Apr 1, 2016
राजकारण नव्हे, खेळ महत्वाचा
टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया बरोबरच्या सामन्यात पाकिस्तानी संघाचा अत्यंत दारूण पराभव झाला. सामन्यानंतरच्या मुलाखतीतील कर्णधार 'शाहिद आफ्रिदीने' काश्मिरी जनतेचे आभार मानले. "आम्हाला खेळताना काश्मिरी क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळाला" असे म्हणून त्याने त्याबद्दल जाहीर आभार प्रदर्शन केले.
हे विधान करण्यामागचे त्याचे उद्दिष्ट व विचारधारा काय आहे हा एक संपूर्ण वेगळा चर्चेचा विषय असला तरी काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे हे आफ्रिदीने लक्षात घ्यावे.
सध्या तरी, राजकारण आणि खेळ या सर्वस्वी दोन वेगळ्या विषयाची सरमिसळ न करता स्वतःच्या व संघाच्या खेळ पट्टी वरील कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे जास्त उचित ठरेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment