Feb 14, 2017

संवाद

बरेचदा असे होते, की आपण आपल्या काही कामात असतो आणि समोरची व्यक्ती त्याच्या आवडीच्या किंवा त्याच्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयावर बोलायला येते. आपण मात्र कुठेतरी जायच्या गडबडीत असतो किंवा हातातले काम आटपायच्या मनस्थितीत असतो. अशावेळी ना त्या व्यक्तीला टाळू शकत, ना त्याच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करू शकत. आणि मग लक्ष नसतानाही जेव्हा लक्ष असण्याचा आव आणावा लागतो तेव्हा प्रॉब्लेमच होतो. ही परिस्थिती जवळपास सर्वच जण फेस करतात. मग अशा वेळी प्रत्येक जण काही ठराविक प्रतिक्रिया देतात. उदाहरणार्थ - 1. हो ना, अगदी बरोबर आहे तुझं! (समोरच्याने काहीही म्हटले तरी आपण हेच म्हणायचे) 2.अगं/अरे माझ्या घरी पण सेम परिस्थिती, माहीत आहे? काही फरक नाही.( उगाच काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं जाणारं वाक्य) 3. खरय तुझं म्हणणं. पण तुला स्वतः ला काय वाटतय यावर, ते आधी मला सांग.! (आपण समोरच्याच काहीही ऐकलेले नसले, तरी हे वाक्य बिनधास्त ठोकू शकतो) 4. कुणी काही करू दे, आपण चांगलंच वागायचं.! (कोणत्याही situation मध्ये लागु होणारे वाक्य) 5.नको मनावर घेऊ, अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि आपण कोणाचे वाईट केले आहे का? मग आपलं कशाला वाईट होईल? ( हे 100 पैकी 100 जणांना वाटते. ) आणि सगळ्यात आवडीचा, फेमस असणारा डायलॉग - 6. वातावरणच बघ ना किती खराब आहे. Climateच हल्ली चांगले नाही. ( हे वाक्य आता वर्षभरात कोणत्याही रुतु मध्ये कधीही लागु होते.) What Say! Http://majheviewsanireviews.blogspot.in - प्रज्ञा

No comments:

Post a Comment