Nov 13, 2015

आत्म निरिक्षण व परिक्षण- पालकांचे!

एकतर्फी किंवा अपयशी प्रेमातून प्रियकराने प्रेयसीची केलेली हत्या ही खरोखरच खूप
दुर्दैवी बाब आहे.

वरवर पाहता हे फिल्मी जरी वाटत असले तरी इतका भयानक प्रकार चित्रपटातही खुप अभावाने बघायला मिळतो.

अशा घटनांचे वाढते प्रमाण, त्यातील अघोरीपणा व क्रौर्य
हे मानसिक अनारोग्याचेच लक्षण दिसुन येते. अशा मानसिकतेला बर्‍याच प्रमाणात कौटुंबिक पार्श्वभूमीच कारणीभूत ठरते.

लहानपणापासून सतत बघायला लागलेले आईवडीलांमधील कलह, मतभेद, कौटुंबिक हिंसाचार, भावंडांमध्ये कायम मिळणारे दुय्यम स्थान, नेहमीच केली गेलेली तुलना!
वर्षानु वर्षे या सर्व प्रकारामुळे मानसिक तोल ढळला जातो व आपल्या प्रेमाच्या व्यक्तीनेही आपल्याला महत्त्व दिले नाही ही असह्य
भावना प्रबळ होऊन असे निर्घृण कृत्य करण्यापर्यंत व्यक्तीची मजल जाते. खेदाची बाब म्हणजे याचा कोणताही पश्चातापही गुन्हेगाराला होत नाही इतके त्याचे मन निर्ढावलेले असते.

त्यामुळे आता गरज आहे ती प्रत्येक पालकांनी, कुटुंबाने आत्म परिक्षण व आत्म निरिक्षण करण्याची!

No comments:

Post a Comment