May 6, 2017
कलिंगड
कलिंगड विकत घेणे म्हणजे 'चांगले' कलिंगड विकत घेणे हे खरंच खूप कौशल्याचे काम आहे. लालचुटुक, लालबुंद, रवाळ आणि अमृततुल्य गोड चवीचे कलिंगड हे ज्या दिवशी तुमचं 'लक' चांगले असेल तेव्हाच तुम्हाला मिळते असे आता माझे ठाम मत झाले आहे. म्हणजे असं बघा, तुम्ही कलिंगडवाल्या 'भय्या' कडे जाता, select करायच्या आधी भाव करता, म्हणजे 80 का 70 मे दो, 50 का 40 मे दो, वगैरे. मग ते झाल्यावर 2-4 कलिंगड उचलून त्यांना उलटसुलट फिरवून बघता, त्यावर हाताने वाजवून पाहता. असे केल्याने काय कळतं आणि हे किती जणांना कळतं हा एक संशोधनाचाच विषय आहे
तर.... असे केल्याने तुम्हाला काहीही कळलेले नसते हे त्या 'भय्या' ला एव्हाना चांगलेच कळलेले असते. मग तुम्हाला 'चांगले कलिंगड कसे निवडायचे' हे कुठेतरी वाचल्याचे, ऐकल्याचे आठवते. मग परत तुम्ही चांगले कलिंगड निवडायचा प्रयत्न करता. असे करत करत दहा मिनिटे तिथेच वेळ घालवता. मग कंटाळून शेवटी ती जबाबदारी (मोठ्या मनाचा आव आणत) त्या 'भैया'लाच देता. की ले लो भैय्या अब तुम्हीच देखो कोनसा अच्छा है. मग तो त्यातलेच एक अंदाजपंचे select करून upselling करता करता तुमच्या हवाली करतो. म्हणजे अच्छा है अच्छा है पण म्हणेल आणि अब हम अंदर झांक के तो नही देखे है ना साब म्हणत सेफ साईडला पण राहील. आणि इतक्या मेहनती नंतर घरी येऊन तुम्ही ते खायला सुरुवात करता. आणि जर ते चांगले निघाले नाही तर ती जगातील सगळ्यात मोठी फसवणूक झाली असल्याचा फिल येतो. पण तेच जर चवदार असेल तर घरच्या सगळ्यांबरोबर कलिंगड खाणे हा एक सोहळाच होतो. You All Should Agree it. असे कधी झालय का की जशी जेवताना वादावादी होते कधी, तशी कलिंगड खात असताना घरात खुप भांडणे चालली आहेत? किंवा भांडता भांडता कलिंगड खातायत?
ते शक्यही नाही. कारण खाणारा एवढा तन्मयतेने आणि मनापासुन खातो की त्यावेळी सगळ्यात Busy झालेलो असतो आपण. अगदी महत्वाचा फोन आला तरी तो उचलायला हात फ्री नसतात.
माझ्या मते आंबा हा जर फळाचा राजा आहे तर कलिंगड हे मला बुध्दीबळातल्या पटावरचा प्रधान वाटतो-flexible-कोणालाही परवडणारा, नेत्रसुखद आणि असह्य उन्हाळा सुसह्य़ करणारा.
So happy eating to you all and wish you a very happy watermelon this summer.
#summer #chitchat #watermelon #seasonfruit #happyeating
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment