Jul 23, 2016
#कबाली
आजचा दिवस #Kabali Day होता असे म्हणायला हरकत नाही. 'रजनीकांत'सरांच्या जोक्सना परत एकदा महापुर आला.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात दिवसभर
"बघा, तिकडे चेन्नई, बेंगलोरच्या लोकांना बरी पिक्चर बघायला सुट्टी मिळाली" असा विचार राहून राहून येत होता.
मुंबईत सरांच्या पोस्टर्सना तर दुग्धाभिषेक करण्यात आला आणि चेन्नईत त्यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली असेही वाचण्यात आले.
पुढचे काही दिवस अशा अनेक थक्क करण्याऱ्या, अचंबित व्हायला लावणाऱ्या नवनवीन #Kabali बद्दलच्या सुरस गोष्टी आपल्याला ऐकू येत राहतील.
परंतु बातम्या मधील शो हाऊसफुल्लच्या गोष्टी ऐकताना, थेटर समोरील लोकांचा पहाटे 3 पासून ढोलताशांसह सुरु असणारे सेलिब्रेशन पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली की गरीब-श्रीमंत, हिंदू-मुसलमान, असंख्य जातीजमाती मधील लोक एकाच कारणासाठी
एकत्र येऊन एक होऊन हा #Kabali नावाचा नवीन सण जल्लोषात साजरा करत आहेत
'हेही अर्थातच नसे थोडके'
-
प्रज्ञा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment