Oct 6, 2016
#काहे दिया परदेस
प्रिय गौरी,
आईवडिलांना कर्ज काढायला लावुन लग्न करू नकोस. एका मध्यमवर्गीय घरातील पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी आहेस तू. स्वतःच्या लग्नासाठी बाबांना नको लाखोंचं कर्ज काढायला लावुस!
प्रेमविवाह करायचा आहे तर स्वतःच्या हिमतीवर कर. ठामपणे मत मांड स्वत:चं की मी लग्नासाठी एवढा खर्च करण्याच्या विरूद्ध आहे आणि माझ्या वडीलांना कर्जबाजारी करून तर नाहीच नाही. अगं एकदा सांगून तर बघ तुझं मत! कुठे वृध्द आईवडिलांना या वयात EMI फेडायला लावतेस? तुझी मालिका बघणाऱ्या आणि तुला आदर्श मानणाऱ्या खुप लेकीबाळी आहेत महाराष्ट्रात. त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल तुझ्याकडून.
Be Sensible.
आणि हो, त्याच्या नावाचा उच्चार 'शिव' असा आहे, तु 'शीव'-'शीव' असा उच्चार करतेयस.
तिथेही जरा लक्ष दे.
#काहे दिया परदेस
-
(तुझ्याच सारखी एक मध्यमवर्गीय मुलगी)
प्रज्ञा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment