Apr 18, 2017
चुलीवरचे जेवण
चूलीवर स्वयंपाक करणेच काय पण कपभर चहा करणे देखील सोपे काम नाही. हवेची झुळुक आल्यावर अचानक त्या दिशेने भडकणारी आग कंट्रोल करत त्यावर स्वयंपाक करणे 'खाऊकाम' नाही. क्षणभर जरी लक्ष नसेल तरी त्या आगीची ज्वाळा त्रासदायक ठरू शकते. चुलीवर काम करणार्या बाईच्या हाताला एकही चटका नाही असे चित्र तुम्हाला कधीच दिसणार नाही. जिथे तुमच्या आमच्या सारख्यांच्या सुसज्ज स्वयंपाक घरात उन्हाळ्यात तासभर पण उभे राहणे कठीण तिथे चुलीसमोर बसून स्वयंपाक करणे किती महाकठीण आहे हे लक्षात घ्या.
त्यामुळे 'सो कॉल्ड' खवय्ये लोकांची 'चुलीवरच्या जेवणाची हौस' भागवण्याच्या ट्रेंड साठी गरीब गरजू महिला चार पैशासाठी तासनतास चुलीसमोर झिजतात किंवा झिजवून घेतल्या जातात हे अजिबात बघवत नाही.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment