Feb 14, 2017

फोटोग्राफी

घरगुती फोटो काढताना सहसा आपण बॅकग्राऊंडचा विचार करत नाही. उशा-चादरीचा ढीग रचलेल्या काॅटच्या पुढे, खिडकीला टेकुन-जिथे मागे कपडे वगैरे वाळत घातलेले असतील, किंवा भरगच्च वस्तुंनी ओथंबून वाहत असलेल्या टिव्ही शोकेस च्या बाजुला अशा कोणत्याही ठिकाणी अँगल, फ्रेम वगैरे चा विचार न करता आपण बेधडक फोटो काढतो आणि धपाधप शेअर करत राहतो. त्यात ते फोटो जर आपल्या लेकरांचे, मुलाबाळांचे असतील तर, तर कोण बॅकग्राऊंड वगैरे बघतोय? तेव्हा लक्ष फक्त आपल्या पिल्लांकडे असतं! बरोबर ना? आपल्या माधुरी दीक्षित-नेने पण याला अपवाद नाहीत हां! Celebrity असली तरी काय झालं. आखीर 'मां' तो 'मां' होती है! फोटो काढताना मुलांचे स्माईल महत्वाचे! मागे असलेली असंबद्ध फोटो फ्रेम असो वा पॅरागाॅनची स्लीपर!! क्या फरक पडता है! #madhuridixitnene - Http://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment