Mar 12, 2016
मराठीतील चार्ली
प्रख्यात 'सर चार्ली चॅप्लिन' त्यांच्या विनोदी ढंगाच्या मूकाभिनयाने भरपूर हासू आणि सरतेशेवटी थोडेसे आसू देऊन जगातल्या कुठल्याही कोपर्यातल्या प्रेक्षकावर गारुड करू शकले!
या महान कलाकाराला आपल्या अभिनयाद्वारे मानवंदना देण्याचे शिवधनुष्य, विनोदी अभिनेता 'समीर चौगुले' यांनी कलर्स मराठी वरील 'काॅमेडीची बुलेट ट्रेन' या मंचावर लीलया पेलले आहे. मागील आठवडय़ात त्यांनी रंगवलेला 'चार्ली चॅप्लिन' पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक 'सरप्राईज' होते.
मराठीत भल्याभल्या मातब्बर मंडळींनीही आजवर जे आव्हान स्वीकारले नाही ते काॅमेडी शो मधील अवघ्या पंधरा मिनिटाच्या स्कीट मध्ये समीर चौगुले यांनी साकार करून चार्लीच्या चाहत्यांना जणू 'ट्रीट' दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment