Aug 9, 2017
#Thedramacompany
काल चॅनेल सर्फ करता करता सोनी टिव्ही वर 'द ड्रामा कंपनी' हा टुकार काॅमेडी शो पाहिला. मिथुन चक्रवर्ती 'जज' आणि कृष्णा, सुदेश, अली असगर व बाकी इतर फ्लाॅप/हिट शोज मधले वेचलेले कलाकार. आणि हा. . सैराट मधला तानाजी. हा सगळा संच घेऊन काॅमेडी करण्याचा दिनवाणा, केविलवाणा आणि वैतागवाणा प्रयत्न चालू होता. त्यात कसलेसे प्रमोशन करायला गोहर खान आलेली.
( #bigboss7 ).
या कार्यक्रमाचा #trp सांगण्याएवढाही नाही आणि तो कधी उंचावणारही नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही इतका त्यातील काॅमेडीचा दर्जा सुमार आहे.
पण शो च्या शेवटी प्रमोशनसाठी आलेली #गोहर म्हणाली की "लवकरच हा भारतातला नंबर वन शो होणार आहे". ( हाच एक हशा पिकवणारा डायलॉग म्हणायला हरकत नाही )
..
..
..
याला म्हणतात, 'उंदराला मांजर साक्ष'.
#thedramacompany
#comedyshow
#trp
#sonytv
Http://majheviewsanireviews.blogspot.in
व्यक्ती तितक्या प्रकृती
एक ओळखीचं कुटुंब आहे.
त्यांना राहतं घर विकून नवीन घर घ्यायचं आहे. राहतं घर आई आणि मुलगा दोघांच्या नावावर आहे. पण मुलगा म्हणतो की हे घर विकून नवीन घर जे घेईन त्यात मात्र आईचे नाव नकोय मला.
कारण का?
.. तर तो म्हणतो "आईचे वय आता 70 आहे. म्हणजे ती काय जास्त दिवस नाही आता.
उद्या तिचे बरंवाईट झालं तर बहीण भाऊ हिस्सा मागायला येतील. कोणी सांगीतले झंझट करायला. So being on safer and better side, नवीन घराच्या मालकी पत्रावर मी आईचे नाव लावणारच नाही."
..
याला व्यवहार चातुर्य म्हणायचं की मनाचा कठोरपणा?
Practical असावं माणसाने, पण इतके?
अरे माणसा, तुझ्या तरी आयुष्याची गॅरेंटी कुठेय?
देव काय वरती वयाच्या sequence ने बोलवत नाही.
#feelings #relations #family #professionalism #profitandloss #selfishness #toomuchpracticallife
स्वातंत्र्य
एकटेपणा आणि स्वातंत्र्य यात फार फरक आहे.
एकटं राहणारी सगळी माणसे स्वतंत्र असतातच असे नाही.
या उलट, काही व्यक्ती कितीही लोकांच्या गराड्यात असल्या तरी स्वातंत्र्य उपभोगू शकतात.
#lifeispuzzle
#liveit
#thoughts
कालिकाई मनोकामना - पत्र स्पर्धा
*पत्रस्पर्धा*
अलीकडची कित्येक वर्ष आपण मंडळी एकमेकांना पत्र लिहीनासेच झालो आहोत. पत्र हा विषयच आपल्या आयुष्यातून बाद झाला आहे. या टेक्नोसॅव्ही दुनियेला थोडंसं मागे टाकून आपण काही वर्ष मागे जाण्याचा प्रयत्न करूया. *'दिल की कलम से'* या सदराअंतर्गत आपण आपल्या भावना, काही न सांगितलेल्या गोष्टी, गैरसमजामुळे अर्धवट राहिलेलं संभाषण, कबुल न करता आलेल्या चुका त्या-त्या व्यक्तीला पोचविण्याचा प्रयत्न करूया. मग ती व्यक्ती आपली प्रेयसी/प्रियकर, आई- वडील, भाऊ-बहिण, किंवा किंचित ओळख असलेली व्यक्ती सुद्धा असू शकते.
चला तर मग ‘लिहिते व्हा’. तुम्ही लिहिलेले पत्र ‘कालिकाई मनोकामना’ मासिकात तुमच्या नावाने प्रसिद्ध केले जाईल. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू.
नोट : शब्दसंख्या ३५० ते ४००
मॅटर पाठवण्यासाठी पत्ता-
कालिकाई मिडिया प्रा. लि.
१०२, श्रीकृष्ण पार्क, राघोबा शंकर पथ, दत्त मंदिर जवळ, चेंदणी, ठाणे (प) ४००६०१
इमेल – kaalikaimanokamna@gmail.com
Phone – 9820797848 / 022-25366320
Facebook page – www.facebook.com/manokamnamagazine/
#kaalikaimanokamna
#magazine
#letterwriting
#competition
खाद्य संस्कृती
भारतीय खाद्य संस्कृतीत बाकी राज्यांच्या तुलनेत आसामी खाद्य संस्कृती बद्दल फारसं बोललं, ऐकलं जात नाही. त्यामुळे काहीशी उपेक्षित अशी ही संस्कृती आहे. जेवढा मान, कौतुक पंजाबी , राजस्थानी , महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, बंगाली, गोवन पदार्थाना आहे तेवढं कौतुक आसामच्या वाट्याला आलेले नाही ही कटु सत्य परिस्थिती. याच खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा माझा हा संपूर्ण लेख आणि अजूनही इतर अनेक विषयांवरील रंजक लेख वाचा या महिन्यातील कालिकाई मनोकामना मासिकात. -
#kaalikaimanokamana
#magazine
#marathi
#aasam
#foodculture
#goodfood
#myhobby
FESTIVAL ADVERTISEMENT
बर्याच जाहिराती शॉर्ट टर्म, सिझनल, टेंम्पररी असतात. सणवार, रुतुबदल या नुसार. उदाहरणार्थ. मोती साबण-दिवाळी, कोल्ड क्रिम-हिवाळा वगैरे.
अपवाद फक्त खाद्य पदार्थ व दैनंदिन व्यवहारातील वस्तू.
जाहिरातींच्या लोकप्रियतेनुसारही त्यांचा कालावधी ठरतो. कितीतरी जुन्या जाहिराती अजुनही प्रक्षेपित होत असलेल्या आपण पाहतो.
Cadbury Dairymilk, Cadbury Silk, Cadbury Celebrationच्या अशाच खुप छान, लक्षवेधक आणि संस्मरणीय
जाहिराती आपण वर्षानुवर्षे पाहतोय. सांगायचं झालं तर क्रिकेटच्या मैदानात सिक्सर लगावल्यानंतर डायरेक्ट मैदानात जाऊन धडकणारी त्याची प्रेयसी डेरी मिल्क ने तो आनंद सेलिब्रिट करते ती अॅड किंवा अगदी अलिकडची, सात समंदर पार या वर नाचणार्या सासुसुनांची अॅड. सगळ्याच जाहिराती हिट झाल्या.
आता पाच वर्षापुर्वीची ही जाहिरात. ही राखीपोर्णिमा स्पेशल अॅड अगदी काही दिवसांसाठी टेलिकास्ट झाली.
पण खुपच छान आणि गोड होती.
I Like It.
#cadbury
#dairymilk
#advertisement
#rakhispecial
https://m.youtube.com/watch?feature=share&v=RtoNdkDHvrc
#भिकारी
स्वप्नील जोशी कोणत्याही अँगलने भिकारी वाटतो का? त्याच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर, दर थोड्या थोड्या दिवसांनी येणार्या त्याच्या चित्रपटात दिसणारे अभिनय कौशल्य (?), या चित्रपटात कसे आहे ते चित्रपट पाहुन कळेलच.
मुंबई-पुणे-मुंबई (1) नंतर स्वप्नीलने स्वतःच्या नावावर हीट दिलेला चित्रपट मला तरी आठवत नाही. त्याचा दुनियादारी सुपरहिट झाला पण तो एका 'टिम वर्क' मुळे हिट झाला होता.
दुसरे म्हणजे भिकारी हा काळाच असतो असे Assumption करायचे असेल तर सावळ्या रंगाचे, स्वप्नील जोशीपेक्षा ही चांगले, अव्वल कलाकार इंडस्ट्री मध्ये आहेत याचा विचार केलेला दिसत नाही.
#भिकारी #marathifilm
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Poetry for Dad's birthday from collection
Thinking Of My Dad On His Birthday Today …
Silent Tears I Cry Today,
Trying To Pretend That I'm Okay
It's Your Birthday Today And There's Nothing I Can Do.
No Presents Or Cake Can I Offer You.
You Would Be 75 Years Old Today.
I'm Trying To Pretend That I'm Okay
In Heaven Above Is Where You Now Live
With Your Momma And Daddy Whom You Love
I Wish I Could Tell You
I Love You And Miss You.
Memories Of You Are So Very Dear
Sweet Memories Of When You Were Here
Aug 6, 2017
#मैत्री दिन
दोस्ती हो तो मुन्ना ओर सर्किट जैसी..
मतलब, बापू दिख रहे है मतलब दिख रहे है
!!Happy Friendship Day!
सकाळ पासुन #whatsapp #forward मधला हा एकच मेसेज जाम आवडला.
आयुष्यात ढिगभर वगैरे नाही.. अगदी मुठभरच मित्र मैत्रिणी जमवले. पण ते सगळे अस्सेच आहेत. म्हणजे सर्कीट सारखे, 'तुमको बापु दिख रहे है ना मतलब बापू है'. या टाईप चे.
आपण कितीही बावळट वागलो, तरी आपल्याला या जन्मात कधीच सोडणार नाहीत ही गॅरेंटी असणारे.
खरं सांगायचं तर, आयुष्य मित्रमंडळीं मुळेच तर सुसह्य होतं...
आपल्या सगळ्यांचच!
Aug 3, 2017
मलिष्का आणि डेंग्यू
मलिष्का चा गुड नाईट, माॅर्टीन, ऑल आउट, कासव छाप वर विश्वास आहे की नाही तो मुद्दा वेगळा आहे.
..
..
मुळात प्रश्न हा आहे की सध्याच्या वादग्रस्त परिस्थितीतच ही डेंग्यू अळी शोध मोहीम कशी काय झाली?
#malishka
Aug 1, 2017
#lagirjhalji
एका एपिसोड मध्ये शित्त्तल (असंच वाचा, त ला त ला त ) अजिंक्य ला म्हणते, की..
"जो माणूस स्वप्न बघू शकत नाही तो प्रेम करू शकत नाही. "...
..
अरे काय संबंध? काय अर्थ? बात कुछ समझी नही. ..
नाही, मराठी मालिका फार सिरीयसली घ्यायच्या नसतात माहीत आहे पण तरी!!
स्वप्न काय फक्त संसाराचीच पाहायची असतात का? दुसरे विषय नाहीत? आणि एखादा माणसाला नसेल आवड स्वप्नात, कल्पनेत रमायची.. तर तो काय प्रेम करून स्वतःच्या आणि ज्यावर प्रेम आहे त्याच्या आयुष्याचे सोने नाही करू शकत?
संवाद लेखकाचे लाॅजीक नक्की काय होतं इकडे..!
#zeemarathi
#lagirjhalji
#dialogues
Jul 31, 2017
#मुबारका
#चला हवा येऊ द्या मध्ये या आठवडय़ात
मुबारकाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर आणि अर्जुन कपूर आले. मान्य करावेच लागेल की अर्जुनपेक्षा अनिल कपूरच साॅलीड एनर्जेटिक वाटतो. पुतण्यासाठी मेहनत घेतोय जिकडे तिकडे प्रमोशन करून. 'काका मला वाचवा' या हाकेला ओ देऊन अनिल काका वाचवायचा प्रयत्न करतायत.
पण काय आहे ना, की तो अर्जुन कपूर सिंगल रोल मध्येही बघवत नाही. आणि या सिनेमात तर तो डबल रोल आहे म्हणे.
अब होनी को कौन टाल सकता है?
#chyd #zeemarathi #mubaraka #fridayrelease #bollywood
Jul 23, 2017
#गटारी आणि #डिमाॅनीटायझेशन
परवा एका कामासाठी बाहेर गेले होते. रस्त्यात येताना एक दोन अपेयपानाची दुकाने दिसली, तिथे अपेय घेण्यासाठी भल्यामोठ्या, लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
..
..
मुद्दा हा आहे की तिथे गर्दी व रांगा असुनही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की, ढकलाढकली, गोंधळ आढळला नाही.
नोटबंदीच्या काळात रांगा लावताना जशी रांगेत आजारपणं, अपघात आणि काही दुर्दैवी घटना घडल्या, पोलीस बंदोबस्त तैनात करायला लागला तशी आणीबाणीची परिस्थिती तिथे कुठेही अज्जिबात नव्हती.
सगळे कसे शिस्तबद्ध, आलबेल होते.
मानसशास्त्रात हा मुद्दा एक अभ्यासाचा धडा म्हणून अॅड करायला हवा.
#gatari
#effect
#monetisation
#humanmentality
#Psychology
Jul 21, 2017
मिडीया आणि टीआरपी
कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आजच्या मीडियाला कळतं पण वळत नाही. त्यांची पत्रकारीता फक्त TRP तच मोजली जाते. समाजासाठी काय महत्वाचं आहे ते TRP पेक्षा महत्वाचं नाही.
पालिकेलाही एका पावसात रस्त्यांना पडलेले खड्डे दिसले नाहीेत पण एका गाण्याने त्यांच्या अब्रूला पडलेले खड्डे मात्र लगेच जाणवले.
वर पाऊसच इतका पडतो त्याला कोण काय करणार असं 'हतबल' statement देऊन बाळराजे मोकळे झाले.
आता आम्हीच निवडून दिलंय तुम्हाला त्याला तुम्ही तरी काय करणार?
#media
#malishka
#trp
Jul 20, 2017
मलिष्का ........
सद्य परिस्थितीत रातोरात बाकीचे सगळे सामाजिक, आर्थिक, राजकीय विषय बासनात गुंडाळले गेले. फक्त आणि फक्त, मलिष्का आणि तिने गायलेले गाणे रडार वर आले आहे. बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रात प्रमुख बातमी मलिष्का, तिचे गाणे आणि त्यात तिच्या घरी सापडलेल्या डेंग्यूच्या अळ्या हीच वाचायला मिळत आहे.
शेतकरी समस्या, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, आणि सगळ्यात महत्वाचा विषय - #GST.
ह्या सगळ्या घडामोडी आणि त्याचे अपडेट्स अचानक दुय्यम स्थानावर गेले
आता मलिष्काने लोकांची दूखती रग गाण्यातून
विस्तारित केली आहे. पण या आधीही पथनाटय़, विडंबन गीते इत्यादी लोककला प्रकारातून जनतेचे म्हणणे मांडले जातच आहे की. मग अब्रुनुकसान, बदनामी, इगो, मानसिक खच्चीकरण हे सगळे मुद्दे पुढे करून आणि अरे ला कारे करून, गाण्याला गाण्यातून व्यक्त होऊन सर्वांचाच कार्यकालीन वेळ विनाकारण दवडला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
Jul 15, 2017
#MPK
1989 ला म्हणजे शाळेत सहावी की सातवीला वगैरे असताना मैने प्यार किया प्रदर्शित झाला. आणि त्याच्या 2 वर्षे आधी कयामत से कयामत तक. तेव्हा सलमान आणि आमिर आवडत नाही अशी बहुधा एकही शाळकरी किंवा काॅलेज गोईंग व्यक्ती नसायची. घरी व्हीडीओवर व्हीसीआर, व्हीसीपी आणून सिनेमा बघायचा तो काळ.
पण...
आता मात्र...
मागच्या काही वर्षांतल्या सलमानच्या कारनाम्यांमुळे त्याचा आख्खा सिनेमाच नाही तर टिव्ही वरचा कोणता शो ही पाहायची ईच्छा होत नाही.
नुकताच तो कपिल शर्मा शो मध्ये ट्युब लाईट च्या प्रमोशन साठी आला होता.
ओढून ताणून हिरो ची 'पोस्ट' पकडून ठेवण्याच्या नादात त्याचा जो 'अवतार' झालाय तो पाहता तर तो आता एक मिनीट भर ही सहन होत नाही.
कसे काय त्याचे सिनेमे 'कोटीच्या कोटी उड्डाणे' करतात काय माहीत!
#bollywood #salman #tkss #mpk
Jul 14, 2017
टाईम पास
काही चेहरे पारोसे असले तरी नुकतेच अभ्यंग स्नान केल्यासारखे कायम ताजेतवाने दिसतात...
तर काहींना....
नुकतीच अंघोळ केली असली तरी..
'अरे आळशी माणसा, किती वेळ अजून पारोसा राहणार आहेस, जा..निदान चार तांबे तरी ओतून ये डोक्यावर'.. असे टोमणे ऐकावे लागतात.
Jul 11, 2017
पंढरीची वारी
गेल्या काही वर्षांपर्यंत दर आषाढी कार्तिकी एकादशीला दूरदर्शन वर ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट आवर्जुन दाखविला जायचा.
'धरिला पंढरीचा चोर' आणि 'अवघी विठाई माझी' ही त्यातील गाणी अजुनही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटात विठुमाऊलीची भुमिका करणारा बाल कलाकार होता 'बकुळ कवठेकर'. चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर लगेचच त्याचा गोंडस चेहरा डोळ्यासमोर येईल.
पण बर्याच जणांना माहीत नसेल की
पुण्यातील भारती विद्यापिठात ‘फाईन आर्ट’च शिक्षण घेत असताना बकुळ चा
ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने 2002 साली अकस्मात मृत्यु झाला. आज बकुळ असता तर तो नक्की काय करत असता माहित नाही, पण आपण एक चांगला ‘कलाकार’ गमविला याच दु:ख मात्र नक्कीच राहील.
#memorablefilm #marathimovie #childactor
Jul 10, 2017
गुरुपोर्णिमा
आज आई आणि बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏💐
#courtesy #whatsapp
Jul 9, 2017
शुभेच्छा
दो दिवाने शहेर मे. .
रात मे और दोपहर मे..
साबुदाना... ssss
ओ साबुदाना. .sss
ढुंढते है थोडा
साबुदाना. . ढुंढते है!
-
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
त्या विठुरायाचा आशिर्वाद कायम आपल्या बरोबर राहो!!
Jul 2, 2017
#GST
We Still Get Confused Between 'Push' & 'Pull'... तो फिर #GST समझने के लिये थोडा वक्त तो लगेगा ना!
Give Some Time to Time!
#gst #india #monetarypolicy
Jun 30, 2017
#Tubelight
Tubelight: When a bulb is expected to perform like LED.
Tubelight is a good movie. In fact it is much better than Salman's few masala entertainers. Yes, it has few issues like weak script, slower pace and Salman looked overaged too but it is certainly not as bad as it is reviewed by few cinepandits and mouth publicity going around. People are just getting carried away with the harsh reviews.
I think the real reason why it is not doing well is our expectations. Let's accept the fact that we were not ready for it. Fans expected Salman to do what he is best at. They wanted to see him playing larger than life characters, flaunting his muscles and delivering cheesy lines. Instead they see him crying, struggling and getting bullied by entire town. They expected him to loose his shirt and he appeared in sweaters throughout the movie. They expected him to play pranks and make faces but he tried to act and emote. They expected him to be a superman and he chose to play a character of an innocent child-man who believed in his 'yakeen ki taaqat' and Gandhism. Salman certainly have taken the biggest risk of his life by choosing a character opposite to his image and age. The risk should have been paid off. The movie sincerely try to highlight impact of war on nation and soldier families and director Kabir Khan deserves standing ovation for that.
Salman did well in emotional and comedy scenes. His relationship with little Goohu is certainly a highlight of the movie. Among other performances, Child actor Martin Ray Tangu as Goohu, Mohammed Zeeshan Ayyub as Narayan are outstanding. Om Puri and Yashpal Sharma supported well as Banne Chacha and Major Rajbir respectively. The movie also scores full marks on camera work and locations. Among songs, 'Sajan Radio' plays in your mind long time even after leaving the theatre.
The movie disappoints on its screenplay an editing. War scenes are lengthy and climax is predictable. Sohail Khan fails to emote and Shahrukh Khan's cameo offers nothing beyond few whistles on his entry.
Overall, it is a good movie and you will surely like it if you see it as normal movie and not as 'the salman khan' product. Enjoy it as any other Bollywood movie. Let's allow Salman to experiment and accept him in his new avtaars even if it is something like Tubelight. With current results, I doubt if Salman would take such risk again. But his efforts in and as 'Tubelight' certainly deserve better results.
Rating: 3/5
#Tubelight #Bollywood #reviews #Salman
May 6, 2017
जेवण झालं का
राष्ट्रीय फुल - कमळ
राष्ट्रीय फळ - आंबा
राष्ट्रीय पक्षी - मोर
..
..
राष्ट्रीय प्रश्न -
..
..
..
..
..
J1 झाले का?
येळकोट येळकोट जय मल्हार
काही काही मालिका संपल्या यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागतोच.
आताही तशीच परिस्थिती आहे 'जय मल्हार' च्या बाबतीत! इतर देवादिकांच्या मालिकांचे आपल्याकडे जसे मनापासून स्वागत होते तसेच जय मल्हारचेही झाले. या मालिकेचे कथानक नविन होते. चपखल स्टारकास्ट, शीर्षक गीत, संगीत, अॅनिमेशन दृश्ये, भरजरी वस्त्रे आणि दागदागिन्यांची नेत्र सुखद भव्यता, चंपासष्ठी महत्त्व व चैत्रउत्सवाची माहिती या सर्व जमेच्या बाजु असलेल्या मालिकेचा कथेचा गाभा मात्र बरेचदा डळमळीत झाला. पाणी घालून, खेचत ताणत मालिका सुरू राहिली. विशेषतः बानु-म्हाळसा यांना पुर्वजन्माची आठवण हा विषय जवळपास सहा महिन्या पेक्षा जास्त सुरू होता.
देवांच्या मल्हारी मार्तंड अवतारात घडलेले अजुनही बरेच रंजक किस्से, चमत्कार, पराक्रम प्रेक्षकांना बघायला, समजुन घ्यायला आवडले असते. परंतु मालिकेत बानु-मल्हारदेवांच्या विवाहानंतर तर ही मालिका प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याचा 'फिल' येत राहिला.
असो.
अंत भला तो सब भला. ओव्हर आॅल ही मालिका ज्येष्ठ नागरिकांकडुन वाखाणली गेली. आणि संध्याकाळी दिवेलागणीला जय मल्हार चे शीर्षक गीत ऐकू येणार नाही ही गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवेल .
-
..
..
...
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट
#झीमराठी #zeemarathi #jaimalhar #जयमल्हार #lastepisode
Http://majheviewsanireviews.blogspot.in
एप्रिल आणि निकाल
काही काही दिवसाचे 'माहात्म्य'(!) आणि त्याच्याशी संबंधित भुतकाळ हे सर्व विसरायचे म्हटले तरी विसरले जात नाही.
उदाहरणार्थ -
30 एप्रिल
..
..
..
हो
..
..
याच दिवशी दरवर्षी
..
..
.
शाळेचा रिझल्ट लागुन
प्रगती पुस्तक
हातात यायचे!
#बाहुबली
आधे ...
....
....
उधर - बाहुबली देखने
आधे...
.....
......
इधर गये - IPL देखने
आणि उरलेले. .
#झीमराठी बघतायत.
#खुलताकळीखुलेना
#तुझ्यातजीवरंगला
#माझ्यानवर्याचीबायको
Http://majheviewsanireviews.blogspot.in
घरोघरी मातीच्या चुली
ऑफिस मधुन तो लोकल ट्रेन चे धक्के खात एकदाचा घरी पोहोचतो. वेळे आधीच निघाल्याने तो जरा लवकरच घरी येतो. फ्रेश होऊन चहाचा कप घेऊन निवांत बसतो.
IPL ची मॅच पाहायची असते पण 'घरोघरी मातीच्या चुली' या रिवाजा प्रमाणे आई आणि बायको टिव्हीच्या अतिगंभीर (?) सामाजिक (??) मराठी मालिका बघत असतात. दोघीही
आत्ता रडतील की मग या expression मधे डोळ्याला अनुक्रमे साडीचा पदर आणि ओढणीचे टोक लावुन टिव्ही पाहण्यात गुंग
असतात.
तेवढ्यात ...
त्या मालिकेत ( बहुदा का हे दिया परदेस टाईप असावी ) एका प्रसंगात
अम्मा टाईप सासूचे आणि गौरीटाईप सुनेचे भांडण होते. बघता बघता आईची एक धारदार नजर मुलाकडे जाते , तो मुद्दाम खुप लक्ष देऊन टिव्ही बघत असल्याच्या आविर्भावात एकटक सिरियल पाहण्याचा प्रयत्न करतो.
तेवढ्यात. .
मालिकेत दुसऱ्या प्रसंगात सून हमसून हमसून
रडत असते. ते पाहून तिकडून बायको त्याच्याकडे तिरकस नजरेने बघते.
तरीही तो परत मुद्दाम खुप खुप
लक्ष देऊन टिव्ही बघत असल्याच्या आविर्भावात एकटक सिरियल पाहण्याचा प्रयत्न करतो. थोड्याच वेळात मग दोघींची नजर आपल्याकडेच आहे हे त्याच्या लक्षात येते. व तो चुपचाप उठुन परत घराबाहेर पडतो.
फौजी
पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना
एका फेसबुक पेज वर शेअर झालेला हा फोटो.
प्रथम दर्शनी 'अरे वा किती छान फोटो' अशी प्रतिक्रिया मनात येईल. पण या चिमुकलीच्या आई वडिलांनी हे तिचे छोटे स्वयंपाक घर रचताना केलेला खर्च आणि वापरलेला वेळ मला अनाठायी वाटतो.
जे काम जन्म भर करायचेच आहे ते काम व त्यातील इतके बारकावे या वया पासुन त्या चिमुकलीच्या हातात देऊन काय बरे साधणार आहे. तेवढ्याच पैशात खुप सारी पुस्तके आणून तिची लहानशी लायब्ररी दिसली असती तरच कौतुक वाटले असते.
किंवा सामान्य ज्ञान वा मेंदुला चालना देणारी
खेळणीने तुडुंब भरलेलं एखादं कपाट दिसलं असतं तरी इतरांना प्रेरणा मिळाली असती.
कौतुक, हौस किंवा आहे ना ऐपत हे सगळे करण्याची या नावाखाली किती दिवस आपण आपल्या मुलीला स्वयंपाक घरात (च) रमण्याची कला शिकवणार आहोत? स्वयंपाक आणि घरकामाशिवाय ही इतर उरलेल्या 64 कला आहेत. त्यांची ओळख करून देण्याचे हेच ते खरे वय. बाकी भांडीकुंडी, स्वयंपाक, हंडा कळशी आहेच नंतर.
असो.
हे माझे वैयक्तिक मत.
बाकी पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना
Http://majheviewsanireviews.blogspot.in
philosophy
कलिंगड
कलिंगड विकत घेणे म्हणजे 'चांगले' कलिंगड विकत घेणे हे खरंच खूप कौशल्याचे काम आहे. लालचुटुक, लालबुंद, रवाळ आणि अमृततुल्य गोड चवीचे कलिंगड हे ज्या दिवशी तुमचं 'लक' चांगले असेल तेव्हाच तुम्हाला मिळते असे आता माझे ठाम मत झाले आहे. म्हणजे असं बघा, तुम्ही कलिंगडवाल्या 'भय्या' कडे जाता, select करायच्या आधी भाव करता, म्हणजे 80 का 70 मे दो, 50 का 40 मे दो, वगैरे. मग ते झाल्यावर 2-4 कलिंगड उचलून त्यांना उलटसुलट फिरवून बघता, त्यावर हाताने वाजवून पाहता. असे केल्याने काय कळतं आणि हे किती जणांना कळतं हा एक संशोधनाचाच विषय आहे
तर.... असे केल्याने तुम्हाला काहीही कळलेले नसते हे त्या 'भय्या' ला एव्हाना चांगलेच कळलेले असते. मग तुम्हाला 'चांगले कलिंगड कसे निवडायचे' हे कुठेतरी वाचल्याचे, ऐकल्याचे आठवते. मग परत तुम्ही चांगले कलिंगड निवडायचा प्रयत्न करता. असे करत करत दहा मिनिटे तिथेच वेळ घालवता. मग कंटाळून शेवटी ती जबाबदारी (मोठ्या मनाचा आव आणत) त्या 'भैया'लाच देता. की ले लो भैय्या अब तुम्हीच देखो कोनसा अच्छा है. मग तो त्यातलेच एक अंदाजपंचे select करून upselling करता करता तुमच्या हवाली करतो. म्हणजे अच्छा है अच्छा है पण म्हणेल आणि अब हम अंदर झांक के तो नही देखे है ना साब म्हणत सेफ साईडला पण राहील. आणि इतक्या मेहनती नंतर घरी येऊन तुम्ही ते खायला सुरुवात करता. आणि जर ते चांगले निघाले नाही तर ती जगातील सगळ्यात मोठी फसवणूक झाली असल्याचा फिल येतो. पण तेच जर चवदार असेल तर घरच्या सगळ्यांबरोबर कलिंगड खाणे हा एक सोहळाच होतो. You All Should Agree it. असे कधी झालय का की जशी जेवताना वादावादी होते कधी, तशी कलिंगड खात असताना घरात खुप भांडणे चालली आहेत? किंवा भांडता भांडता कलिंगड खातायत?
ते शक्यही नाही. कारण खाणारा एवढा तन्मयतेने आणि मनापासुन खातो की त्यावेळी सगळ्यात Busy झालेलो असतो आपण. अगदी महत्वाचा फोन आला तरी तो उचलायला हात फ्री नसतात.
माझ्या मते आंबा हा जर फळाचा राजा आहे तर कलिंगड हे मला बुध्दीबळातल्या पटावरचा प्रधान वाटतो-flexible-कोणालाही परवडणारा, नेत्रसुखद आणि असह्य उन्हाळा सुसह्य़ करणारा.
So happy eating to you all and wish you a very happy watermelon this summer.
#summer #chitchat #watermelon #seasonfruit #happyeating
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 29, 2017
#Facebook and #maths
शाळेत आपले गणित फारच कच्चे होते हे मनातले दुःख जरा कमी करण्यासाठीच बहुतेक फेसबुक
वरच्या वेगवेगळ्या pages वरची
गणिते कोणतेही बक्षिस किंवा मार्क मिळत नसले तरी लोक भल्या मोठ्या उत्साहाने सोडवत बसतात.
#thinkpositive
#beoptimistic
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#bahubali #ipl #zeemarathi
आधे ...
....
....
उधर - बाहुबली देखने
आधे...
.....
......
इधर गये - IPL देखने
आणि उरलेले. .
#झीमराठी बघतायत.
#खुलताकळीखुलेना
#तुझ्यातजीवरंगला
#माझ्यानवर्याचीबायको
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#bahubali #bollywood
जगातील असंख्य प्रश्नांमधील
आज निदान एक प्रश्न तरी सुटला असेल अशी आशा करू या!
हो..
तोच तो...
Correct. ...
"कटप्पाने बाहुबली को....
क्यु बरं मारा"?
#bollywood #bahubali #bahubali2 #craze
Apr 27, 2017
#mumbailocal #announcement #fun
पुढील स्टेशन ठाणे
अगला स्टेशन थाने
Next station Thane
मुंबईत काही मोजके अपवाद वगळता (उदा सायन-शीव) सगळ्या स्टेशन्सची नावे प्रत्येक भाषेत सारखीच असतात. तरीही ही अशी तीन तीन भाषेत अनाऊंसमेन्ट करण्याची आयडीया कोणाची बरे?
#railway #mumbailocal #announcement #justlikethat
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#colgate #advertisement
दहा पैकी नऊ डॉक्टर 'कोलगेट' चा सल्ला देतात.
पण ते दहा(च) डॉक्टर कोण आहेत, कुठे आहेत?
नात्यातले अच्छे दिन
प्रॉब्लेम हा आहे की माणसं एकमेकांच्या विषयी समोरासमोर कमी आणि मनातल्या मनात जास्त बोलतात.
कसे येणार नात्यांमधले 'अच्छे दिन' !
#acchedin #myquotes
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#fun #marathigrammer #oneliner #teatime
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा -
कूर्मगतीने चालणे -> ( कूर्म = कासव )
कपात चहा काठोकाठ भरून तो कप किचन मधुन
माजघरापर्यंत येताना त्यातला चहा किंचितही बशीत सांडू नये म्हणुन आपण दबकत दबकत, हळूहळू ज्या गतीने चालतो त्या गतीला 'कूर्मगतीने चालणे' असे म्हणतात.
#fun #marathigrammer #oneliner
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#vinodkhanna #विनोदखन्ना #sir #rip #sadnews
विनोद खन्ना म्हंटलं की काही गाणी, चित्रपट आपोआपच डोळ्यासमोर येतात.
रुक जाना नहीं तू कहीं हार के
रुक जाना नहीं तू कहीं हार के
काँटों पे चलके मिलेंगे साए बहार के
ओ राही .. ओ राही
This One My All Time Favourite Song.. Actually The list is unending.
And How Can One Forget -
जब कोई बात बिगड़ जाये जब कोई मुश्किल पड जाये तुम देना साथ मेरा, ...
&
लगी आज सावन की फिर वो झड़ी है वही आग सीने में फिर जल पड़ी है कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम ...
ही गाणी आठवताना ती विनोद खन्नांच्या त्यातील अभिनया सकटच आठवतात यातच सगळे काही आले.
May His Soul Rest in peace.
#vinodkhanna #विनोदखन्ना #sir #rip #sadnews
Apr 26, 2017
गाय आधार कार्ड आणि बरंच काही
दत्त दत्त, दत्ताची गाय
गाईचं आधार कार्ड
नाय नाय..
गाईचं दुध!
गाईची पहीली धार
नाय नाय
पहिली आधार कार्ड गाय
#अरेकायचाललयकाय या सदरातून साभार.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 23, 2017
#oneliner #grammer
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा -
कूर्मगतीने चालणे -> ( कूर्म = कासव )
कपात चहा काठोकाठ भरून तो कप किचन मधुन
माजघरापर्यंत येताना त्यातला चहा किंचितही बशीत सांडू नये म्हणुन आपण दबकत दबकत, हळूहळू ज्या गतीने चालतो त्या गतीला 'कूर्मगतीने चालणे' असे म्हणतात.
#fun #marathigrammer #oneliner
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#पुस्तक दिन #bookday
लहानपणचा सगळ्यात कठीण निर्णय!
या तीन पैकी एकच पुस्तक घ्यायचे असेल तर कोणते घ्यायचे?
कठीणच आहे की नाही!
तिन्ही equally प्रिय.
बरं ते पुरवून पुरवून कसे काय वाचायचे तो एक मोठा प्रश्न! कितीही हळूहळू वाचले तरी काही तासात फडशा पडायचा!!
#reading #hobby #champak #thakthak #chandoba
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 20, 2017
Apr 18, 2017
#ipl #cricket #fans
There are 3 types of people in the world.
One, who never like Cricket.
Second, Superfans...who are born.. only to watch Cricket.
And the third one who like to watch cricket only in the last 5 overs. (Like me)
But still there are few ones (again, like me) who are totally confused which stand we should take while watching IPL Cricket. Having Totally blank reaction when any of the IPL Team like Hyderabad, Delhi, Banglore, Kolkata either wins or looses. When to cherish the moment and when to remain sad for loosing match.
Offffff, the other difficult thing to remember is ...which player belongs to which team this year..?
Like for example, Dhoni or Virat..
Okayyy and also not understanding
How many and whyyy soo many matches they are playing before semis???
#ipl #cricket #fans
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#प्रिये
#प्रिये पोस्टला सोशल मिडिया मध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली.
..
...
....
.....
चला, त्यामुळे एक बरं झालं.. वपु, चाणक्यनिती,
पाटील, नाना यांच्या पोस्ट्सना थोडे दिवस का होईना Compulsory सुट्टी मिळाली.
फेसबुक आणि तापमान
रोज फेसबुक उघडलं की झुकरबर्ग नित्य नेमाने सांगतो की आजचं Temperature खुप जास्त high असणार आहे.
अर्थात फेसबुक उघडायच्या आधीच, घराची खिडकी उघडली तरी कळतच की!
चुलीवरचे जेवण
चूलीवर स्वयंपाक करणेच काय पण कपभर चहा करणे देखील सोपे काम नाही. हवेची झुळुक आल्यावर अचानक त्या दिशेने भडकणारी आग कंट्रोल करत त्यावर स्वयंपाक करणे 'खाऊकाम' नाही. क्षणभर जरी लक्ष नसेल तरी त्या आगीची ज्वाळा त्रासदायक ठरू शकते. चुलीवर काम करणार्या बाईच्या हाताला एकही चटका नाही असे चित्र तुम्हाला कधीच दिसणार नाही. जिथे तुमच्या आमच्या सारख्यांच्या सुसज्ज स्वयंपाक घरात उन्हाळ्यात तासभर पण उभे राहणे कठीण तिथे चुलीसमोर बसून स्वयंपाक करणे किती महाकठीण आहे हे लक्षात घ्या.
त्यामुळे 'सो कॉल्ड' खवय्ये लोकांची 'चुलीवरच्या जेवणाची हौस' भागवण्याच्या ट्रेंड साठी गरीब गरजू महिला चार पैशासाठी तासनतास चुलीसमोर झिजतात किंवा झिजवून घेतल्या जातात हे अजिबात बघवत नाही.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#प्रिये
#प्रिये ..........
....
....
....
....
चहा
Sorry Sorry, आपलं ते हे, काय ते?
पहा........
#प्रिये ..... पहा.....
-
Http://majheviewsanireviews.blogspot.in
मनातलं काही
माणसांची पारख जशी तुमच्या कठीण काळात होते तशीच तुमच्या सुखाच्या काळातही. तुमच्या वाईट क्षणात एखाद्या व्यक्तीने साथ नाही दिली तर समजू शकतो की चल ठिक है, ते दुःख दुरूनही सहन करण्याची त्या व्यक्तीची पात्रता, क्षमता नाही. चल, माफ किया. किंवा मग अशावेळी ते आपल्याला आलेले फाॅरवर्डेड मेसेजेस आठवावेत की देव फक्त चांगल्या माणसांचीच परिक्षा घेतो, किंवा सोन्याचा कस तावुन सुलाखून लागतो वगैरे वगैरे वगैरे. अशा वेळी, असं वाचलं की जरा तरी जरा बरं वाटतं, नाही?
पण सगळ्यात महाभयंकर माणसे ती आहेत जी तुमचे सुख, आनंदही बघु शकत नाहीत. आता मग, क्या करनेका ऐसे लोगोंका भाय!!
मला वाटतं की प्रत्येकाच्याच वाट्याला आलेले हे पॅकेज डिल आहे. Everybody is living between a group of good and bad people, rather well wishers and bad wishers.
अशी खुप उदाहरणं आहेत जेव्हा आपल्या मनातला आनंद ओसंडून वाहत असतो आणि असं वाटतं की घरी येईपर्यंत तो आनंद आपण भरभरून वाटत सुटावा. सगळ्यांनी तो मोकळ्या हातांनी घ्यावा देखील. पाठीवर शाबासकीची थाप पडावी, ऐकणार्याच्या डोळ्यात चमक दिसावी. आणि असं खुप खुप काही. उदाहरणच द्यायचे झाले तर परिक्षेत चांगल्या मार्काने पास झाल्यावर, स्पर्धा जिंकल्यावर, नोकरी, प्रमोशन वगैरे, आणि असं काहीच नसेल तर आपला हक्काचा वाढदिवस तरी. या वाढदिवसाची मात्र गंमत असते हां, आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा हा दिवस. अगदी वर्षातले दिवाळी दसरे सगळे सण जणू या एका दिवसात एकवटतात आपल्यासाठी. मला आठवतंय, लहान असताना मी तीन चार महिने आधीपासूनच दिवस मोजायला सुरवात करायचे की आता वाढदिवसाला अमुक अमुक दिवस उरले वगेरे. अर्थात प्रत्येकाच्याच या भावना असतात लहानपणी.
पण आपल्याला जे वाटते ते तसेच reciprocate होतेच असे नाही, rather बरेचदा होतच नाही. म्हणजे समोरच्याला तुमच्या आनंदात अजिबात ईंटरेस्ट नसतो. अशावेळी मग वा वा, छान, ok, बरं झालं अशा कोरड्या प्रतिक्रिया ऐकताना मग त्यांच्या नजरेत दिसणारी असुया, किंवा 'हं, उसमे कोनसी बडी बात है' टाईप चे विचार न सांगताही आपसूकच कळतात.
अशा माणसांबरोबर जमवुन घेता येत नाही आणि तोडुनही टाकता येत नाही अशी तारेवरची कसरत जेव्हा होते तेव्हा मग समजवावं आपलं आपल्यालाच की हे बंध 'नायलॉनचेच बंध' आहेत! आणि तसंही
हा जो "उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे" वाला जो एॅटीट्युड आहे ना हा रिन पुरताच मर्यादित नाही राहीला आता, माणसामाणसात, नात्यात पण खोलवर रुजलाय तो.
Can't help it for that.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Be Positive and optimistic
पोळी खाताना आपण नेहमी ताटातील पोळीचे छोट्या छोट्या तुकड्याचे घास करतो आणि मग पोळी संपवतो. तसंच काहीसं आपण आपल्या ध्येया बाबतीत व त्यातून मिळणाऱ्या यशा बाबतीत वागावं. लहान सहान गोष्टी celebrate करायला सुरूवात करायला हवी.
पुढचे संपूर्ण वर्ष कसं जाईल किंवा मागचे वर्षे कसे गेले याचा overall विचार करत बसण्यापेक्षा आजचा दिवस किती छान जाईल किंवा आजचा दिवस किती छान होता यावर रोज purposefully विचार करायचा.
कठीण आहे पण ही सवय मनाला लावून घ्यायला हवी.
500 meter rule
500-Metre Cap Rule, Practicality Speaking, Would Not Affect Much to the Fans. You Know, that People Are Ready to Travel 600 Kilometres Far Away till Goa For the Same!
कमाई
पैसे किती कमावले यापेक्षा माणसं किती कमावली हे जास्त महत्वाचे!
पैसे कोणीही कमावू शकतं. त्यात फरक फक्त आकड्यांचाच असतो.
-
http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 7, 2017
विमान प्रवास बंदी
खासदार महाशयांवर भारतीय एअरवेजने त्यांच्या विमानप्रवासावर बंदी आणली आहे. पण आंतरराष्ट्रीय एअरवेजने नाही काही...!
मग जर का विमान प्रवास करायचाच्च असेल तर आंतरराष्ट्रीय एअरवेज ही वापरू शकतातच की ते!
उदाहरणार्थ मुंबई-अहमदाबाद व्हाया ऑस्ट्रेलिया. किंवा मुंबई-दिल्ली व्हाया अॅमस्टरडॅम.
का कही?
डॉटर्स आर नॉट अ टेन्शन, डॉटर्स आर लाईक टेन सन
डॉटर्स आर नॉट अ टेन्शन,
डॉटर्स आर लाईक टेन सन
हे असले मेसेजेस लिहीणारे, आणि हे मेसेजेस फाॅरवर्ड करणारे अत्यंत मागासलेल्या विचारांचेच आहेत असे मला वाटते.
मुलगी होणे किती चांगली गोष्ट आहे हे सांगण्यासाठी अजूनही मुलांशीच तुलना करावी लागते यापेक्षा दुर्दैवी काय असेल .
पुणेरी पुणेकर
चितळ्यांच्या श्रीखंडासाठी वगैरे ठिके पण मी ऐकलं की पुण्यात म्हणे कुठेतरी फोडणीची पोळी चांगली मिळते, तिथेही पुणेकर रांगा लावतात.
जातपात आणि डाळ भात
जातपात वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत हो.
शेवटी सगळी माणसे सारखीच असतात.
उदाहरणच द्यायचं झालं तर...
हाॅटेल मध्ये गेल्यावर अर्धा तास तरी मेनू कार्ड परत परत वाचतात आणि काय खावं, काय मागवावं हे सुचलं नाही की सरळ डाळ तडका आणि जीरा राईस किंवा दाल-खिचडी ऑर्डर करतात.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Mar 8, 2017
Best of luck to SSC HSC
SSC HSC च्या परिक्षा सुलु झाल्या आहेत.
परीक्षेला बसलेल्यांना नम्र विनंती पेपरात btw,vl,gm,2day,u,b4 असे शॉर्टकट वापरू नका..
तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला बसलायत WhatsAppच्या परीक्षेला नाही...
happy women's day महिला दिनाच्या शुभेच्छा
महिलांना फक्त Chat आणि Chatting ह्या दोनच गोष्टी आवडतात असा लोकांचा (गैर) समज आहे बहुतेक. कारण ठाण्यात आज प्रशांत काॅर्नर आणि अजुनही काही ठिकाणी पाणीपुरी, शेवपुरी वर 50% डिस्काउंट आहे.
फोटोचा आल्बम
कोणताही जुना फोटोंचा आल्बम पाहताना त्या फोटोत आपण स्वतः आणि त्यात आपल्या बरोबर असलेले बाकीचेही अजागळ का वाटतात!
बदल हवाच
आजच्या काळातील परिस्थिती पाहता शालेय अभ्यासक्रमात असलेले वीस मार्कांचे नागरिकशास्त्र आता शंभर मार्कांचे करायला हवे असे वाटते.
महिला दिन शुभेच्छा happy women's day
Zमहिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आज जर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला की माग तुला काय हवे ते तर माझं ठरलय काय मागायचे ते. -
आज या महिला दिनाच्या निमित्ताने केवळ
मुलगी नको म्हणून अवैधरीत्या गर्भपात करण्याचीही तयारी असणार्यांना, असे न करण्याची उदंड सद्बुद्धी देवो आणि गावखेड्यात, आदिवासी पाड्यात पोटभर अन्न व अंगभर कपड्यासाठी हाल सहन करणार्या महिलांना त्यांच्या बेसिक गरजा पुर्ण होवोत, हीच आजच्या दिवशी अगदी पोटतिडकीने मनापासुन देवाजवळ केलेली प्रार्थना
.
Feb 18, 2017
आज या ठिकाणी
भाषण करताना कमीत कमी पाच मिनिटे तरी - 'आज या ठिकाणी' - हे न म्हणता भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करायला हवी.
Infact हा Criteriaच ठेवायला हवा.
प्रचार
निवडणूकीच्या निमित्ताने भाषणे, रॅली, सभा सगळीकडे उत्साहाने आणि पोटतिडकीने सुरू आहे.
चांगलीच गोष्ट आहे.
परंतू या प्रचार मोहीमेत रोजच्या रोज इतक्या प्रचारपत्रिका घरी येत आहेत. त्यांचं काय करायचं मग?
100days
संपले (की संपवले) एकदाचे 100 डेज!
You Never know what happens next या नोट वर संपवलेत. त्यामुळे थोडे दिवसात '100 days दोबारा' ची तयारी ठेवा.
#zeemarathi
#100days
Feb 15, 2017
मतदान
महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता
मतदारांना प्रश्न पडला आहे की मत कोणाला द्यायचे?
पक्ष की उमेदवार! !
Feb 14, 2017
मत मनोगत
वाचकांनो, तुमचे मत ,अभिप्राय जाणुन घ्यायला मला नक्की आवडेल.
Comments section मध्ये तुमचे मत जरूर कळवा.
सल्ला (गार)
काही लोक जिथे कुठे भेटतील तिथे लगेचच फुकटचे सल्ले द्यायला उत्सुक असतात.
नव्हे, त्यांना असे वाटते की तेच सर्व श्रेष्ठज्ञानी आहेत या पृथ्वीतलावरचे आणि समोरची व्यक्ती बालवाडी नापासच!
असाच एक अनुभव लेखक चंद्रशेखर गोखले यांनी शेअर केला. तो असा -
आपल्याकडे मुंबईत, दमट हवेमुळे चांदीच्या मुर्ती लगेच काळवंडतात... ते बघून त्यांच्या कडे आलेल्या एका स्नेहींचे मन द्रवले व लगेचच त्यांना ज्ञानाचा पाझर फुटला. त्या म्हणाल्या, " कसे दिसतात नाही हे काळवंडलेले देव? कोणी म्हणणार नाही हे चांदीचे आहेत. आता मी सांगते तो उपाय करा बघा. दर आठ दहा दिवसानी सगळे देव उचलायचे आणि कुकर मधे टाकायचे. सोबत लिंबाच्या दोन फोडी कुकर मधे टाकायच्या आणी चांगल्या दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या. मग कुकर उघडा आणि बघाच की सगळे देव कसे चकाचक होतात!!!!!!
...मजाल आहे एक जरी देव काळा राहिला तर, (अगदी विठ्ठल देखील)!"
-
आता हद्द झाली की नाही? एवढं काॅन्फीडन्टली असा महाभयंकर सल्ला कसा काय कोणी देऊ शकतं, तेही फक्त देव चकचकीत दिसण्यासाठी?
देवा, तुच वाचव रे अशा लोकांपासून!
-
प्रज्ञा
चला हवा येऊ द्या
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम कधी रंगतो तर कधी नाही..!
पण मध्यंतरी आभाळमाया आणि वादळवाटच्या टायटल साँगने उगाचच गहिवरून डोळे ओलावले.
एपिसोड वसुल!!
#चलाहवायेऊद्या
#zeemarathi
Http://majheviewsanireviews.blogspot.in
तुतारी आणि गौरी
पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी शौर्य प्रसंगी तुतारी फुंकली जात असे.
आता मात्र ती तुतारी,
..
..
..
..
'अखिल भारतीय सदगुणांची महान प्रतीकृती मीच आहे रे' संघटनेची अध्यक्ष असलेल्या गौरीने, सासुबाईंवर इम्प्रेशन मारणारा डायलॉग म्हटला की ऐकु येते.
#kahediyapardes
#zeemarathi
Https://majheviewsanireviews.blogspot.in
-
प्रज्ञा
संवाद
बरेचदा असे होते, की आपण आपल्या काही कामात असतो आणि समोरची व्यक्ती त्याच्या आवडीच्या किंवा त्याच्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयावर बोलायला येते. आपण मात्र कुठेतरी जायच्या गडबडीत असतो किंवा हातातले काम आटपायच्या मनस्थितीत असतो. अशावेळी ना त्या व्यक्तीला टाळू शकत, ना त्याच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करू शकत. आणि मग लक्ष नसतानाही जेव्हा लक्ष असण्याचा आव आणावा लागतो तेव्हा प्रॉब्लेमच होतो.
ही परिस्थिती जवळपास सर्वच जण फेस करतात. मग अशा वेळी प्रत्येक जण काही ठराविक प्रतिक्रिया देतात. उदाहरणार्थ -
1. हो ना, अगदी बरोबर आहे तुझं!
(समोरच्याने काहीही म्हटले तरी आपण हेच म्हणायचे)
2.अगं/अरे माझ्या घरी पण सेम परिस्थिती, माहीत आहे? काही फरक नाही.( उगाच काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं जाणारं वाक्य)
3. खरय तुझं म्हणणं. पण तुला स्वतः ला काय वाटतय यावर, ते आधी मला सांग.! (आपण समोरच्याच काहीही ऐकलेले नसले, तरी हे वाक्य बिनधास्त ठोकू शकतो)
4. कुणी काही करू दे, आपण चांगलंच वागायचं.! (कोणत्याही situation मध्ये लागु होणारे वाक्य)
5.नको मनावर घेऊ, अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि आपण कोणाचे वाईट केले आहे का? मग आपलं कशाला वाईट होईल?
( हे 100 पैकी 100 जणांना वाटते. )
आणि सगळ्यात आवडीचा, फेमस असणारा डायलॉग -
6. वातावरणच बघ ना किती खराब आहे. Climateच हल्ली चांगले नाही. ( हे वाक्य आता वर्षभरात कोणत्याही रुतु मध्ये कधीही लागु होते.)
What Say!
Http://majheviewsanireviews.blogspot.in
-
प्रज्ञा
फोटोग्राफी
घरगुती फोटो काढताना सहसा आपण बॅकग्राऊंडचा विचार करत नाही. उशा-चादरीचा ढीग रचलेल्या काॅटच्या पुढे, खिडकीला टेकुन-जिथे मागे कपडे वगैरे वाळत घातलेले असतील, किंवा भरगच्च वस्तुंनी ओथंबून वाहत असलेल्या टिव्ही शोकेस च्या बाजुला अशा कोणत्याही ठिकाणी अँगल, फ्रेम वगैरे चा विचार न करता आपण बेधडक फोटो काढतो आणि धपाधप शेअर करत राहतो.
त्यात ते फोटो जर आपल्या लेकरांचे, मुलाबाळांचे असतील तर, तर कोण बॅकग्राऊंड वगैरे बघतोय? तेव्हा लक्ष फक्त आपल्या पिल्लांकडे असतं! बरोबर ना?
आपल्या माधुरी दीक्षित-नेने पण याला अपवाद नाहीत हां!
Celebrity असली तरी काय झालं. आखीर 'मां' तो 'मां' होती है!
फोटो काढताना मुलांचे स्माईल महत्वाचे!
मागे असलेली असंबद्ध फोटो फ्रेम असो वा पॅरागाॅनची स्लीपर!!
क्या फरक पडता है!
#madhuridixitnene
-
Http://majheviewsanireviews.blogspot.in
आज या ठिकाणी. ..........
भाषण करताना कमीत कमी पाच मिनिटे तरी - 'आज या ठिकाणी' - हे न म्हणता भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करायला हवी.
Infact हा Criteriaच ठेवायला हवा.
Jan 23, 2017
हम बेवफ़ा हरगिज़ न थे .....
हम बेवफ़ा हरगिज़ न थे
पर हम वफ़ा कर ना सके
हमको मिली उसकी सजा
हम जो ख़ता कर ना सके
धर्मेंद्रवर चित्रीत करण्यात आलेले हे खरंतर खुप श्रवणीय गाणे! शब्द ही छान आहेत.
पण बॅकग्राऊंडला 'झिंगालाला हं झिंगालाला हं भर्र...भर्र...' हे म्युझिक का बरे दिले असेल ते मात्र कळले नाही.
http://majheviewsanireviews.blogspot.in
#veenaworld आवरा रे त्या जाहिराती
"सकाळी लवकर उठायला जमेल ना?????"
.
.
वीणा वर्ल्ड घरगुती शाकाहारी जेवणाबरोबरच एक 24 तास कंपनी देणारा आणि टोमणे मारणारा सेक्रेटरी कम पर्सनल टुर कोऑर्डीनेटर पण हनीमून
पॅकेज मध्ये फ्री देतात, आणि ते पण भरघोस डिस्काउंट देऊन!
#काहेदियापरदेस
#veenaworld
#आवरारेत्याजाहिराती
-
प्रज्ञा
Http://majheviewsanireviews.blogspot.in
विकता का उत्तर
माझी अडीच वर्षाची 'तेजस्वी' या चित्रातील
CPU, Monitor, keyboard हे सगळे पार्टस् दाखवते.
पण आज तिने विचारले की ....
या सगळ्यांत काँप्युटर कुठेय !!!!!!!!!
तुतारी
पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी शौर्य प्रसंगी तुतारी फुंकली जात असे.
आता मात्र ती तुतारी,
..
..
..
.. 'अखिल भारतीय सदगुणांची महान प्रतीकृती मीच आहे रे' संघटनेची अध्यक्ष असलेल्या गौरीने, सासुबाईंवर इम्प्रेशन मारणारा डायलॉग म्हटला की ऐकु येते.
Https://majheviewsanireviews.blogspot.in
-
प्रज्ञा
Jan 1, 2017
तुमचेही मत महत्वाचे
तुम्ही सगळे माझ्या घराबाहेर च्या कुटुंबातील सदस्यच आहात.
म्हणून एक लिंक तुमच्या बरोबर शेअर करतेय.
स्पर्धा परीक्षा या आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. माझ्या लहानग्या चिमणीनेही भाग घेतला आहे एका गोड स्पर्धेत!
तुम्ही या लिंक वर क्लिक करा आणि तुमचे मत जरूर द्या.
'Tejasvi ' has participated in 'Cutest Baby' competition.
Please click on the link below to give your precious vote to her.
http://www.parentingnation.in/baby-photo-contest-india/Babyname_Tejasvi_Pandit_307133
Give Your Vote too
As you all have become my extended family, sharing something with you all -
My Daughter, 'Tejasvi ' has participated in 'Cutest Baby' competition.
Please click on the link below to give your precious vote to her.
http://www.parentingnation.in/baby-photo-contest-india/Babyname_Tejasvi_Pandit_307133
मोलाचा आशिर्वाद
आज चालता चालता लेकीने एका अनोळखी वयस्कर बाईला 'आssssज्ज्जी' अशी हाक मारली. तिने वळून पाहिलं. अचानक अशी हाक ऐकुन तिला झालेला आनंद तिच्या नजरेत दिसत होता. थांबुन तिने फक्त लेकीच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढे निघून गेली.
मग परत एकदा जाणवलं की ज्यांच्या पुढे वाकता येईल, ज्यांच्या थरथरत्या हातांचा, मायेचा, आशिर्वादपर स्पर्श मस्तकाला होईल अशी वडीलधारी माणसं आयुष्यात असणं ही प्रत्येकाच्याच बाबतीत किती भाग्याची गोष्ट आहे!
-
प्रज्ञा
शुभेच्छा
कोणालाही कमी न लेखता, उणीवा न काढता, असलेल्या श्रीमंतीचा बडेजाव न करता किंवा वाट्याला आलेल्या गरीबीने खचून न जाता जगायला शिकलो ना, तर नववर्षातील येणारा प्रत्येक दिवस सगळ्यांना छानच जाईल.
कारण,
"पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे अधिक महत्वाचे असतात"....!
त्यामुळे तुमच्याकडच्या समृद्ध अनुभवाने इतरांनाही जगायला शिकवा.
#happynewyear
#नववर्षाच्या शुभेच्छा
-
प्रज्ञा
Subscribe to:
Posts (Atom)