May 6, 2017

पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना

एका फेसबुक पेज वर शेअर झालेला हा फोटो. प्रथम दर्शनी 'अरे वा किती छान फोटो' अशी प्रतिक्रिया मनात येईल. पण या चिमुकलीच्या आई वडिलांनी हे तिचे छोटे स्वयंपाक घर रचताना केलेला खर्च आणि वापरलेला वेळ मला अनाठायी वाटतो. जे काम जन्म भर करायचेच आहे ते काम व त्यातील इतके बारकावे या वया पासुन त्या चिमुकलीच्या हातात देऊन काय बरे साधणार आहे. तेवढ्याच पैशात खुप सारी पुस्तके आणून तिची लहानशी लायब्ररी दिसली असती तरच कौतुक वाटले असते. किंवा सामान्य ज्ञान वा मेंदुला चालना देणारी खेळणीने तुडुंब भरलेलं एखादं कपाट दिसलं असतं तरी इतरांना प्रेरणा मिळाली असती. कौतुक, हौस किंवा आहे ना ऐपत हे सगळे करण्याची या नावाखाली किती दिवस आपण आपल्या मुलीला स्वयंपाक घरात (च) रमण्याची कला शिकवणार आहोत? स्वयंपाक आणि घरकामाशिवाय ही इतर उरलेल्या 64 कला आहेत. त्यांची ओळख करून देण्याचे हेच ते खरे वय. बाकी भांडीकुंडी, स्वयंपाक, हंडा कळशी आहेच नंतर. असो. हे माझे वैयक्तिक मत. बाकी पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना Http://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment