Feb 14, 2017

सल्ला (गार)

काही लोक जिथे कुठे भेटतील तिथे लगेचच फुकटचे सल्ले द्यायला उत्सुक असतात. नव्हे, त्यांना असे वाटते की तेच सर्व श्रेष्ठज्ञानी आहेत या पृथ्वीतलावरचे आणि समोरची व्यक्ती बालवाडी नापासच! असाच एक अनुभव लेखक चंद्रशेखर गोखले यांनी शेअर केला. तो असा - आपल्याकडे मुंबईत, दमट हवेमुळे चांदीच्या मुर्ती लगेच काळवंडतात... ते बघून त्यांच्या कडे आलेल्या एका स्नेहींचे मन द्रवले व लगेचच त्यांना ज्ञानाचा पाझर फुटला. त्या म्हणाल्या, " कसे दिसतात नाही हे काळवंडलेले देव? कोणी म्हणणार नाही हे चांदीचे आहेत. आता मी सांगते तो उपाय करा बघा. दर आठ दहा दिवसानी सगळे देव उचलायचे आणि कुकर मधे टाकायचे. सोबत लिंबाच्या दोन फोडी कुकर मधे टाकायच्या आणी चांगल्या दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या. मग कुकर उघडा आणि बघाच की सगळे देव कसे चकाचक होतात!!!!!! ...मजाल आहे एक जरी देव काळा राहिला तर, (अगदी विठ्ठल देखील)!" - आता हद्द झाली की नाही? एवढं काॅन्फीडन्टली असा महाभयंकर सल्ला कसा काय कोणी देऊ शकतं, तेही फक्त देव चकचकीत दिसण्यासाठी? देवा, तुच वाचव रे अशा लोकांपासून! - प्रज्ञा

No comments:

Post a Comment