Feb 8, 2016
होम मिनिस्टर
'दार उघड बये, दार उघड' अशा आरोळीच्या शीर्षक गीताने गेली बारा वर्षे महाराष्ट्रातील घराघरात नित्य नेमाने
आनंदाची उर्जा घेऊन येणारे 'आदेश
बांदेकर' यांचे प्रकृती अस्वास्थ्या नंतरचे जोरदार पुनरागमन बघून समस्त महिला वर्गाचे काळीज आनंदाने सुपाएवढे झाले.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर एक तासाच्या महाएपिसोडने पुन्हा
सुरूवात झालेल्या या कार्यक्रमात
त्यांचा 'विषाची परिक्षा' देण्याचा अनुभव त्यांच्याच शब्दातून ऐकताना सर्वांच्याच
डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
या महाएपिसोड ची सांगताही कार्यक्रमाच्या लौकिकाला साजेशी अशीच झाली. विजेती आणि अविजेती झालेल्या दोन्ही स्पर्धकांना सौहार्दाचे प्रतीक म्हणून मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या अनपेक्षित निर्णयाने होम मिनिस्टर या कार्यक्रमाविषयीची आत्मियता व अनुषंगाने 'आदेश भाऊजीं' बद्दलचा आदर द्विगुणित झाला.
या पुढे देखील होम मिनिस्टर ची वाटचाल अखंड सुरू राहो व आदेश भाऊजींची प्रकृती उत्तम राहो हीच सदिच्छा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment