Nov 30, 2015

व्यक्ती स्वातंत्र्य

नमस्कार, आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर हा एक आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्स तसेच वाॅट्सप वैयक्तिकच नव्हे तर बरेचदा ऑफिशियल कारणासाठीही वापरले जाते. प्रत्येकाच्या वाॅट्सपवर एकतरी ऑफिशियल ग्रूप असतोच! त्यामुळे त्याचा सतत वापर होणार ही वस्तूस्थिती आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काही नियम मात्र काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे आहे  'व्यक्तीस्वातंत्र्य' आणि प्रत्येकाची 'स्पेस' जपणे. समोरची व्यक्ती आपला जोडीदार किंवा इतर कोणतीही जवळची नातलग असली तरी तिच्या अपरोक्ष मोबाइल चेक करणे आणि त्यावर सवाल जवाब करणे हा एकप्रकारचा मनोविकारच आहे. त्याचबरोबर समोरच्याने एखादी गोष्ट 'सांगितली नाही' म्हणजे ती 'लपवली' असा अर्थ काढु नये. कामाच्या गडबडीत किंवा कधीकधी कमी महत्वाची वाटल्यामुळे ती सांगीतली जात नाही हे समजून घ्यायला हवे. त्याचबरोबर 'पारदर्शकता' आणि 'क्षमाशील पणा' ही तितकाच महत्त्वाचा! 'चुक' ही प्रत्येकाकडून होते; कधी नकळत कधी चुकुन तर कधीकधी चक्क मुद्दाम!! त्यामुळे कधी अशी चुक निदर्शनास आली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करावी. व.पु काळेंच्या 'पार्टनर' या पुस्तकातील एक वाकय खुप समर्पक आहे, "नाते नवराबायकोचे असो वा रक्ताचे ते गुलाबाच्या फुलाप्रमाणे असावे. कळी पासून पाकळ्या जितक्या दुरवर फुलतील तितके फुलाचे सौंदर्य अधीक खुलून दिसते".

Nov 28, 2015

स्त्री प्रधान मालिका

प्रत्येक वाहिनीवरील जवळजवळ सर्वच मालिका स्त्री प्रधान असल्या तरी त्यात आजच्या काळातील स्त्रीचे वास्तव दर्शी चित्र खुप कमी दाखवले जाते. त्यातील स्त्री अगदी सौजन्याचा कळस असते किंवा खलनायिका तरी!

महिलावर्ग या मालिका पाहताना त्यातील व्यक्तिरेखांशी स्वतःला रिलेट करतात. त्यात दाखवल्या जाणार्‍या परिस्थितीची त्या आपल्या घरात सांगड घालतात. परंतू मालिकांमधले विचार घरात रुजवताना वास्तव मात्र निराळे असल्यामुळे घरगुती नात्यांमधे दुरावा निर्माण होतो.

माझ्या लहानपणी आठवणीतील
मालिकांमध्ये एक होती ‘उडान’, आणि दुसरी होती ‘रजनी.’ या मालिकांमधील व्यक्तीरेखांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक मुलीला ‘उडान’मधली हुशार व कर्तृत्ववान
कविता आणि 'रजनी'सारखं खंबीर आणि सडेतोड व्हायचं होतं . त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या
तुलसी किंवा पार्वती व्हायचं होतं.

आजच्या घडीला समाजातील वाईट चालीरीती व दुष्ट प्रवृत्ती ला तोंड देण्यासाठी गरज आहे स्त्रीला शारीरिक व मानसिक रित्या सशक्त व धीट बनवण्याची!

टीव्ही हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच टिव्ही ची जबाबदारीही मोठी!  चांगली किंवा वाईट अशा व्यक्तीरेखा रंगवण्यापेक्षा आजच्या काळात गरज आहे ती खंबीर, सशक्त, सारासार विचार करणारी,
सदसद्विवेक बुद्धीची व न्यायासाठी झगडणारी परंतु त्याचबरोबर आपल्या घराचे घरपण आणि नाती जपणाऱ्या नायिकेची!

सेन्सॉर बोर्ड चा नियम

सेन्सॉर बोर्डाच्या नवीन पत्रकानुसार असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांना कात्री लावली जाणार हा नियम खरोखरच स्वागतार्ह आहे. प्रत्येक काळातील पिढी आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करत असते. त्यामुळे चित्रपटातील भाषा, संवाद, उच्चार यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.

मराठी भाषा ही मुळातच खुप प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे. आपल्याला
समृध्द मराठी साहित्याची परंपरा पूर्वापार लाभली आहे. चित्रपट हे प्रेक्षकांसाठी करमणूकीचे माध्यम असले तरी चित्रपट बनवणाऱ्यानी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला लाभलेल्या या मराठी साहित्याच्या खजिन्याचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत तो पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

सोशल नेटवर्क चा दुरुपयोग

नमस्कार,

सोशल नेटवर्किंग साइट्सचा जेवढा सदुपयोग होतो तेवढाच दुरूपयोगही होताना दिसून येतो. मुले पळणार्‍या टोळी पासून सावध राहा, देवादिदेवांचे फोटो अमुक जणांना फॉरवर्ड करा म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळेल
इथपासून ते हयात नसलेल्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांची टिंगल करण्यापर्यंत अशा मस्करीची मजल जाते.
मग या मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. कारण समाजातील दुर्बल घटकांवर अशा अफवांचा वाईट परीणाम होतो.
सायबर गुन्हे शाखेच्या वतीने या अशा प्रकारच्या गंभीर अफवांना वेळीच आळा घालण्यात यावा.

Nov 27, 2015

मालिकेतील भाषा

आपली भाषा व उच्चार
सुस्पष्ट आणि अस्खलित असावे हे खरे असले तरी त्याच्या अतिरेकाने मात्र भाषेचा गोडवा संपतो.

अशीच काहीशी अवस्था झाली आहे मराठी मालिकेतील कलाकारांची.
रोजच्या आयुष्यातील सर्वसामान्य बोलणेही ती फारच हळू व खालच्या पट्टीत व अवजड शब्दात बोलते. त्यामुळे तिची मराठी भाषा ही शुद्ध न वाटता कृत्रिम वाटते.

सोशल नेटवर्किंग

सोशल नेटवर्किंग साइट्सचा जेवढा सदुपयोग होतो तेवढाच दुरूपयोगही होताना दिसून येतो. मुले पळणार्‍या टोळी पासून सावध राहा, देवादिदेवांचे फोटो अमुक जणांना फॉरवर्ड करा म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळेल
इथपासून ते हयात नसलेल्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांची टिंगल करण्यापर्यंत अशा मस्करीची मजल जाते.
मग या मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. कारण समाजातील दुर्बल घटकांवर अशा अफवांचा वाईट परीणाम होतो.
सायबर गुन्हे शाखेच्या वतीने या अशा प्रकारच्या गंभीर अफवांना वेळीच आळा घालण्यात यावा.

अच्छे दिन!!!!??

अच्छे दिन आयेंगे' या आशेवर दरवर्षी प्रमाणे
यंदा ही सर्व सामान्य जनता अर्थसंकल्पाची वाट पहात होती. मात्र महागाईचा डोंगर उभा करून जनतेच्या हातावर सपशेल तुरी देण्यात आली आहे.
सेवाकरात वाढ करून
सुई दोऱ्या पासून ते गाडी पर्यंत सर्व गोष्टीच्या किमतीत करण्यात आलेली वाढ अत्यंत निराशाजनक आहे.

घडामोडी

फडणवीस सरकारने सत्तेवर येताच महाराष्ट्रात लागू केलेला
गोहत्या बंदी कायदा स्वागतार्ह आहे.

हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते. 33 कोटी देव जिच्या पोटात सामावले त्या गोमातेला अगदी तिच्या वृध्दावस्थेपर्यंत सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवणे हे फक्त हिंदू धर्म म्हणून नव्हे तर मानव धर्म म्हणून आपले परम कर्तव्य आहे.

सुपर मार्केट ची सुपर स्कीम

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
मॉल्स, सुपर मार्केट येथील वस्तूंच्या किंमती
रूपये 199, 299,.... अशा अपूर्ण असतात.
वस्तू विकत घेतल्यावर राहिलेला एक रुपया
बरेच ग्राहक परत मागत नाहीत
व समोरूनही कधीच परत केला जात नाही.
अगदी मागीतलाच तर त्या ऐवजी चाॅकलेट दिले जाते.

या एक रुपयाची पावती दिली जात नाही वा कोणत्याही प्रकारची कोठे ही नोंद केली जात नसल्याने यावर कर भरावा लागत नाही व हे काळे धन जाहिररित्या राजरोसपणे संबंधीत अधिकार्यांच्या खिशात जाते.

चला हवा येउद्या

झी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली सध्या थिल्लरपणा सुरू आहे. सागर कारंडे,
भालचंद्र कदम, भारत गणेशपूरे हे गुणी
कलाकार एरवी इतर नाट्य-अविष्कारांमध्ये,  मालिकांमध्ये उत्कुष्ट अभिनय करत असले तरी त्यांनी
'हवा येऊ द्या' या कार्यक्रमात करत असलेले
तेच तेच जुने विनोदाचे पंचेस, घसरत चाललेला विनोदाचे दर्जा, पाचकळपणा आता आवरता घ्यावा. 'हसवणे' हे या जगातील सगळ्यात कठीण काम आहे. आणि याच हेतूने सुरू झालेल्या या कार्यक्रमात दर्जेदार आणि खळखळून हसवणारी विनोद निर्मिती करावी हीच अपेक्षा आहे.

व्हाॅट्सप विषयी!

व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा  असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्‍यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी  असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.

'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता  बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

व्हाॅट्सप वर

Nov 25, 2015

बाल विश्व

दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान
मुलांसाठी मराठीत
किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या.

परंतु टिव्हीवर
आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम
कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत.

बालविश्वावरील
कार्यक्रम सुरू झाले तर
प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला
टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.

बालविश्व

Nov 23, 2015

मराठी मालिकेतील भाषा

आपली भाषा व उच्चार
सुस्पष्ट आणि अस्खलित असावे हे खरे असले तरी त्याच्या अतिरेकाने मात्र भाषेचा गोडवा संपतो.

अशीच काहीशी अवस्था झाली आहे मराठी मालिकेतील कलाकारांची!

रोजच्या आयुष्यातील सर्वसामान्य बोलणेही ती फारच हळू व खालच्या पट्टीत व अवजड शब्दात बोलते. त्यामुळे तिची मराठी भाषा ही शुद्ध न वाटता कृत्रिम वाटते.

कट्यार काळजात घुसली - रिव्ह्यू

दिवाळी च्या मुहूर्तावर
सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' हा  चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांना दिवाळीची संगीतमय भेटच आहे.

नाटक किंवा पुस्तकावर आधारित चित्रपटाबद्दल नेहमीच वाटतं की ओरिजनल ते ओरिजनल, जुने ते सोने, परंतु या चित्रपटाच्या बाबतीत
मात्र असे वाटत नाही.  आपण थिएटरबाहेर पडल्यावरही हा सिनेमा मनात रुंजी घालत राहतो.
असेच उत्तमोत्तम प्रयोग होत रहावेत जेणेकरून अजरामर संगीत नाटके पुनरूज्जिवित होतील व
नवीन पिढीला नाट्य संगीताची ओळख होऊन व आवड निर्माण होईल.

Nov 22, 2015

कलाकारांची रिप्लेसमेंट

'का रे दुरावा ' मधील रिसेप्शनीस्ट नैना असो वा 'होणार सून मी ह्या घरची' मधील 'श्री' चे बाबा असो; टिव्ही मालिकांमधील ही अशी महत्वाची पात्रे बराच काळ गायब असणे हे प्रेक्षकांसाठी नवीन नाही. हा सगळा प्रकार 'प्रेक्षक समजून घेतील' किंवा 'त्यांना काही कळणार नाही' अशा भावनेने प्रेक्षकांना कायमच गृहीत धरले जाते.

सामान्य प्रेक्षक हा त्याला आवडणारी
मालिका,त्यातील कलाकार यांच्यात भावनिक दृष्ट्या गुंतत जातो. त्यातील पात्रे, कलाकार  त्याच्या जवळची माणसे वाटू लागतात. त्यामुळे एखाद्या पात्रांची बराच काळ असणारी अनुपस्थिती मालिका संपल्यावरही जाणवत राहते, कधी उत्सुकतेने तर कधी काळजीपोटी!

अनेकवेळा कलाकारांच्या काही समस्यांमुळे, कधी बिझी शेड्यूल्डमुळे तर कधी भूमिका न आवडल्यामुळे कलाकार मालिका सोडतात हे आजचा सुजाण प्रेक्षक समजू शकतो. परंतू तरीही जर काही कारणास्तव मालिकेच्या ट्रॅक मध्ये, कलाकारांमध्ये जर असे काही बदल होणार असतील तर प्रेक्षकांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना मालिका सुरू होण्याआधी चॅनलने, निर्माता-दिग्दर्शकाने दिली पाहिजे. 

Nov 20, 2015

ताणमुक्ती

कितीही प्रयत्न केला तरी
आपण टेन्शन घेणे बंद करू शकत नाही पण तरीही ते कमी नक्कीच करू शकतो.

एखादी आवडती डिश, कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावं असे छानसं गाणं, खळखळून हसवणारी आप्तस्वकीयांची सोबत किंवा तशीच एखादी आठवण हे साधेसुधे उपायही मनावरचा ताण थोडाफार तरी हलका करतात.

वपूर्झा मध्ये व.पु. काळे यांनी समर्पक शब्दात  'ताण' या विषयावर मत व्यक्त केले आहे-

"मुर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं सतत शोधण्याचा आणी त्याची पुर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो. त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो."

त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक विचारसरणीच्या व तुमचा द्वेष करणार्‍या व्यक्तींना दुर ठेवले तर अर्धा ताण तिथेच कमी होतो.

Nov 18, 2015

व्हाॅट्सप विषयी!

व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा  असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्‍यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी  असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.

'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता  बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Nov 15, 2015

आशयघन मराठी चित्रपट

दशकभरा पूर्वी कुंकू, बांगड्या आदी सौभाग्य वस्तू भांडारा भोवती फिरत असणारे विषय व तशीच शीर्षके असणार्‍या मराठी चित्रपटाने चांगलीच कात टाकली आहे.

मागील काही वर्षांतील प्रदर्शित झालेल्या
मराठी चित्रपटांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की सध्या वेगवेगळ्या विषयांवरील व सामाजिक स्तरावरील अतिशय संवेदनशील विषय हाताळण्यात येत आहेत.

लोकमान्य टिळक, किल्ला, शुगर, साॅल्ट आणि प्रेम, देऊळ बंद, संदूक, मर्डर मेस्त्री ही त्यातील काही ठळक उदाहरणे!

अशा प्रकारे महाराष्ट्राला लाभलेली
समृध्द मराठी कथा कविता
साहित्याची परंपरा अशा चित्रपट माध्यमातून नवीन पिढीला व देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी रसिकां पर्यंत पोहोचवता येईल. 

Nov 14, 2015

झीरो फिगर की हेल्दी फिगर!

कॉलेज लाईफ मध्ये असलेली सडपातळ झीरो फिगर असण्या पेक्षा निरोगी आणि सुदृढ असणे जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते.

वयानुसार,  आपल्या कामाच्या स्वरूपानुसार व मुख्यत्वे आनुवंशिकते नुसार आपल्यात झालेले बदल आपण लवकरात लवकर सकारात्मकपणे स्विकारायला हवेत.

अति डाएट वा अति व्यायाम करून बारीक होण्याचा अट्टाहास करून तब्येतीची हेळसांड करण्यात काहीच अर्थ नाही.

त्यापेक्षा शक्य तेवढे घरचे जेवण, योग्य व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणविरहित जीवनचर्या या गोष्टींना प्राधान्य द्यावे.

Nov 13, 2015

आत्म निरिक्षण व परिक्षण- पालकांचे!

एकतर्फी किंवा अपयशी प्रेमातून प्रियकराने प्रेयसीची केलेली हत्या ही खरोखरच खूप
दुर्दैवी बाब आहे.

वरवर पाहता हे फिल्मी जरी वाटत असले तरी इतका भयानक प्रकार चित्रपटातही खुप अभावाने बघायला मिळतो.

अशा घटनांचे वाढते प्रमाण, त्यातील अघोरीपणा व क्रौर्य
हे मानसिक अनारोग्याचेच लक्षण दिसुन येते. अशा मानसिकतेला बर्‍याच प्रमाणात कौटुंबिक पार्श्वभूमीच कारणीभूत ठरते.

लहानपणापासून सतत बघायला लागलेले आईवडीलांमधील कलह, मतभेद, कौटुंबिक हिंसाचार, भावंडांमध्ये कायम मिळणारे दुय्यम स्थान, नेहमीच केली गेलेली तुलना!
वर्षानु वर्षे या सर्व प्रकारामुळे मानसिक तोल ढळला जातो व आपल्या प्रेमाच्या व्यक्तीनेही आपल्याला महत्त्व दिले नाही ही असह्य
भावना प्रबळ होऊन असे निर्घृण कृत्य करण्यापर्यंत व्यक्तीची मजल जाते. खेदाची बाब म्हणजे याचा कोणताही पश्चातापही गुन्हेगाराला होत नाही इतके त्याचे मन निर्ढावलेले असते.

त्यामुळे आता गरज आहे ती प्रत्येक पालकांनी, कुटुंबाने आत्म परिक्षण व आत्म निरिक्षण करण्याची!