May 27, 2015

बानुबया बानुबया' 

मोठ्या धुमधडाक्यात आणि थाटामाटात खंडेराय आणि बानुबाईचे लग्न पार पडले आणि प्रेक्षकांनीही ते अगदी भक्तीभावाने पाहिले. तरूण पिढीने देखील सोशल नेटवर्किंग साइट्स वरून या विवाहाच्या चर्चा केल्या. उच्च दर्जाची ग्राफिक्स तंत्रमूल्ये वापरण्यात आलेला हा नेत्रसुखद
सोहळा विलोभनीय झाला परंतु या लग्न सोहळ्यासाठी  'बानुबया बानुबया' हे
दाक्षिणात्य संगीत पध्दतीतील 'लुंगी डान्स' स्टाईलचे वाटणारे गाणे कितीही चाल किंवा ठेका धरायला लावणारे असले तरी ते मात्र पौराणिक वा देवाधिदेवांच्या कथेला न शोभणारे होते

संवाद लेखन आणि काउन्सिलिंग

होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतील महासोहळा २५ मे ला पार पडला.  सिनेरसिकांना
'एलिझाबेथ एकादशी' हा एक उत्तम चित्रपट देणार्‍या
मधुगंधा कुलकर्णी यांचे या मालिकेतही , विशेषतः या महासोहळ्यातील अप्रतिम लिखाण वाखाणण्याजोगे होते. यातील
प्रत्येक वाक्य प्रत्येक जण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात
रिलेट करू शकतो. दिग्दर्शक
मंदार देवस्थळी यांनीही अतिशय सुंदर रित्या ही लोकांसमोर आणली. अशा पद्धतीचे लिखाण एखाद्या मालिकेत फ़ार कमी वेळा आढळते. अनेक
घरांमधील हरवलेले संवाद पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हे एक मोठे 'काउन्सिलिंग' ठरले असेल यात शंकाच नाही. 

May 10, 2015

न्यायव्यवस्थेचा आदर

सलमान खानला सुनावली गेलेली शिक्षा हा सध्या एक राष्ट्रीय पातळीवरील
चर्चेचा विषय झाला आहे.
न्युज चॅनेल्स ते सोशल मिडिया, सर्वत्र सलमानची शिक्षा योग्य की अयोग्य,  आता फिल्म इंडस्ट्रीचे काय होणार हा एकच विषय चघळला जात आहे.

ह्या बातमीमुळे देशातील इतर राजकीय घडामोडी, शेतकरी आत्महत्या असो वा नेपाळ भूकंपाने लोकांचे
उध्वस्त झालेले आयुष्य, या सगळ्या गोष्टी  आपोआपच दुय्यम स्थानावर गेल्या.

गेली दोन दशके, सलमान खान आपली करमणूक करत आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट जिव्हारी लागणे साहजिकच आहे पण तरीही त्यानेच केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली आहे हे सत्य नाकारता येणार नाही.

भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वच जण समान आहेत ही गौरवास्पद बाब परत एकदा सिद्ध झाली आहे व एक नागरिक म्हणून आपण त्याचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.