May 6, 2017

जेवण झालं का

राष्ट्रीय फुल - कमळ राष्ट्रीय फळ - आंबा राष्ट्रीय पक्षी - मोर .. .. राष्ट्रीय प्रश्न - .. .. .. .. .. J1 झाले का?

येळकोट येळकोट जय मल्हार

काही काही मालिका संपल्या यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागतोच. आताही तशीच परिस्थिती आहे 'जय मल्हार' च्या बाबतीत! इतर देवादिकांच्या मालिकांचे आपल्याकडे जसे मनापासून स्वागत होते तसेच जय मल्हारचेही झाले. या मालिकेचे कथानक नविन होते. चपखल स्टारकास्ट, शीर्षक गीत, संगीत, अॅनिमेशन दृश्ये, भरजरी वस्त्रे आणि दागदागिन्यांची नेत्र सुखद भव्यता, चंपासष्ठी महत्त्व व चैत्रउत्सवाची माहिती या सर्व जमेच्या बाजु असलेल्या मालिकेचा कथेचा गाभा मात्र बरेचदा डळमळीत झाला. पाणी घालून, खेचत ताणत मालिका सुरू राहिली. विशेषतः बानु-म्हाळसा यांना पुर्वजन्माची आठवण हा विषय जवळपास सहा महिन्या पेक्षा जास्त सुरू होता. देवांच्या मल्हारी मार्तंड अवतारात घडलेले अजुनही बरेच रंजक किस्से, चमत्कार, पराक्रम प्रेक्षकांना बघायला, समजुन घ्यायला आवडले असते. परंतु मालिकेत बानु-मल्हारदेवांच्या विवाहानंतर तर ही मालिका प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याचा 'फिल' येत राहिला. असो. अंत भला तो सब भला. ओव्हर आॅल ही मालिका ज्येष्ठ नागरिकांकडुन वाखाणली गेली. आणि संध्याकाळी दिवेलागणीला जय मल्हार चे शीर्षक गीत ऐकू येणार नाही ही गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवेल . - .. .. ... येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट #झीमराठी #zeemarathi #jaimalhar #जयमल्हार #lastepisode Http://majheviewsanireviews.blogspot.in

एप्रिल आणि निकाल

काही काही दिवसाचे 'माहात्म्य'(!) आणि त्याच्याशी संबंधित भुतकाळ हे सर्व विसरायचे म्हटले तरी विसरले जात नाही. उदाहरणार्थ - 30 एप्रिल .. .. .. हो .. .. याच दिवशी दरवर्षी .. .. . शाळेचा रिझल्ट लागुन प्रगती पुस्तक हातात यायचे!

#बाहुबली

आधे ... .... .... उधर - बाहुबली देखने आधे... ..... ...... इधर गये - IPL देखने आणि उरलेले. . #झीमराठी बघतायत. #खुलताकळीखुलेना #तुझ्यातजीवरंगला #माझ्यानवर्याचीबायको Http://majheviewsanireviews.blogspot.in

घरोघरी मातीच्या चुली

ऑफिस मधुन तो लोकल ट्रेन चे धक्के खात एकदाचा घरी पोहोचतो. वेळे आधीच निघाल्याने तो जरा लवकरच घरी येतो. फ्रेश होऊन चहाचा कप घेऊन निवांत बसतो. IPL ची मॅच पाहायची असते पण 'घरोघरी मातीच्या चुली' या रिवाजा प्रमाणे आई आणि बायको टिव्हीच्या अतिगंभीर (?) सामाजिक (??) मराठी मालिका बघत असतात. दोघीही आत्ता रडतील की मग या expression मधे डोळ्याला अनुक्रमे साडीचा पदर आणि ओढणीचे टोक लावुन टिव्ही पाहण्यात गुंग असतात. तेवढ्यात ... त्या मालिकेत ( बहुदा का हे दिया परदेस टाईप असावी ) एका प्रसंगात अम्मा टाईप सासूचे आणि गौरीटाईप सुनेचे भांडण होते. बघता बघता आईची एक धारदार नजर मुलाकडे जाते , तो मुद्दाम खुप लक्ष देऊन टिव्ही बघत असल्याच्या आविर्भावात एकटक सिरियल पाहण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात. . मालिकेत दुसऱ्या प्रसंगात सून हमसून हमसून रडत असते. ते पाहून तिकडून बायको त्याच्याकडे तिरकस नजरेने बघते. तरीही तो परत मुद्दाम खुप खुप लक्ष देऊन टिव्ही बघत असल्याच्या आविर्भावात एकटक सिरियल पाहण्याचा प्रयत्न करतो. थोड्याच वेळात मग दोघींची नजर आपल्याकडेच आहे हे त्याच्या लक्षात येते. व तो चुपचाप उठुन परत घराबाहेर पडतो.

घरोघरी. ..

बरेचदा वरकरणी टापटीप दिसणार्‍या घरात एक तरी कोंबून कोंबून सामान भरलेले कपाट असते.

फौजी

आधी भाऊजी, मग राणाजी, मग शिवजी, गौरीजी, अम्माजी, बाबुजी, नानीजी आणि आता कोण तर.. .. .. .. फौजी! यह क्या हो रहा है जी! #झीमराठी #zeemarathi

पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना

एका फेसबुक पेज वर शेअर झालेला हा फोटो. प्रथम दर्शनी 'अरे वा किती छान फोटो' अशी प्रतिक्रिया मनात येईल. पण या चिमुकलीच्या आई वडिलांनी हे तिचे छोटे स्वयंपाक घर रचताना केलेला खर्च आणि वापरलेला वेळ मला अनाठायी वाटतो. जे काम जन्म भर करायचेच आहे ते काम व त्यातील इतके बारकावे या वया पासुन त्या चिमुकलीच्या हातात देऊन काय बरे साधणार आहे. तेवढ्याच पैशात खुप सारी पुस्तके आणून तिची लहानशी लायब्ररी दिसली असती तरच कौतुक वाटले असते. किंवा सामान्य ज्ञान वा मेंदुला चालना देणारी खेळणीने तुडुंब भरलेलं एखादं कपाट दिसलं असतं तरी इतरांना प्रेरणा मिळाली असती. कौतुक, हौस किंवा आहे ना ऐपत हे सगळे करण्याची या नावाखाली किती दिवस आपण आपल्या मुलीला स्वयंपाक घरात (च) रमण्याची कला शिकवणार आहोत? स्वयंपाक आणि घरकामाशिवाय ही इतर उरलेल्या 64 कला आहेत. त्यांची ओळख करून देण्याचे हेच ते खरे वय. बाकी भांडीकुंडी, स्वयंपाक, हंडा कळशी आहेच नंतर. असो. हे माझे वैयक्तिक मत. बाकी पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना Http://majheviewsanireviews.blogspot.in

philosophy

Everybody Comes up With Their Own Set of Problems. So Don't Compare How Your Problems Are Tougher Than Them. Just Deal it...Live it....Leave it! Http://majheviewsanireviews.blogspot.in

कलिंगड

कलिंगड विकत घेणे म्हणजे 'चांगले' कलिंगड विकत घेणे हे खरंच खूप कौशल्याचे काम आहे. लालचुटुक, लालबुंद, रवाळ आणि अमृततुल्य गोड चवीचे कलिंगड हे ज्या दिवशी तुमचं 'लक' चांगले असेल तेव्हाच तुम्हाला मिळते असे आता माझे ठाम मत झाले आहे. म्हणजे असं बघा, तुम्ही कलिंगडवाल्या 'भय्या' कडे जाता, select करायच्या आधी भाव करता, म्हणजे 80 का 70 मे दो, 50 का 40 मे दो, वगैरे. मग ते झाल्यावर 2-4 कलिंगड उचलून त्यांना उलटसुलट फिरवून बघता, त्यावर हाताने वाजवून पाहता. असे केल्याने काय कळतं आणि हे किती जणांना कळतं हा एक संशोधनाचाच विषय आहे तर.... असे केल्याने तुम्हाला काहीही कळलेले नसते हे त्या 'भय्या' ला एव्हाना चांगलेच कळलेले असते. मग तुम्हाला 'चांगले कलिंगड कसे निवडायचे' हे कुठेतरी वाचल्याचे, ऐकल्याचे आठवते. मग परत तुम्ही चांगले कलिंगड निवडायचा प्रयत्न करता. असे करत करत दहा मिनिटे तिथेच वेळ घालवता. मग कंटाळून शेवटी ती जबाबदारी (मोठ्या मनाचा आव आणत) त्या 'भैया'लाच देता. की ले लो भैय्या अब तुम्हीच देखो कोनसा अच्छा है. मग तो त्यातलेच एक अंदाजपंचे select करून upselling करता करता तुमच्या हवाली करतो. म्हणजे अच्छा है अच्छा है पण म्हणेल आणि अब हम अंदर झांक के तो नही देखे है ना साब म्हणत सेफ साईडला पण राहील. आणि इतक्या मेहनती नंतर घरी येऊन तुम्ही ते खायला सुरुवात करता. आणि जर ते चांगले निघाले नाही तर ती जगातील सगळ्यात मोठी फसवणूक झाली असल्याचा फिल येतो. पण तेच जर चवदार असेल तर घरच्या सगळ्यांबरोबर कलिंगड खाणे हा एक सोहळाच होतो. You All Should Agree it. असे कधी झालय का की जशी जेवताना वादावादी होते कधी, तशी कलिंगड खात असताना घरात खुप भांडणे चालली आहेत? किंवा भांडता भांडता कलिंगड खातायत? ते शक्यही नाही. कारण खाणारा एवढा तन्मयतेने आणि मनापासुन खातो की त्यावेळी सगळ्यात Busy झालेलो असतो आपण. अगदी महत्वाचा फोन आला तरी तो उचलायला हात फ्री नसतात. माझ्या मते आंबा हा जर फळाचा राजा आहे तर कलिंगड हे मला बुध्दीबळातल्या पटावरचा प्रधान वाटतो-flexible-कोणालाही परवडणारा, नेत्रसुखद आणि असह्य उन्हाळा सुसह्य़ करणारा. So happy eating to you all and wish you a very happy watermelon this summer. #summer #chitchat #watermelon #seasonfruit #happyeating Http://majheviewsanireviews.blogspot.in