Feb 22, 2016
जय मल्हार मध्ये 'लॅब्रेडाॅर'!!!
दूरदर्शनच्या रामायण व महाभारत या मालिकांपासून देवादिकांच्या मालिकेचा ट्रेंड प्रेक्षकांनी आपलासा केला. सध्या झी वाहिनीवर सुरू असलेली 'जय मल्हार' ही पौराणिक मालिका देखील जगभरातील
मराठी जनमानसात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील पात्रे, त्यांचे पेहराव आणि भाषा, संबंधित देखावे इत्यादी अनेक गोष्टी हुबेहूब पुरातन पध्दतीने करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.
याच मालिकेत मागील आठवडय़ात प्रक्षेपित करण्यात आलेल्या एका भागात जेजुरीत वाजतगाजत श्वान राजाचे आगमन झाले. परंतु 'मल्हारी मार्तंड' देवाच्या दरबारात आलेले हे 'श्वान राजे' चक्क 'लॅब्रेडाॅर' रुपात अवतरले. कलीयुगात येणार्या आपल्या विदेशी अवताराची श्वान महाराजांनी पुराणातच झलक दाखवली होती असं बहुदा लेखक महाशयांना सूचित करायचे असावे. वास्तविक पाहता ही श्वान प्रजाती इंग्रजांनी भारतात आणली त्यामुळे मालिकेतील प्रसंगात हे श्वान भारतीय प्रजातीचे असले पाहिजे होते. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असल्या गोष्टी दाखवणं आपण कधी थांबवणार आहोत?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment