Jul 30, 2018

फोडणीचा भात

रात्री उरलेल्या भाताचं काय करायचं याच्या असंख्य रेसिपीज वेगवेगळ्या चॅनलवर, वर्तमानपत्राच्या काॅलम्स मध्ये येत राहतात. शिळ्या भाताचे कटलेट, पॅटिस इथपासून ते भाताची शेवचकली कशी पाडावी इथपर्यंत! पण ते फक्त वाचण्याबघण्या पर्यंतच मर्यादित असतं! सगळ्या रेसिपीजमध्ये जिकतं कोण तर फक्त आणि फक्त फोडणीचा भातच! तेलाच्या खमंग फोडणीत बारीक चिरलेला लसूण खरपूस तळायचा आणि मग भरपूर कोथिंबीर पेरून ताटलीत ओतल्यावर ( सर्व्ह केल्यावर म्हणा हवंतर ) तयार फोडणीच्या भातात तो शोधुन वेचुन स्वाहा करायचा. याला दुसरं बेटर ऑप्शन काय असणार बरं! आमच्या एका ओळखीच्या घरी, भाताच्या अक्षरशः पाव पट तेलात हा भात परततात. त्यांच्याकडच्या लोकांनी त्याला तळलेला भात असंच नाव ठेवलंय! आता हा फोडणीचा भात कशाबरोबर खायचा हे ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे. आम्हाला तर चहा बरोबर पण पळतो. वरकरणी सोपा पदार्थ वाटत असला तरी प्रत्येकाच्या हातचा चांगला होईलच असं अजिबात नाही! स्कीलवर्क आहे हे ही! Afterall Cooking is an Art and The Secret Ingredient is 'Love'

आयुष्य

आयुष्य फक्त दोन गोष्टींमुळे काँम्प्लिकेटेड होतं. एक, कठीण असणाऱ्या गोष्टी फार सोप्या समजुन करायला जाणं; आणि दोन, खरोखर सोप्याच असणाऱ्या गोष्टी कठीण समजून अर्धवट सोडून देणं!