Oct 10, 2016
झाडे लावा झाडे जगवा
मध्यंतरी आपल्या महाराष्ट्र सरकारने दोन कोटी झाडं लावायची - म्हणजेच दोन कोटी झाडांची रोपं लावायची भीषण भीष्मप्रतिज्ञा केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
1.आता आपलं काही खरं नाही या भीतीपोटी तर महाराष्ट्राभर इतका प्रचंड पाउस झाला नसेल ना ?
2.ती रोपे आता सद्य स्थितीत जिवंत आहेत का?
3.त्या रोपांची व्यक्तीशः जबाबदारी कोणी घेत आहे का?
आणि सगळ्यात महत्वाचे -
4.ती दोन कोटी झाडे वाढायला कमीतकमी पंधरा-वीस वर्ष तरी नक्कीच लागणार, तो पर्यंत रस्ता रुंदीकरण, नवीन सदनिका निर्मिती, (अर्थात new building construction) होळी, इत्यादी इत्यादी इत्यादि कारणांमुळे किंवा कारणासाठी ती झाडे त्या पंधरा-वीस वर्षात पाडली जाणार नाहीत याची गॅरंटी म्हणजे हमी कोण देणार?
Httpa://majheviewsanireviews.blogspot.in
.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment