Aug 16, 2016
खुलता कळी खुलेना
झी मराठी वाहिनीची नवीन मालिका 'खुलता कळी खुलेना' पहिल्या भागापासूनच दर्शकांना खिळवून ठेवणारी आहे. मातब्बर कलाकार, नवीन कथानक, आणि लक्षवेधक नायक ओमप्रकाश शिंदे यांचा अप्रतिम अभिनय या मालिकेच्या जमेच्या बाजु आहेत.
परंतू या मालिकेच्या एका भागात असे दाखवण्यात आले की नायिका गर्भपात करून घेण्यासाठी गेली असता,तेथील प्रसुतीतज्ञाने "नवर्याची आणि घरच्यांची परवानगी नसेल तर गर्भपात करता येत नाही" असे विधान केले. पण सद्य परिस्थितीत वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण झालेली सज्ञान आई कोणाच्याही परवानगी शिवाय गर्भपात करू शकते.
झी मराठी सारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रम महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगातील कानाकोपर्यातील मराठी प्रेक्षक आवर्जून बघतो, त्यात मांडलेल्या विचारांशी सहज सहमत होतो व ते विचार अनुकरणीय मानतो.
असे असताना, गर्भपात, कुमारी माता, लादलेले मातृत्व या सारख्या गंभीर आणि संवेदनशील समस्या ज्यामुळे आजही तळागाळातील, खेडोपाड्यातील समाजातील महिला ग्रासलेल्या आहेत त्या मालिकेत अंतर्भूत करताना समाजहिताची मुल्ये काळजीपुर्वक जपावीत हीच माफक अपेक्षा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment