Oct 5, 2016
आनंदाचे डोही
गरजू आणि मदतीची अपेक्षा असणार्या अनोळखी व्यक्तीची त्याच्या कळत नकळतपणे काळजी घेण्यात, सेवा करण्यात किंवा त्याला आनंद देण्यात एक वेगळीच मजा असते..
मला यातुन काय मिळतं विचाराल तर अगदी 'पोटभर आनंद' मिळतो..
बर्याचदा आपल्या मदतीच्या बदल्यात समोरच्या कडून काहीच मिळणार नाही हे ठाऊक असतं.. ती व्यक्ती पुन्हा कधी भेटेल की नाही हे ही ठाऊक नसतं.. पण तरीही त्याला निस्वार्थीपणे मदत केली किंवा कुठल्या ना कुठल्या रुपात आनंद दिला.. तर यातुन आपल्याला मिळणारं समाधान हे, 'लहानपणी कुणीतरी आपल्या हातावर अचानक भरपुर चॉकलेट्स ठेवल्यानंतर जसं वाटायचं ना
...तस असतं!'
अर्थात हे सगळं करताना जरासं भान आणि थोडी जागरुकताही गरजेची बरं का!
कारण कोणीतरी कुठेतरी म्हंटलच आहे
'ये दुनिया जीतनी अच्छी है ना..
उससे कईsssss ज्यादा बुरी भी है...!!'
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment