May 6, 2017

येळकोट येळकोट जय मल्हार

काही काही मालिका संपल्या यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागतोच. आताही तशीच परिस्थिती आहे 'जय मल्हार' च्या बाबतीत! इतर देवादिकांच्या मालिकांचे आपल्याकडे जसे मनापासून स्वागत होते तसेच जय मल्हारचेही झाले. या मालिकेचे कथानक नविन होते. चपखल स्टारकास्ट, शीर्षक गीत, संगीत, अॅनिमेशन दृश्ये, भरजरी वस्त्रे आणि दागदागिन्यांची नेत्र सुखद भव्यता, चंपासष्ठी महत्त्व व चैत्रउत्सवाची माहिती या सर्व जमेच्या बाजु असलेल्या मालिकेचा कथेचा गाभा मात्र बरेचदा डळमळीत झाला. पाणी घालून, खेचत ताणत मालिका सुरू राहिली. विशेषतः बानु-म्हाळसा यांना पुर्वजन्माची आठवण हा विषय जवळपास सहा महिन्या पेक्षा जास्त सुरू होता. देवांच्या मल्हारी मार्तंड अवतारात घडलेले अजुनही बरेच रंजक किस्से, चमत्कार, पराक्रम प्रेक्षकांना बघायला, समजुन घ्यायला आवडले असते. परंतु मालिकेत बानु-मल्हारदेवांच्या विवाहानंतर तर ही मालिका प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याचा 'फिल' येत राहिला. असो. अंत भला तो सब भला. ओव्हर आॅल ही मालिका ज्येष्ठ नागरिकांकडुन वाखाणली गेली. आणि संध्याकाळी दिवेलागणीला जय मल्हार चे शीर्षक गीत ऐकू येणार नाही ही गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवेल . - .. .. ... येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट #झीमराठी #zeemarathi #jaimalhar #जयमल्हार #lastepisode Http://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment