Apr 18, 2017
मनातलं काही
माणसांची पारख जशी तुमच्या कठीण काळात होते तशीच तुमच्या सुखाच्या काळातही. तुमच्या वाईट क्षणात एखाद्या व्यक्तीने साथ नाही दिली तर समजू शकतो की चल ठिक है, ते दुःख दुरूनही सहन करण्याची त्या व्यक्तीची पात्रता, क्षमता नाही. चल, माफ किया. किंवा मग अशावेळी ते आपल्याला आलेले फाॅरवर्डेड मेसेजेस आठवावेत की देव फक्त चांगल्या माणसांचीच परिक्षा घेतो, किंवा सोन्याचा कस तावुन सुलाखून लागतो वगैरे वगैरे वगैरे. अशा वेळी, असं वाचलं की जरा तरी जरा बरं वाटतं, नाही?
पण सगळ्यात महाभयंकर माणसे ती आहेत जी तुमचे सुख, आनंदही बघु शकत नाहीत. आता मग, क्या करनेका ऐसे लोगोंका भाय!!
मला वाटतं की प्रत्येकाच्याच वाट्याला आलेले हे पॅकेज डिल आहे. Everybody is living between a group of good and bad people, rather well wishers and bad wishers.
अशी खुप उदाहरणं आहेत जेव्हा आपल्या मनातला आनंद ओसंडून वाहत असतो आणि असं वाटतं की घरी येईपर्यंत तो आनंद आपण भरभरून वाटत सुटावा. सगळ्यांनी तो मोकळ्या हातांनी घ्यावा देखील. पाठीवर शाबासकीची थाप पडावी, ऐकणार्याच्या डोळ्यात चमक दिसावी. आणि असं खुप खुप काही. उदाहरणच द्यायचे झाले तर परिक्षेत चांगल्या मार्काने पास झाल्यावर, स्पर्धा जिंकल्यावर, नोकरी, प्रमोशन वगैरे, आणि असं काहीच नसेल तर आपला हक्काचा वाढदिवस तरी. या वाढदिवसाची मात्र गंमत असते हां, आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा हा दिवस. अगदी वर्षातले दिवाळी दसरे सगळे सण जणू या एका दिवसात एकवटतात आपल्यासाठी. मला आठवतंय, लहान असताना मी तीन चार महिने आधीपासूनच दिवस मोजायला सुरवात करायचे की आता वाढदिवसाला अमुक अमुक दिवस उरले वगेरे. अर्थात प्रत्येकाच्याच या भावना असतात लहानपणी.
पण आपल्याला जे वाटते ते तसेच reciprocate होतेच असे नाही, rather बरेचदा होतच नाही. म्हणजे समोरच्याला तुमच्या आनंदात अजिबात ईंटरेस्ट नसतो. अशावेळी मग वा वा, छान, ok, बरं झालं अशा कोरड्या प्रतिक्रिया ऐकताना मग त्यांच्या नजरेत दिसणारी असुया, किंवा 'हं, उसमे कोनसी बडी बात है' टाईप चे विचार न सांगताही आपसूकच कळतात.
अशा माणसांबरोबर जमवुन घेता येत नाही आणि तोडुनही टाकता येत नाही अशी तारेवरची कसरत जेव्हा होते तेव्हा मग समजवावं आपलं आपल्यालाच की हे बंध 'नायलॉनचेच बंध' आहेत! आणि तसंही
हा जो "उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे" वाला जो एॅटीट्युड आहे ना हा रिन पुरताच मर्यादित नाही राहीला आता, माणसामाणसात, नात्यात पण खोलवर रुजलाय तो.
Can't help it for that.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment