May 6, 2017
घरोघरी मातीच्या चुली
ऑफिस मधुन तो लोकल ट्रेन चे धक्के खात एकदाचा घरी पोहोचतो. वेळे आधीच निघाल्याने तो जरा लवकरच घरी येतो. फ्रेश होऊन चहाचा कप घेऊन निवांत बसतो.
IPL ची मॅच पाहायची असते पण 'घरोघरी मातीच्या चुली' या रिवाजा प्रमाणे आई आणि बायको टिव्हीच्या अतिगंभीर (?) सामाजिक (??) मराठी मालिका बघत असतात. दोघीही
आत्ता रडतील की मग या expression मधे डोळ्याला अनुक्रमे साडीचा पदर आणि ओढणीचे टोक लावुन टिव्ही पाहण्यात गुंग
असतात.
तेवढ्यात ...
त्या मालिकेत ( बहुदा का हे दिया परदेस टाईप असावी ) एका प्रसंगात
अम्मा टाईप सासूचे आणि गौरीटाईप सुनेचे भांडण होते. बघता बघता आईची एक धारदार नजर मुलाकडे जाते , तो मुद्दाम खुप लक्ष देऊन टिव्ही बघत असल्याच्या आविर्भावात एकटक सिरियल पाहण्याचा प्रयत्न करतो.
तेवढ्यात. .
मालिकेत दुसऱ्या प्रसंगात सून हमसून हमसून
रडत असते. ते पाहून तिकडून बायको त्याच्याकडे तिरकस नजरेने बघते.
तरीही तो परत मुद्दाम खुप खुप
लक्ष देऊन टिव्ही बघत असल्याच्या आविर्भावात एकटक सिरियल पाहण्याचा प्रयत्न करतो. थोड्याच वेळात मग दोघींची नजर आपल्याकडेच आहे हे त्याच्या लक्षात येते. व तो चुपचाप उठुन परत घराबाहेर पडतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment