Jul 15, 2017
#MPK
1989 ला म्हणजे शाळेत सहावी की सातवीला वगैरे असताना मैने प्यार किया प्रदर्शित झाला. आणि त्याच्या 2 वर्षे आधी कयामत से कयामत तक. तेव्हा सलमान आणि आमिर आवडत नाही अशी बहुधा एकही शाळकरी किंवा काॅलेज गोईंग व्यक्ती नसायची. घरी व्हीडीओवर व्हीसीआर, व्हीसीपी आणून सिनेमा बघायचा तो काळ.
पण...
आता मात्र...
मागच्या काही वर्षांतल्या सलमानच्या कारनाम्यांमुळे त्याचा आख्खा सिनेमाच नाही तर टिव्ही वरचा कोणता शो ही पाहायची ईच्छा होत नाही.
नुकताच तो कपिल शर्मा शो मध्ये ट्युब लाईट च्या प्रमोशन साठी आला होता.
ओढून ताणून हिरो ची 'पोस्ट' पकडून ठेवण्याच्या नादात त्याचा जो 'अवतार' झालाय तो पाहता तर तो आता एक मिनीट भर ही सहन होत नाही.
कसे काय त्याचे सिनेमे 'कोटीच्या कोटी उड्डाणे' करतात काय माहीत!
#bollywood #salman #tkss #mpk
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment