Nov 15, 2015

आशयघन मराठी चित्रपट

दशकभरा पूर्वी कुंकू, बांगड्या आदी सौभाग्य वस्तू भांडारा भोवती फिरत असणारे विषय व तशीच शीर्षके असणार्‍या मराठी चित्रपटाने चांगलीच कात टाकली आहे.

मागील काही वर्षांतील प्रदर्शित झालेल्या
मराठी चित्रपटांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की सध्या वेगवेगळ्या विषयांवरील व सामाजिक स्तरावरील अतिशय संवेदनशील विषय हाताळण्यात येत आहेत.

लोकमान्य टिळक, किल्ला, शुगर, साॅल्ट आणि प्रेम, देऊळ बंद, संदूक, मर्डर मेस्त्री ही त्यातील काही ठळक उदाहरणे!

अशा प्रकारे महाराष्ट्राला लाभलेली
समृध्द मराठी कथा कविता
साहित्याची परंपरा अशा चित्रपट माध्यमातून नवीन पिढीला व देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी रसिकां पर्यंत पोहोचवता येईल. 

No comments:

Post a Comment