Apr 19, 2016
का रे दुरावा
नमस्कार,
झी वाहिनीवर सुरू असलेली 'का रे दुरावा’ही मालिका अखेर संपली. जय आणि आदितीच्या लग्नाबद्दल ऑफिसमध्ये कळल्यानंतर नक्की काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. परंतु या मालिकेचा शेवट बघून कमालीचा भ्रमनिरास झाला. अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून व त्यातील व्यक्तीरेखांचे स्वभाव रातोरात बदलून मालिका अक्षरशः गुंडाळण्यात आली. रजनी आणि अनिल दाभोळकरांना अचानक उपरती होऊन झालेले हृदय परिवर्तन, कायम हळव्या दाखवल्या गेलेल्या जुईची जयचे सत्य समजल्यावरही 'शुन्य' प्रतिक्रिया, जयआदिती प्रमाणेच 'नवरेंचे' लपवलेले लग्न, 'शोभा'च्या नवर्याचे म्हणजेच जयच्या भावाचे कर्ज प्रकरण व विनाकारण मालिकेतून गायब केलेला लहानगा 'चिनू', कधीही मालिकेत प्रत्यक्ष न आलेला परंतु या ना त्या कारणाने प्रेक्षकांना सतत ऐकवला गेलेला केतकरांचा परदेशस्थ मुलगा, लग्न लपवण्यासाठी आदितीच्या घटस्फोटाच्या कहाणीचा सरतेशेवटी अपेक्षित असलेला परंतु दुर्लक्षीत केलेला उल्लेख अशा कितीतरी गोष्टी खटकल्या.
"आणि ते सर्वजण सुखाने नांदू लागले, साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण" या धर्तीवर केलेला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment