Nov 30, 2015

व्यक्ती स्वातंत्र्य

नमस्कार, आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर हा एक आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्स तसेच वाॅट्सप वैयक्तिकच नव्हे तर बरेचदा ऑफिशियल कारणासाठीही वापरले जाते. प्रत्येकाच्या वाॅट्सपवर एकतरी ऑफिशियल ग्रूप असतोच! त्यामुळे त्याचा सतत वापर होणार ही वस्तूस्थिती आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काही नियम मात्र काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे आहे  'व्यक्तीस्वातंत्र्य' आणि प्रत्येकाची 'स्पेस' जपणे. समोरची व्यक्ती आपला जोडीदार किंवा इतर कोणतीही जवळची नातलग असली तरी तिच्या अपरोक्ष मोबाइल चेक करणे आणि त्यावर सवाल जवाब करणे हा एकप्रकारचा मनोविकारच आहे. त्याचबरोबर समोरच्याने एखादी गोष्ट 'सांगितली नाही' म्हणजे ती 'लपवली' असा अर्थ काढु नये. कामाच्या गडबडीत किंवा कधीकधी कमी महत्वाची वाटल्यामुळे ती सांगीतली जात नाही हे समजून घ्यायला हवे. त्याचबरोबर 'पारदर्शकता' आणि 'क्षमाशील पणा' ही तितकाच महत्त्वाचा! 'चुक' ही प्रत्येकाकडून होते; कधी नकळत कधी चुकुन तर कधीकधी चक्क मुद्दाम!! त्यामुळे कधी अशी चुक निदर्शनास आली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करावी. व.पु काळेंच्या 'पार्टनर' या पुस्तकातील एक वाकय खुप समर्पक आहे, "नाते नवराबायकोचे असो वा रक्ताचे ते गुलाबाच्या फुलाप्रमाणे असावे. कळी पासून पाकळ्या जितक्या दुरवर फुलतील तितके फुलाचे सौंदर्य अधीक खुलून दिसते".

No comments:

Post a Comment