2016 च्या जानेवारी महिन्यापासून पंतप्रधान
#मोदी सरांनी अपंगांना '#दिव्यांग' म्हणा असा आदेश दिला. अजुन तरी हा शब्द समाजात रुळलेला नाही, आपलासा झाला नाही. याचे कारण म्हणजे हा शब्द कितीही संस्कृताळलेला असला, वाचायला-म्हणायला चांगला वाटला, त्या मागचा हेतू चांगला असला तरी उगाचच एखाद्याचे र्दुर्दैवी अपंगत्व अधोरेखित केल्यासारखे वाटते.
आपल्या आसपासच्या एखाद्याला मनातल्या मनात जरी 'दिव्यांग' म्हंटले तरी काळजाचा ठोका चुकतो.
आपल्यातीलच तर आहेत की हे सगळे, फक्त काही शरीराने अधु असतात, काही बुध्दीने तर काही सदसद्विवेक बुद्धीने!!
-
प्रज्ञा
No comments:
Post a Comment