Apr 1, 2016
दिलदार अक्षय कुमार
एबीपी माझा वरील 'माझा कट्टा' या कार्यक्रमात अलीकडेच सुपरस्टार अक्षय कुमारने हजेरी लावली.
अक्षय कुमारची संवेदनशीलता त्याने आपल्या चर्चेत नमुद केलेल्या अनेक मुद्यांमध्ये दिसुन आली.
राज्यातील दुष्काळ आणि त्यामुळे शेतकरीवर्गावर ओढवलेली परिस्थिती, वाढत्या आत्महत्या, त्यांच्या मदतीसाठी आवश्यक निधी यावर त्याने परखडपणे
आपली मनस्वी मते मांडली.
आपल्या उत्पन्नातील निम्मा वाटाही शेतकऱ्याला देण्याची तयारी असल्याचे दिलदारपणे खुलेआम केलेले विधान वाखाणण्याजोगे आहे.
त्याचं व्यक्तिगत आयुष्य, त्याचे चित्रपट, पडद्यामागच्या कलाकारांची विशेषतः स्टंटमॅनची मेहनत, महिला सशक्तीकरण व समानता आणि देशातली राजकीय परिस्थिती ह्याही विषयांवर तो दिलखुलासपणे बोलला.
आपला कुठलाही चित्रपट किंवा मालिका प्रदर्शनाच्या मार्गावर
नसताना एखाद्या कलाकाराने अशा कार्यक्रमात हजेरी लावणे आजकाल दुर्मीळच!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment