित व साशंक होण्याची व नाटकाला पर्याय शोधण्याचीच परिस्थिती बर्‍याच वेळा येते.

अजब देव भक्ती

ठाणे जिल्ह्यातून अलीकडेच स्वतंत्र जिल्हा म्हणून उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे 600 पेक्षा अधिक बालमृत्यू झाले. हा आकडा काळीज पिळवटून टाकणारा आहे. संपूर्ण आदिवासी वस्ती असलेला हा जिल्हा असून इथले अनेक तालुके दुर्गम आणि अतिदुर्गम आहेत. वर्षभर हाताला पुरेसे कामच नसल्याने घराघरातील आदिवासी कुटुंबच भुकेने तडफडताहेत. या कुपोषणाला, भूकबळी ला आपण फक्त सरकारला, ह्या ना त्या राजकारणी पक्षाला जबाबदार ठरवून रोज ही संख्या वाढवत ठेवायची की आपल्यातील माणुसकी जागी करून त्या भुकेल्या चिमुकल्यांच्या पोटापर्यंत अन्नाचा कण पोहोचवण्यात खारीचा वाटा उचलायचा हे आपणच सर्वसामान्यांनीच ठरवायला हवे. सरकारी यंत्रणा यावर उपाययोजना करतीलच पण त्यासाठी लागणारा वेळ बालकांची भुक थांबवू शकणार नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.  एकीकडे लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, सिध्दी विनायक, साई संस्थान किंवा इतर कोणतेही देवस्थान असो, जिथे दागदागिने, लाखो करोडो रुपये दान म्हणून दिले जातात, तेच पैसे, तोच दान धर्म आपण डोळसपणे विचार करून समाजाच्या अशा गरजू व्यक्तींना केला तरी देव तेवढाच प्रसन्न होणार आहे किंबहुना त्यापेक्षा जास्तच. स्वत:ला एखाद्या मृत्युमुखी पडलेल्या कुपोषित मुलाच्या बापाच्या जागी ठेवून विचार केला, तर त्यांचे दु:ख, त्यांची हतबलता सर्वाच्याच लक्षात येऊ शकेल.

Aug 16, 2016

मनोगत

मित्र मैत्रिणीनो, माझ्या ह्या ब्लॉगला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचना स्वागतार्ह आहेत.

खुलता कळी खुलेना

झी मराठी वाहिनीची नवीन मालिका 'खुलता कळी खुलेना' पहिल्या भागापासूनच दर्शकांना खिळवून ठेवणारी आहे. मातब्बर कलाकार, नवीन कथानक, आणि लक्षवेधक नायक ओमप्रकाश शिंदे यांचा अप्रतिम अभिनय या मालिकेच्या जमेच्या बाजु आहेत. परंतू या मालिकेच्या एका भागात असे दाखवण्यात आले की नायिका गर्भपात करून घेण्यासाठी गेली असता,तेथील प्रसुतीतज्ञाने "नवर्‍याची आणि घरच्यांची परवानगी नसेल तर गर्भपात करता येत नाही" असे विधान केले. पण सद्य परिस्थितीत वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण झालेली सज्ञान आई कोणाच्याही परवानगी शिवाय गर्भपात करू शकते. झी मराठी सारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रम महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगातील कानाकोपर्‍यातील मराठी प्रेक्षक आवर्जून बघतो, त्यात मांडलेल्या विचारांशी सहज सहमत होतो व ते विचार अनुकरणीय मानतो. असे असताना,  गर्भपात, कुमारी माता, लादलेले मातृत्व या सारख्या गंभीर आणि संवेदनशील समस्या ज्यामुळे आजही तळागाळातील, खेडोपाड्यातील समाजातील महिला ग्रासलेल्या आहेत त्या मालिकेत अंतर्भूत करताना समाजहिताची मुल्ये काळजीपुर्वक जपावीत हीच माफक अपेक्षा आहे.

Jul 31, 2016

नियोजन

मागील काही आठवड्यात एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. सैराट सारखा धुवाधार कमाई करणारा चित्रपट 2 महिन्यानंतर ही रसिकांनी गर्दी खेचत असताना, तुलनेने कमी प्रमोशन झालेले हे सर्व चित्रपट तग धरून राहणे निव्वळ कठीणच होते. निःसंशय यातील बरेच चित्रपट नवनवीन विषय व सकस कथानकावर आधारित होते. परंतु नियोजनाअभावी एकाच दिवशी धडाधड चित्रपट प्रदर्शित करण्याचा परिणाम जो अपेक्षित होता तोच झाला. बरेच वेळा काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आणि सध्याच्या या परिस्थितीत एकाच वेळी अनेक चित्रपटांचे पर्याय उपलब्ध असताना मर्यादित वेळ, मल्टिप्लेक्स थेटर मधील कमी शो, तिकीटांचे अवाजवी दर, कमी प्रमोशन झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील साशंकता इत्यादी कारणांमुळे प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत पोहोचत नाही. या सर्व बाबींचा विचार करून चित्रपट प्रदर्शनाचे नियोजन केले तर 'प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली' असे म्हणण्याची वेळ येणार नाही

Jul 23, 2016

चित्रपट प्रदर्शना बद्दल काही. ..

मागील काही आठवड्यात एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. सैराट सारखा धुवाधार कमाई करणारा चित्रपट 2 महिन्यानंतर ही रसिकांनी गर्दी खेचत असताना, त्या तुलनेने कमी प्रमोशन झालेले हे सर्व चित्रपट तग धरून राहणे निव्वळ कठीणच होते. निःसंशय यातील बरेच चित्रपट नवनवीन विषय व सकस कथानकावर आधारित होते. परंतु नियोजनाअभावी धडाधड चित्रपट प्रदर्शित करण्याचा परिणाम जो अपेक्षित होता तोच झाला.  बरेच वेळा काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आणि सध्याच्या या परिस्थितीत एकाच वेळी अनेक चित्रपटांचे पर्याय उपलब्ध असताना मर्यादित वेळ, तिकीटांचे अवाजवी दर, कमी प्रमोशन झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील साशंकता इत्यादी कारणांमुळे प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत पोहोचत नाही. या सर्व बाबींचा विचार करून चित्रपट प्रदर्शनाचे नियोजन केले तर 'प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली' असे म्हणण्याची वेळ येणार नाही

#कबाली

आजचा दिवस #Kabali Day होता असे म्हणायला हरकत नाही. 'रजनीकांत'सरांच्या जोक्सना परत एकदा महापुर आला. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात दिवसभर "बघा, तिकडे चेन्नई, बेंगलोरच्या लोकांना बरी पिक्चर बघायला सुट्टी मिळाली" असा विचार राहून राहून येत होता. मुंबईत सरांच्या पोस्टर्सना तर दुग्धाभिषेक करण्यात आला आणि चेन्नईत त्यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली असेही वाचण्यात आले. पुढचे काही दिवस अशा अनेक थक्क करण्याऱ्या, अचंबित व्हायला लावणाऱ्या नवनवीन #Kabali बद्दलच्या सुरस गोष्टी आपल्याला ऐकू येत राहतील. परंतु बातम्या मधील शो हाऊसफुल्लच्या गोष्टी ऐकताना, थेटर समोरील लोकांचा पहाटे 3 पासून ढोलताशांसह सुरु असणारे सेलिब्रेशन पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली की गरीब-श्रीमंत, हिंदू-मुसलमान, असंख्य जातीजमाती मधील लोक एकाच कारणासाठी एकत्र येऊन एक होऊन हा #Kabali नावाचा नवीन सण जल्लोषात साजरा करत आहेत 'हेही अर्थातच नसे थोडके' - प्रज्ञा

Jun 14, 2016

मुलगीच हवी हो

केंद्रीय दत्तविधान संस्थेकडून ( कारा ) आलेल्या अहवालानुसार देशात मुलांच्या तुलनेत ३६ टक्के मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती नुकतीच समोर आली. त्यातही आशादायी चित्र म्हणजे नैसर्गिकरीत्या पहिले अपत्य असेल तरीही दुसरी मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत दहा टक्क्यांनी वाढले आहे. इच्छुक दांपत्य पालक तसेच 'सिंगल मदर्स' देखील 'मुलगीच दत्तक हवी', म्हणून वेटिंग लिस्टवर थांबण्याची तयारी दर्शवत आहेत. मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण, समाजात वाढणारी असुरक्षितता व अस्थैर्य यामुळे अनाथ मुलींचे पालनपोषण व त्यांचा नैतिक आणि सामाजिक अधिकार त्याच बरोबर त्यांना गरजेचा असलेला भावनिक आधार हे ज्वलंत प्रश्न समाजापुढे उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निश्चितच स्वागतार्ह आणि विधायक सामाजिक बदल म्हणायला हरकत नाही.

दुष्काळातील दहावे...

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती आणि उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची समस्या आज सर्व स्तरीय चिंतेचा विषय आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील करावी लागणारी वणवण, कर्जबाजारी झाल्यामुळे प्रचंड संख्येने आत्महत्या करणारे शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची होणारी अतोनात वाताहत यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहेच परंतु मन सुन्न करणारे वास्तव म्हणजे मृत्यूपश्चात अस्थी विसर्जनासाठीही लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील 'कोल्हार' गावची सध्याची ही परिस्थिती अंगावर काटा उभा करणारी आहे. 'दशक्रिया विधीसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध' अशा प्रकारच्या जाहिरातींचे फलक पाहून आज मृत्यूनंतरही व्यक्तीचे पाण्यासाठी हाल होत आहेत हेच भीषण वास्तव दिसून येते.

द कपिल चा कार्यक्रम

सोनी टिव्हीवर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला 'द कपिल शर्मा शो' एकदाचा सुरू झाला. 'काॅमेडी नाईट्स विथ कपिल'चेच सर्व कलाकार आणि त्यांच्या नविन व्यक्तीरेखा हा एक या कार्यक्रमातील नाविन्यपूर्ण भाग! बाकी हिंदी चित्रपट/मालिकांचे प्रमोशन कपिलचे 'इन्स्टंट' जोक्स आधीच्या कार्यक्रमाप्रमाणेच असल्यामुळे 'शो'ची रूपरेषा जवळपास सारखीच आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जाहीर करण्यात आल्याप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण फक्त 26 भागांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यक्रमात पाणी घालून तो रबरासारखा न ताणता वेळीच आवरता घेतला जाईल आणि कार्यक्रमाची गुणवत्ता व नाविन्य शेवटपर्यंत राखले जाईल ही रास्त अपेक्षा करायला हरकत नाही.

नाटकाविषयी महत्वाचे. ...

नाटक’ हा मराठी साहित्याचा व अनुषंगाने रसिक प्रेक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत, प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर अशा प्रत्येक नाट्य प्रकाराला प्रेक्षकांनी कायमच भरभरून प्रतिसाद दिला. मात्र गेल्या काही वर्षांपासून अचानक कोणतीही कल्पना न देता यशाच्या शिखरावर असलेली नाटके बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे. वादग्रस्त विषय, कलाकारांमधील मतभेद, आवडत्या कलाकारांची रिप्लेसमेंट या व अशा काही कारणांमुळे नाटकाच्या प्रयोगांना उतरती कळा लागत असली तरी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाटकांचे प्रयोग रद्द किंवा बंद करण्यात येतात. यामुळे प्रेक्षक संभ्रमित होतात. चांगली नाटके रंगभूमीवर येणे ही काळाची गरज आहे. तरच 'इडियट बाॅक्स'च्या जमान्यात रंगभूमी तग धरू शकेल. 

पाऊस, मी आणि. ...आई

अगदी लहान असताना, शाळा सुटल्यावर आई घ्यायला यायची! शाळेत (कसेबसे) 5 तास आई शिवाय काढल्या नंतर आईला बघितल्यावर जो आनंद व्हायचा तोच आनंद आज खुप वाट बघितल्यावर आलेल्या पावसाला बघून होतोय.

फेसबुक वरचा देव बाप्पा

फेसबुक वरील देवी देवतांचे फोटो लाईक केल्याने देव कसा प्रसन्न होईल आणि कशी काय चांगली बातमी मिळेल किंवा आजारी व्यक्तींच्या फोटोवर 'आमीन' असे टाईप केल्यावर ती व्यक्ती कशी बरे ठणठणीत होईल हे मला न उलगडलेले कोडे आहे. देवाचे तर फेसबुक अकाउंट नाही त्यामुळे देवाला #टॅगही करू शकत नाही जेणेकरून देवाला कळेल ! ? ! ह्या प्रकारांनी झालाच तर त्या त्या पेज अॅडमिनला आणि पर्यायाने झुकरबर्गभाऊलाच फायदा होईल.

Jun 13, 2016

इकडून तिकडे

पाकिस्तानातून 'चुकून' भारतीय हद्दीत आलेल्या ३ मुलांवर कोणतीही कारवाई न करता भारतीय लष्कराने व सीमा सुरक्षा दलाने त्यांना परत मायदेशी पाठवले व परत जाताना त्यांना मिठाई आणि भेट वस्तूही दिल्या. ही बातमी वाचून मला 'तारक मेहता...'मध्ये चुकुन पाकिस्तानी हद्दीत गेल्यावर 'जेठालाल'ने ओढवलेल्या संकटांशी केलेला सामना आणि 'बजरंगी भाईजान' मधील अशीच चुकुन भारतात आलेल्या चिमुरडीची कैफियत आठवली. अर्थात करमणूकीच्या या माध्यमातील कथा काल्पनिक असल्या तरी परिणामकारकही असतात. त्यामुळे ही सत्य परिस्थितीतील घटना वाचून भारतीयांमधील माणुसकी आणि सदसद्विवेक बुध्दीची जाणीव आवर्जून दिसुन आली.

व्हाॅट्सप बद्दल काही. ..

व्हाॅट्सप' किंवा तत्सम अॅप्स 'कम्युनिकेशनसाठी' असली तरी प्रॅक्टिकल आयुष्यात जरा वेगळे चित्र आहे. 'व्हाॅट्सप' जेव्हा सुरू झाले तेव्हा एक एक मेसेज अगदी उत्साहाने वाचला जायचा. आता असंख्य गृप वरचे शेकडोवर असणारे मेसेजेस बरेचदा ओपन करून न वाचताच डिलीट केले जातात. कारण हे गृहीतच धरलेले असते की त्या मेसेजेस मध्ये काही गुड मॉर्निंग, गुड नाईट ..काही 'मार्केटमे एकदम नया' टाईपचा मेसेज, 'हे शोधा ते शोधा' टाईपची कोडी तर कधी प्रसंगानुरूप संकष्टी, गुरुवार वगैरेच्या शुभेच्छा असणार! 'व्हाॅट्सप' वरील गृप म्हणजे तर एक गमतीशीर जग आहे. गृप बनवताना उत्साहाने सहभागी झालेले सगळे..नंतर मात्र काहीजण आपापसातील मतभेद, राग, इर्षा गृप वरही आणतात.  मग गृप संभाषणात तटस्थ राहणे, काही मोजक्या गृप मेंबर्स बरोबरच बोलणे असे बालिश प्रकार सुरु होतात. गृप मधुन 'एक्झिट' होऊन 'वाईटपणा' ( !! ??) का घ्यावा म्हणून फक्त असे लोक गृपमध्ये राहतात. सारांश असा की सध्या तरी ही अॅप्स फक्त 'contact' ठेवायलाच उपयोगी आहेत, एकमेकांशी 'संवाद' वाढवायला अजुन तरी अपुरी आहेत.

Apr 19, 2016

गाभारा प्रवेश

शनी चौथरा असो वा महालक्ष्मी गाभारा किंवा इतर कुठल्याही देवस्थानात महिला प्रवेश हा खरंतर रुढी परंपरेनुसार चालत आलेला भावनिक मुद्दा! काही संघटनांच्या संघर्षामुळे तो मोडीत निघाला आणि अखेर महिला प्रवेश बंदीचा नियम बदलला गेला. ही एका अर्थी चांगली कामगिरी असली तरी देखील अशा प्रकारची भावनिक स्वरूपाची बंधने दुर करण्यासाठी राज्य घटना,  न्यायालयीन व्यवस्थेला समाविष्ट करून कायदेशीर कारवाईने हा प्रश्न सोडवण्याची गरज होती असे वाटत नाही. कायदा व सुव्यवस्था अंतर्गत कोणत्याही कलमान्वये स्त्रियांवर प्रवेश बंदीचा नियम नाही. त्यामुळे न्यायालयात स्त्रीयांसंबंधित असलेले विनयभंग, हुंडाबळी, छेडछाड यासारखे अनेक गंभीर खटले त्याचप्रमाणे स्त्री प्रसाधनगृहांची आवश्यक संख्या, आत्महत्याग्रस्त विधवा शेतकरीपत्नीच्या उदरनिर्वाहाचे साधन, दुष्काळीभागात कोसो दुर चालून पाणी मिळवण्यासाठी महिलांची होणारी परवड आणि त्यात होणारे अतोनात हाल असे मुद्दे वर्षानुवर्षे प्रलंबित असताना, देवाधिदेवांच्या दर्शनाची बाब ऐरणीवर आणून न्याय व्यवस्थेचा महत्वाचा वेळ खर्ची घालणे हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा.

का रे दुरावा

नमस्कार, झी वाहिनीवर सुरू असलेली 'का रे दुरावा’ही मालिका अखेर संपली. जय आणि आदितीच्या लग्नाबद्दल ऑफिसमध्ये कळल्यानंतर नक्की काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. परंतु या मालिकेचा शेवट बघून कमालीचा भ्रमनिरास झाला. अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून व त्यातील व्यक्तीरेखांचे स्वभाव रातोरात बदलून मालिका अक्षरशः गुंडाळण्यात आली. रजनी आणि अनिल दाभोळकरांना अचानक उपरती होऊन झालेले हृदय परिवर्तन,  कायम हळव्या दाखवल्या गेलेल्या जुईची जयचे सत्य समजल्यावरही 'शुन्य' प्रतिक्रिया, जयआदिती प्रमाणेच 'नवरेंचे' लपवलेले लग्न, 'शोभा'च्या नवर्‍याचे म्हणजेच जयच्या भावाचे कर्ज प्रकरण व विनाकारण मालिकेतून गायब केलेला लहानगा 'चिनू', कधीही मालिकेत प्रत्यक्ष न आलेला परंतु या ना त्या कारणाने प्रेक्षकांना सतत ऐकवला गेलेला केतकरांचा परदेशस्थ मुलगा, लग्न लपवण्यासाठी आदितीच्या घटस्फोटाच्या कहाणीचा सरतेशेवटी अपेक्षित असलेला परंतु दुर्लक्षीत केलेला उल्लेख अशा कितीतरी गोष्टी खटकल्या. "आणि ते सर्वजण सुखाने नांदू लागले, साठा उत्तराची  कहाणी  पाचा उत्तरी  सफळ संपूर्ण" या धर्तीवर केलेला

https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

For Such Many More Interesting Quotes And Posts, Please Visit/Like/Share My Facebook Page. https://www.facebook.com/tumchaamchsamechasta/

Apr 1, 2016

विराट आणि अनुष्का

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयी सामन्यात विराट कोहलीने सिंहाचा वाटा उचलला. त्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र, विराटचे अभिनंदन करत असताना मिडिया मध्ये अनुष्काची खिल्ली उडवण्याचा प्रकार संतापजनक आहे. अनुष्काशी 'ब्रेक-अप' झाल्यामुळेच विराट फॉर्मात आलाय अशा प्रकारचे मेसेजेस पसरवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अथवा काही अंशी प्रत्यक्षपणे एका स्त्रीला दुर्भाग्यकारक आणि अपशकुनीच म्हटले गेले आहे. सोशल मीडियामध्ये असे 'अनुष्का विरोधी' जोक्स करण्याऱ्यांचा विराट कोहली ने खडसावून समाचार घेताना आपली नाराजी व्यक्त केली व  तुमची बहीण, पत्नी किंवा गर्लफ्रेंडवर कुणी जोक केले, जाहीरपणे तिची खिल्ली उडवली तर कसं वाटेल, याचा जरा विचार करा, असा सुसंस्कृत सल्लाही दिला. तरी हा विषय नक्कीच इथे संपलेला नाही. कोणत्याही पुरूषाच्या यशाला व अपयशाला त्याच्या स्त्री-जोडीदाराला जबाबदार ठरवणे ही पूर्वापार चालत आलेली एक खेदाची बाब आहे. वाईट पायगुणाची, पांढर्‍या पायाची अशा घृणास्पद संबोधनांनी कायमच तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केला गेला आहे. सखेद आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो वर्षापासून जनमानसात खोलवर रूजलेली ही विचारसरणी आजच्या आधुनिक काळात, प्रगल्भ आणि प्रगत मानल्या जाणार्‍या जगातून अजूनही लोप पावलेली नाही. आजची स्त्री स्वत च्या पायावर खंबीर उभी राहणारी,  स्वतःला सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडणारी आहे. कोणत्याही क्षेत्रात अंखंड कार्यक्षमतेने उल्लेखनीय कामगिरी करताना  पुरूषापेक्षा काकणभरही कमी नाही हे या 'अॅडव्हान्स्ड' विनोदवीरांना व समाजातील सर्व घटकांना परत परत सांगण्याची गरज खरतर नाहीये. कारण ही निश्चितच सर्वश्रुत व सर्वमान्य बाब आहे. या प्रकरणातील स्वतः 'अनुष्का शर्मा' देखील चित्रपटसृष्टीतल्या 'खान' आणि 'कपूर' साम्राज्यातील स्वयंसिद्धा अभिनेत्री आहे. त्यामुळे असे स्त्री विरोधी लिखाण करणार्‍या व ते पसरवणारया समाज घटकांना आत्म परिक्षण करण्याची व अंतर्मुख होऊन विचार करण्याची आता खरोखरच गरज आहे.

राजकारण नव्हे, खेळ महत्वाचा

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया बरोबरच्या सामन्यात  पाकिस्तानी संघाचा अत्यंत दारूण पराभव झाला. सामन्यानंतरच्या मुलाखतीतील  कर्णधार 'शाहिद आफ्रिदीने' काश्मिरी जनतेचे आभार मानले. "आम्हाला खेळताना काश्मिरी क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळाला" असे म्हणून त्याने त्याबद्दल जाहीर आभार प्रदर्शन केले. हे विधान करण्यामागचे त्याचे उद्दिष्ट व विचारधारा काय आहे हा एक संपूर्ण वेगळा चर्चेचा विषय असला तरी काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे हे आफ्रिदीने लक्षात घ्यावे. सध्या तरी, राजकारण आणि खेळ या सर्वस्वी दोन वेगळ्या विषयाची सरमिसळ न करता स्वतःच्या व संघाच्या खेळ पट्टी वरील कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे जास्त उचित ठरेल.

दिलदार अक्षय कुमार

एबीपी माझा वरील 'माझा कट्टा' या कार्यक्रमात अलीकडेच सुपरस्टार अक्षय कुमारने हजेरी लावली. अक्षय कुमारची संवेदनशीलता त्याने आपल्या चर्चेत नमुद केलेल्या अनेक मुद्यांमध्ये दिसुन आली. राज्यातील दुष्काळ आणि त्यामुळे शेतकरीवर्गावर ओढवलेली परिस्थिती, वाढत्या आत्महत्या, त्यांच्या मदतीसाठी आवश्यक निधी यावर त्याने परखडपणे आपली मनस्वी मते मांडली. आपल्या उत्पन्नातील निम्मा वाटाही शेतकऱ्याला देण्याची तयारी असल्याचे दिलदारपणे खुलेआम केलेले विधान वाखाणण्याजोगे आहे. त्याचं व्यक्तिगत आयुष्य, त्याचे चित्रपट, पडद्यामागच्या कलाकारांची विशेषतः स्टंटमॅनची मेहनत, महिला सशक्तीकरण व समानता आणि देशातली राजकीय परिस्थिती ह्याही विषयांवर तो दिलखुलासपणे बोलला. आपला कुठलाही चित्रपट किंवा मालिका प्रदर्शनाच्या मार्गावर नसताना एखाद्या कलाकाराने अशा कार्यक्रमात हजेरी लावणे आजकाल दुर्मीळच!

Mar 12, 2016

मराठीतील चार्ली

प्रख्यात 'सर चार्ली चॅप्लिन' त्यांच्या विनोदी ढंगाच्या मूकाभिनयाने भरपूर हासू आणि सरतेशेवटी थोडेसे आसू देऊन जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातल्या प्रेक्षकावर गारुड करू शकले! या महान कलाकाराला आपल्या अभिनयाद्वारे मानवंदना देण्याचे शिवधनुष्य, विनोदी अभिनेता 'समीर चौगुले' यांनी कलर्स मराठी वरील 'काॅमेडीची बुलेट ट्रेन' या मंचावर लीलया पेलले आहे. मागील आठवडय़ात त्यांनी रंगवलेला 'चार्ली चॅप्लिन' पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक 'सरप्राईज' होते. मराठीत भल्याभल्या मातब्बर मंडळींनीही आजवर जे आव्हान स्वीकारले नाही ते काॅमेडी शो मधील अवघ्या पंधरा मिनिटाच्या स्कीट मध्ये समीर चौगुले यांनी साकार करून चार्लीच्या चाहत्यांना जणू 'ट्रीट' दिली आहे.

Feb 22, 2016

जय मल्हार मध्ये 'लॅब्रेडाॅर'!!!

दूरदर्शनच्या रामायण व महाभारत या मालिकांपासून देवादिकांच्या मालिकेचा ट्रेंड प्रेक्षकांनी आपलासा केला. सध्या झी वाहिनीवर सुरू असलेली 'जय मल्हार' ही पौराणिक मालिका  देखील जगभरातील मराठी जनमानसात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील पात्रे, त्यांचे पेहराव आणि भाषा, संबंधित देखावे इत्यादी अनेक गोष्टी हुबेहूब पुरातन पध्दतीने करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.  याच मालिकेत मागील आठवडय़ात प्रक्षेपित करण्यात आलेल्या एका भागात जेजुरीत वाजतगाजत श्वान राजाचे आगमन झाले. परंतु  'मल्हारी मार्तंड' देवाच्या दरबारात आलेले हे 'श्वान राजे' चक्क 'लॅब्रेडाॅर' रुपात अवतरले.   कलीयुगात येणार्‍या आपल्या विदेशी अवताराची श्वान महाराजांनी पुराणातच झलक दाखवली होती असं बहुदा लेखक महाशयांना सूचित करायचे असावे. वास्तविक पाहता ही श्वान प्रजाती इंग्रजांनी भारतात आणली त्यामुळे मालिकेतील प्रसंगात हे श्वान भारतीय प्रजातीचे असले पाहिजे होते. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असल्या गोष्टी दाखवणं आपण कधी थांबवणार आहोत? 

Feb 19, 2016

जाहिरातींचाच कार्यक्रम

प्रत्येक वाहिनीवर विविध वस्तूंच्या जाहिरातींचा नेहमीच भडिमार सुरू असतो. पुर्वी मालिकेच्या/बातम्यांच्या ब्रेक मध्येच दाखवण्यात येणार्‍या या जाहिराती आता त्या पुढील पायरी म्हणून कार्यक्रम सुरू असतानाच स्क्रोलर/स्लायडरच्या रूपात अवतरत आहेत.  एक किंवा कधीकधी दोन स्क्रोलर जाहिरातींमुळे दुरचित्रवाणी पडद्याचा निम्मा अधिक भाग व्यापला जातो. त्यामुळे कार्यक्रमात जाहिराती सुरू आहेत की जाहिरातींमध्ये कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असा संभ्रम निर्माण होतो. न्युज चॅनेल वर तर या अतिरेकाचा उच्चांक गाठला जातो.  केव्हा कोणती जाहिरात दाखवावी या बद्दल कसलेही निकष नसल्याने एखादी गंभीर, दुःखद बातमी वाचली जात असताना समोर नाच, गाणं, खाद्य पदार्थ आदिं ची जाहिरात बघावी लागते. अलिकडेच घडलेल्या सियाचिन दुर्घटनेची माहिती दिली जात असता खालील स्क्रोलर वर खमंग खाद्य पदार्थ व तत्सम जाहिरात प्रक्षेपित करण्यात आली. सामाजिक बांधिलकी म्हणून वाहिन्यांनी याबाबतीत विशेष तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.

Feb 16, 2016

माझे पती सौभाग्यवती

सुजाण प्रेक्षकांची नस ओळखून करमणूकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणार्‍या व अविस्मरणीय मराठी मालिकांच्या जगतातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे मंदार देवस्थळी! 'माझे पती सौभाग्यवती' ही त्यांची नवीन मालिका देखील त्याच्या विषयातील व सादरीकरणातील वेगळेपणामुळे दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. पठडीपेक्षा वेगळे कथानक, मध्यमवर्गीय दर्शकांना जवळचे वाटणारे व्यक्तीचित्रण हा या मालिकेचा 'युएसपी' तर आहेच पण त्याही पेक्षा नाविन्य पूर्ण गोष्ट म्हणजे त्यात दाखवले जाणारे दिग्दर्शनाविषयीची माहिती! मालिकेतील मालिकेच्या शुटींग निमित्ताने दिग्दर्शक व बॅक स्टेजला असणार्‍या कलाकारांचे काम, त्यांची मेहनत व एक चांगली कलाकृती लोकांसमोर आणण्यासाठी लागणारे दिग्दर्शकीय 'स्किल' पाहायला मिळते. आतापर्यंत कोणत्याही माध्यमातून हे 'टेक्निकल नो-हाउज' दाखवले गेले नाहीत.  बॅकस्टेज चे हे पैलू उलगडून दाखवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

Feb 10, 2016

पोस्ट वर तुमचा अभिप्राय, मत नक्की नोंदवा

Feb 8, 2016

होम मिनिस्टर

'दार उघड बये, दार उघड' अशा आरोळीच्या शीर्षक गीताने गेली बारा वर्षे महाराष्ट्रातील घराघरात नित्य नेमाने आनंदाची उर्जा घेऊन येणारे 'आदेश बांदेकर' यांचे प्रकृती अस्वास्थ्या नंतरचे जोरदार पुनरागमन बघून समस्त महिला वर्गाचे काळीज आनंदाने सुपाएवढे झाले. महिनाभराच्या विश्रांतीनंतर एक तासाच्या महाएपिसोडने पुन्हा सुरूवात झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा 'विषाची परिक्षा' देण्याचा अनुभव त्यांच्याच शब्दातून ऐकताना सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. या महाएपिसोड ची सांगताही कार्यक्रमाच्या लौकिकाला साजेशी अशीच झाली. विजेती आणि अविजेती झालेल्या दोन्ही स्पर्धकांना सौहार्दाचे प्रतीक म्हणून मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या अनपेक्षित निर्णयाने होम मिनिस्टर या कार्यक्रमाविषयीची आत्मियता व अनुषंगाने 'आदेश भाऊजीं' बद्दलचा आदर द्विगुणित झाला. या पुढे देखील होम मिनिस्टर ची वाटचाल अखंड सुरू राहो व आदेश भाऊजींची प्रकृती उत्तम राहो हीच सदिच्छा!

Jan 24, 2016

#नटसम्राट

नाना पाटेकर यांचे अतुलनीय अभिनय सामर्थ्य , मेधा मांजरेकर यांची मितभाषी अवर्णनीय अदाकारी यांनी नटलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट मराठी व अमराठी प्रत्येक दर्दी रसिकांनी अगदी डोळे, कान, मन एकवटून बघावा असा आहे. अभिनया बरोबरच दाद दिली पाहिजे ती खणखणीत संवाद लेखनाला!  शिरवाडकरांची मुळ संहिता कायम ठेवून  लेखक किरण यज्ञोपवित यांनी माध्यमानुरूप लिहिलेले संवाद, उपमांनी व अलंकारिक सजलेले, आजच्या काळात नामशेष व कालातीत होण्याच्या मार्गावर असलेले अस्सल मराठी शब्द ऐकून कान तृप्त नाही झाले तरच नवल! हा चित्रपट पाहिल्यावर त्यातील त्रुटी व कमतरतेवर चर्चा करणे म्हणजे श्रीसत्यनारायण पूजेच्या प्रसादातील चुका काढण्याचा प्रयत्न आहे. ‘कुणी घर देतं का घर?’ To Be or Not To Be, ‘जगावं की मरावं’, असे काळजाला भिडणारे संवाद व आपसूकच होणारा टाळ्यांचा कडकडाट व या सर्वांस थिएटर मधून बाहेर पडताना आजच्या तरुण पिढीनेही साश्रुनयनांनी दिलेली दाद प्रत्येकाने अनुभवायलाच हवी.

Jan 19, 2016

तक्रार निवारण केंद्र

नव्या विद्यापीठ कायद्याच्या प्रस्तावात प्रत्येक काॅलेज मध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची सुचना केली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल. परीक्षांचे निकाल लांबणे, निकालातील चुका, सुविधांचा अभाव, शिष्यवृत्तीचा परतावा न मिळणे यासारख्या  शैक्षणिक अडीअडचणी, प्रसाधन गृहातील अस्वच्छता, आरोग्यसेवेच्या प्रथमोपचारात कमतरता यासारख्या दैनंदिन समस्या, रॅगिंग सारख्या गंभीर सामाजिक समस्या, शिक्षक-विद्यार्थी  असमन्वय तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणेतर गरजा शालेय व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढणे व महाविद्यालयातील समस्या दूर करण्यासाठी या तक्रार निवारण मंचाचा उपयोग होईल.

Jan 8, 2016

नांदा सौख्यभरे' ?

झी वाहिनीवर सुरू असलेल्या सुचित्रा बांदेकर प्रस्तुत 'नांदा सौख्यभरे' या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु प्रत्यक्षात  सकस कथेचा अभाव असलेली ही रटाळ मालिका दिवसेंदिवस भरकटत आहे. अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेल्या इंद्रनीलची हुशारी अजून तरी मालिकेत दिसून आलेली नाही. नात्यातील खरेपणाचे महत्त्व जपणारी स्वानंदी स्वतः मात्र संपदाला व्हिसा प्रकरण विनाकारण लपवायला सांगते. हट्टी संपदा तर प्रत्येक सीन मध्ये फक्त उच्छाद मांडताना दिसते. उत्कृष्ट विनोदी अभिनय करणारी सुहास परांजपे ही अभिनेत्री 'ललिता' हे खलनायकी पात्र साकारताना अजुनही चाचपडत आहे. बाकी इतर पुरूष कलाकार तर मालिकेत असून नसल्या सारखेच आहेत. कृपया निर्माता-दिग्दर्शकांनी मालिका ट्रॅक वर आणून वेळीच संपवावी.

मुलगीच दत्तक हवी

मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु सध्या हा समज मागे पडत चालला असून निपुत्रिक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येते. केंद्रीय दत्तविधान संस्थेकडून ( कारा ) आलेल्या अहवालानुसार देशात मुलांच्या तुलनेत ३६ टक्के मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली. त्यात मुलींना दत्तक घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर आहे ही खरोखरच समाधानकारक व कौतुकास्पद वास्तव आहे.   मुलगीच दत्तक हवी', असे सांगत महिनोन्‍महिने वेटिंग लिस्टवर थांबण्याची सामाजिक सुशिक्षित मानसिकता म्हणजे भावी सुसंस्कृत समाजाचे आशादायी चित्र म्हणायला हरकत नाही.

Jan 1, 2016

पाडगावकरांना श्रध्दांजली

अजरामर कविता आणि गीतांचे शिल्पकार कवीवर्य श्री मंगेश पाडगावकर यांचे अकल्पित निधन मनाला चटका लावणारे आहे. 'सांग सांग भोलानाथ' पासून ते 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम' पर्यंत त्यांच्या सर्व कविता, गाणी समस्त मराठी माणसांच्या मनात कायम रूंजी घालत राहतील. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील मानवी भाव भावनांचे मोती शब्दांच्या कोंदणात अलगद गुंफण्याची दैवी किमया अवगत असलेला हा कवी पुन्हा होणे नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!