Aug 28, 2015

डबल सीट - रिव्ह्यू

प्रयत्न,  जिद्ध आणि परिश्रमांमुळे आपण बघीतलेली स्वप्ने पूर्ण होऊ शकतात हे सांगणारी मध्यम वर्गीय कुटुंबाची गोष्ट म्हणजेच 'डबल सीट' हा एक अत्यंत सुंदर सिनेमा काहींना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणारा तर काहींना आपल्या वर्तमानाशी मिळताजुळता वाटणारा आहे.

संवाद, अभिनय, संगीत, छायांकन सर्वच बाबतीत या चित्रपट अव्वल दर्जाचा ठरतो.

स्वप्न बघणे व त्या स्वप्नांची पूर्तता होणे या मधल्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, मनोधैर्य व चिकाटी लागते याचे भान हा चित्रपट करून देतो.

अशाच  वास्तव दर्शी व आशयघन
चित्रपटांची निर्मिती होत राहीली तर
काही वर्षांपूर्वी कुंकू, बांगड्या आदी सौभाग्य वस्तू भांडारा भोवती फिरत असणारे विषय व तशीच शीर्षके असणार्‍या मराठी चित्रपटाने  कात टाकली असे म्हणायला हरकत नाही.