Jul 20, 2017
मलिष्का ........
सद्य परिस्थितीत रातोरात बाकीचे सगळे सामाजिक, आर्थिक, राजकीय विषय बासनात गुंडाळले गेले. फक्त आणि फक्त, मलिष्का आणि तिने गायलेले गाणे रडार वर आले आहे. बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रात प्रमुख बातमी मलिष्का, तिचे गाणे आणि त्यात तिच्या घरी सापडलेल्या डेंग्यूच्या अळ्या हीच वाचायला मिळत आहे.
शेतकरी समस्या, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, आणि सगळ्यात महत्वाचा विषय - #GST.
ह्या सगळ्या घडामोडी आणि त्याचे अपडेट्स अचानक दुय्यम स्थानावर गेले
आता मलिष्काने लोकांची दूखती रग गाण्यातून
विस्तारित केली आहे. पण या आधीही पथनाटय़, विडंबन गीते इत्यादी लोककला प्रकारातून जनतेचे म्हणणे मांडले जातच आहे की. मग अब्रुनुकसान, बदनामी, इगो, मानसिक खच्चीकरण हे सगळे मुद्दे पुढे करून आणि अरे ला कारे करून, गाण्याला गाण्यातून व्यक्त होऊन सर्वांचाच कार्यकालीन वेळ विनाकारण दवडला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment