Jul 31, 2017

#मुबारका

#चला हवा येऊ द्या मध्ये या आठवडय़ात मुबारकाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर आणि अर्जुन कपूर आले. मान्य करावेच लागेल की अर्जुनपेक्षा अनिल कपूरच साॅलीड एनर्जेटिक वाटतो. पुतण्यासाठी मेहनत घेतोय जिकडे तिकडे प्रमोशन करून. 'काका मला वाचवा' या हाकेला ओ देऊन अनिल काका वाचवायचा प्रयत्न करतायत. पण काय आहे ना, की तो अर्जुन कपूर सिंगल रोल मध्येही बघवत नाही. आणि या सिनेमात तर तो डबल रोल आहे म्हणे. अब होनी को कौन टाल सकता है? #chyd #zeemarathi #mubaraka #fridayrelease #bollywood

Jul 23, 2017

#गटारी आणि #डिमाॅनीटायझेशन

परवा एका कामासाठी बाहेर गेले होते. रस्त्यात येताना एक दोन अपेयपानाची दुकाने दिसली, तिथे अपेय घेण्यासाठी भल्यामोठ्या, लांबच लांब रांगा लागल्या होत्या. .. .. मुद्दा हा आहे की तिथे गर्दी व रांगा असुनही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की, ढकलाढकली, गोंधळ आढळला नाही. नोटबंदीच्या काळात रांगा लावताना जशी रांगेत आजारपणं, अपघात आणि काही दुर्दैवी घटना घडल्या, पोलीस बंदोबस्त तैनात करायला लागला तशी आणीबाणीची परिस्थिती तिथे कुठेही अज्जिबात नव्हती. सगळे कसे शिस्तबद्ध, आलबेल होते. मानसशास्त्रात हा मुद्दा एक अभ्यासाचा धडा म्हणून अॅड करायला हवा. #gatari #effect #monetisation #humanmentality #Psychology

Jul 21, 2017

मिडीया आणि टीआरपी

कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आजच्या मीडियाला कळतं पण वळत नाही. त्यांची पत्रकारीता फक्त TRP तच मोजली जाते. समाजासाठी काय महत्वाचं आहे ते TRP पेक्षा महत्वाचं नाही. पालिकेलाही एका पावसात रस्त्यांना पडलेले खड्डे दिसले नाहीेत पण एका गाण्याने त्यांच्या अब्रूला पडलेले खड्डे मात्र लगेच जाणवले. वर पाऊसच इतका पडतो त्याला कोण काय करणार असं 'हतबल' statement देऊन बाळराजे मोकळे झाले. आता आम्हीच निवडून दिलंय तुम्हाला त्याला तुम्ही तरी काय करणार? #media #malishka #trp

Jul 20, 2017

मलिष्का ........

सद्य परिस्थितीत रातोरात बाकीचे सगळे सामाजिक, आर्थिक, राजकीय विषय बासनात गुंडाळले गेले. फक्त आणि फक्त, मलिष्का आणि तिने गायलेले गाणे रडार वर आले आहे. बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रात प्रमुख बातमी मलिष्का, तिचे गाणे आणि त्यात तिच्या घरी सापडलेल्या डेंग्यूच्या अळ्या हीच वाचायला मिळत आहे. शेतकरी समस्या, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, आणि सगळ्यात महत्वाचा विषय - #GST. ह्या सगळ्या घडामोडी आणि त्याचे अपडेट्स अचानक दुय्यम स्थानावर गेले आता मलिष्काने लोकांची दूखती रग गाण्यातून विस्तारित केली आहे. पण या आधीही पथनाटय़, विडंबन गीते इत्यादी लोककला प्रकारातून जनतेचे म्हणणे मांडले जातच आहे की. मग अब्रुनुकसान, बदनामी, इगो, मानसिक खच्चीकरण हे सगळे मुद्दे पुढे करून आणि अरे ला कारे करून, गाण्याला गाण्यातून व्यक्त होऊन सर्वांचाच कार्यकालीन वेळ विनाकारण दवडला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Jul 15, 2017

#MPK

1989 ला म्हणजे शाळेत सहावी की सातवीला वगैरे असताना मैने प्यार किया प्रदर्शित झाला. आणि त्याच्या 2 वर्षे आधी कयामत से कयामत तक. तेव्हा सलमान आणि आमिर आवडत नाही अशी बहुधा एकही शाळकरी किंवा काॅलेज गोईंग व्यक्ती नसायची. घरी व्हीडीओवर व्हीसीआर, व्हीसीपी आणून सिनेमा बघायचा तो काळ. पण... आता मात्र... मागच्या काही वर्षांतल्या सलमानच्या कारनाम्यांमुळे त्याचा आख्खा सिनेमाच नाही तर टिव्ही वरचा कोणता शो ही पाहायची ईच्छा होत नाही. नुकताच तो कपिल शर्मा शो मध्ये ट्युब लाईट च्या प्रमोशन साठी आला होता. ओढून ताणून हिरो ची 'पोस्ट' पकडून ठेवण्याच्या नादात त्याचा जो 'अवतार' झालाय तो पाहता तर तो आता एक मिनीट भर ही सहन होत नाही. कसे काय त्याचे सिनेमे 'कोटीच्या कोटी उड्डाणे' करतात काय माहीत! #bollywood #salman #tkss #mpk

Jul 14, 2017

टाईम पास

काही चेहरे पारोसे असले तरी नुकतेच अभ्यंग स्नान केल्यासारखे कायम ताजेतवाने दिसतात... तर काहींना.... नुकतीच अंघोळ केली असली तरी.. 'अरे आळशी माणसा, किती वेळ अजून पारोसा राहणार आहेस, जा..निदान चार तांबे तरी ओतून ये डोक्यावर'.. असे टोमणे ऐकावे लागतात.

Jul 11, 2017

पंढरीची वारी

गेल्या काही वर्षांपर्यंत दर आषाढी कार्तिकी एकादशीला दूरदर्शन वर ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट आवर्जुन दाखविला जायचा. 'धरिला पंढरीचा चोर' आणि 'अवघी विठाई माझी' ही त्यातील गाणी अजुनही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात विठुमाऊलीची भुमिका करणारा बाल कलाकार होता 'बकुळ कवठेकर'. चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर लगेचच त्याचा गोंडस चेहरा डोळ्यासमोर येईल. पण बर्‍याच जणांना माहीत नसेल की पुण्यातील भारती विद्यापिठात ‘फाईन आर्ट’च शिक्षण घेत असताना बकुळ चा ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने 2002 साली अकस्मात मृत्यु झाला. आज बकुळ असता तर तो नक्की काय करत असता माहित नाही, पण आपण एक चांगला ‘कलाकार’ गमविला याच दु:ख मात्र नक्कीच राहील. #memorablefilm #marathimovie #childactor

Jul 10, 2017

गुरुपोर्णिमा

आज आई आणि बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏💐 #courtesy #whatsapp

Jul 9, 2017

शुभेच्छा

दो दिवाने शहेर मे. . रात मे और दोपहर मे.. साबुदाना... ssss ओ साबुदाना. .sss ढुंढते है थोडा साबुदाना. . ढुंढते है! - आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! त्या विठुरायाचा आशिर्वाद कायम आपल्या बरोबर राहो!!

Jul 2, 2017

#GST

We Still Get Confused Between 'Push' & 'Pull'... तो फिर #GST समझने के लिये थोडा वक्त तो लगेगा ना! Give Some Time to Time! #gst #india #monetarypolicy