Aug 9, 2017

#Thedramacompany

काल चॅनेल सर्फ करता करता सोनी टिव्ही वर 'द ड्रामा कंपनी' हा टुकार काॅमेडी शो पाहिला. मिथुन चक्रवर्ती 'जज' आणि कृष्णा, सुदेश, अली असगर व बाकी इतर फ्लाॅप/हिट शोज मधले वेचलेले कलाकार. आणि हा. . सैराट मधला तानाजी. हा सगळा संच घेऊन काॅमेडी करण्याचा दिनवाणा, केविलवाणा आणि वैतागवाणा प्रयत्न चालू होता. त्यात कसलेसे प्रमोशन करायला गोहर खान आलेली. ( #bigboss7 ). या कार्यक्रमाचा #trp सांगण्याएवढाही नाही आणि तो कधी उंचावणारही नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही इतका त्यातील काॅमेडीचा दर्जा सुमार आहे. पण शो च्या शेवटी प्रमोशनसाठी आलेली #गोहर म्हणाली की "लवकरच हा भारतातला नंबर वन शो होणार आहे". ( हाच एक हशा पिकवणारा डायलॉग म्हणायला हरकत नाही ) .. .. .. याला म्हणतात, 'उंदराला मांजर साक्ष'. #thedramacompany #comedyshow #trp #sonytv Http://majheviewsanireviews.blogspot.in

व्यक्ती तितक्या प्रकृती

एक ओळखीचं कुटुंब आहे. त्यांना राहतं घर विकून नवीन घर घ्यायचं आहे. राहतं घर आई आणि मुलगा दोघांच्या नावावर आहे. पण मुलगा म्हणतो की हे घर विकून नवीन घर जे घेईन त्यात मात्र आईचे नाव नकोय मला. कारण का? .. तर तो म्हणतो "आईचे वय आता 70 आहे. म्हणजे ती काय जास्त दिवस नाही आता. उद्या तिचे बरंवाईट झालं तर बहीण भाऊ हिस्सा मागायला येतील. कोणी सांगीतले झंझट करायला. So being on safer and better side, नवीन घराच्या मालकी पत्रावर मी आईचे नाव लावणारच नाही." .. याला व्यवहार चातुर्य म्हणायचं की मनाचा कठोरपणा? Practical असावं माणसाने, पण इतके? अरे माणसा, तुझ्या तरी आयुष्याची गॅरेंटी कुठेय? देव काय वरती वयाच्या sequence ने बोलवत नाही. #feelings #relations #family #professionalism #profitandloss #selfishness #toomuchpracticallife

स्वातंत्र्य

एकटेपणा आणि स्वातंत्र्य यात फार फरक आहे. एकटं राहणारी सगळी माणसे स्वतंत्र असतातच असे नाही. या उलट, काही व्यक्ती कितीही लोकांच्या गराड्यात असल्या तरी स्वातंत्र्य उपभोगू शकतात. #lifeispuzzle #liveit #thoughts

कालिकाई मनोकामना - पत्र स्पर्धा

*पत्रस्पर्धा* अलीकडची कित्येक वर्ष आपण मंडळी एकमेकांना पत्र लिहीनासेच झालो आहोत. पत्र हा विषयच आपल्या आयुष्यातून बाद झाला आहे. या टेक्नोसॅव्ही दुनियेला थोडंसं मागे टाकून आपण काही वर्ष मागे जाण्याचा प्रयत्न करूया. *'दिल की कलम से'* या सदराअंतर्गत आपण आपल्या भावना, काही न सांगितलेल्या गोष्टी, गैरसमजामुळे अर्धवट राहिलेलं संभाषण, कबुल न करता आलेल्या चुका त्या-त्या व्यक्तीला पोचविण्याचा प्रयत्न करूया. मग ती व्यक्ती आपली प्रेयसी/प्रियकर, आई- वडील, भाऊ-बहिण, किंवा किंचित ओळख असलेली व्यक्ती सुद्धा असू शकते. चला तर मग ‘लिहिते व्हा’. तुम्ही लिहिलेले पत्र ‘कालिकाई मनोकामना’ मासिकात तुमच्या नावाने प्रसिद्ध केले जाईल. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू. नोट : शब्दसंख्या ३५० ते ४०० मॅटर पाठवण्यासाठी पत्ता- कालिकाई मिडिया प्रा. लि. १०२, श्रीकृष्ण पार्क, राघोबा शंकर पथ, दत्त मंदिर जवळ, चेंदणी, ठाणे (प) ४००६०१ इमेल – kaalikaimanokamna@gmail.com Phone – 9820797848 / 022-25366320 Facebook page – www.facebook.com/manokamnamagazine/ #kaalikaimanokamna #magazine #letterwriting #competition

खाद्य संस्कृती

भारतीय खाद्य संस्कृतीत बाकी राज्यांच्या तुलनेत आसामी खाद्य संस्कृती बद्दल फारसं बोललं, ऐकलं जात नाही. त्यामुळे काहीशी उपेक्षित अशी ही संस्कृती आहे. जेवढा मान, कौतुक पंजाबी , राजस्थानी , महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, बंगाली, गोवन पदार्थाना आहे तेवढं कौतुक आसामच्या वाट्याला आलेले नाही ही कटु सत्य परिस्थिती. याच खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा माझा हा संपूर्ण लेख आणि अजूनही इतर अनेक विषयांवरील रंजक लेख वाचा या महिन्यातील कालिकाई मनोकामना मासिकात. - #kaalikaimanokamana #magazine #marathi #aasam #foodculture #goodfood #myhobby

FESTIVAL ADVERTISEMENT

बर्‍याच जाहिराती शॉर्ट टर्म, सिझनल, टेंम्पररी असतात. सणवार, रुतुबदल या नुसार. उदाहरणार्थ. मोती साबण-दिवाळी, कोल्ड क्रिम-हिवाळा वगैरे. अपवाद फक्त खाद्य पदार्थ व दैनंदिन व्यवहारातील वस्तू. जाहिरातींच्या लोकप्रियतेनुसारही त्यांचा कालावधी ठरतो. कितीतरी जुन्या जाहिराती अजुनही प्रक्षेपित होत असलेल्या आपण पाहतो. Cadbury Dairymilk, Cadbury Silk, Cadbury Celebrationच्या अशाच खुप छान, लक्षवेधक आणि संस्मरणीय जाहिराती आपण वर्षानुवर्षे पाहतोय. सांगायचं झालं तर क्रिकेटच्या मैदानात सिक्सर लगावल्यानंतर डायरेक्ट मैदानात जाऊन धडकणारी त्याची प्रेयसी डेरी मिल्क ने तो आनंद सेलिब्रिट करते ती अॅड किंवा अगदी अलिकडची, सात समंदर पार या वर नाचणार्‍या सासुसुनांची अॅड. सगळ्याच जाहिराती हिट झाल्या. आता पाच वर्षापुर्वीची ही जाहिरात. ही राखीपोर्णिमा स्पेशल अॅड अगदी काही दिवसांसाठी टेलिकास्ट झाली. पण खुपच छान आणि गोड होती. I Like It. #cadbury #dairymilk #advertisement #rakhispecial https://m.youtube.com/watch?feature=share&v=RtoNdkDHvrc

#भिकारी

स्वप्नील जोशी कोणत्याही अँगलने भिकारी वाटतो का? त्याच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर, दर थोड्या थोड्या दिवसांनी येणार्‍या त्याच्या चित्रपटात दिसणारे अभिनय कौशल्य (?), या चित्रपटात कसे आहे ते चित्रपट पाहुन कळेलच. मुंबई-पुणे-मुंबई (1) नंतर स्वप्नीलने स्वतःच्या नावावर हीट दिलेला चित्रपट मला तरी आठवत नाही. त्याचा दुनियादारी सुपरहिट झाला पण तो एका 'टिम वर्क' मुळे हिट झाला होता. दुसरे म्हणजे भिकारी हा काळाच असतो असे Assumption करायचे असेल तर सावळ्या रंगाचे, स्वप्नील जोशीपेक्षा ही चांगले, अव्वल कलाकार इंडस्ट्री मध्ये आहेत याचा विचार केलेला दिसत नाही. #भिकारी #marathifilm Http://majheviewsanireviews.blogspot.in

Poetry for Dad's birthday from collection

Thinking Of My Dad On His Birthday Today … Silent Tears I Cry Today, Trying To Pretend That I'm Okay It's Your Birthday Today And There's Nothing I Can Do. No Presents Or Cake Can I Offer You. You Would Be 75 Years Old Today. I'm Trying To Pretend That I'm Okay In Heaven Above Is Where You Now Live With Your Momma And Daddy Whom You Love I Wish I Could Tell You I Love You And Miss You. Memories Of You Are So Very Dear Sweet Memories Of When You Were Here

Aug 6, 2017

#मैत्री दिन

दोस्ती हो तो मुन्ना ओर सर्किट जैसी.. मतलब, बापू दिख रहे है मतलब दिख रहे है !!Happy Friendship Day! सकाळ पासुन #whatsapp #forward मधला हा एकच मेसेज जाम आवडला. आयुष्यात ढिगभर वगैरे नाही.. अगदी मुठभरच मित्र मैत्रिणी जमवले. पण ते सगळे अस्सेच आहेत. म्हणजे सर्कीट सारखे, 'तुमको बापु दिख रहे है ना मतलब बापू है'. या टाईप चे. आपण कितीही बावळट वागलो, तरी आपल्याला या जन्मात कधीच सोडणार नाहीत ही गॅरेंटी असणारे. खरं सांगायचं तर, आयुष्य मित्रमंडळीं मुळेच तर सुसह्य होतं... आपल्या सगळ्यांचच!

Aug 3, 2017

मलिष्का आणि डेंग्यू

मलिष्का चा गुड नाईट, माॅर्टीन, ऑल आउट, कासव छाप वर विश्वास आहे की नाही तो मुद्दा वेगळा आहे. .. .. मुळात प्रश्न हा आहे की सध्याच्या वादग्रस्त परिस्थितीतच ही डेंग्यू अळी शोध मोहीम कशी काय झाली? #malishka

Aug 1, 2017

#lagirjhalji

एका एपिसोड मध्ये शित्त्तल (असंच वाचा, त ला त ला त ) अजिंक्य ला म्हणते, की.. "जो माणूस स्वप्न बघू शकत नाही तो प्रेम करू शकत नाही. "... .. अरे काय संबंध? काय अर्थ? बात कुछ समझी नही. .. नाही, मराठी मालिका फार सिरीयसली घ्यायच्या नसतात माहीत आहे पण तरी!! स्वप्न काय फक्त संसाराचीच पाहायची असतात का? दुसरे विषय नाहीत? आणि एखादा माणसाला नसेल आवड स्वप्नात, कल्पनेत रमायची.. तर तो काय प्रेम करून स्वतःच्या आणि ज्यावर प्रेम आहे त्याच्या आयुष्याचे सोने नाही करू शकत? संवाद लेखकाचे लाॅजीक नक्की काय होतं इकडे..! #zeemarathi #lagirjhalji #dialogues