Nov 28, 2015

सेन्सॉर बोर्ड चा नियम

सेन्सॉर बोर्डाच्या नवीन पत्रकानुसार असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांना कात्री लावली जाणार हा नियम खरोखरच स्वागतार्ह आहे. प्रत्येक काळातील पिढी आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करत असते. त्यामुळे चित्रपटातील भाषा, संवाद, उच्चार यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.

मराठी भाषा ही मुळातच खुप प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे. आपल्याला
समृध्द मराठी साहित्याची परंपरा पूर्वापार लाभली आहे. चित्रपट हे प्रेक्षकांसाठी करमणूकीचे माध्यम असले तरी चित्रपट बनवणाऱ्यानी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला लाभलेल्या या मराठी साहित्याच्या खजिन्याचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत तो पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

No comments:

Post a Comment