'का रे दुरावा ' मधील रिसेप्शनीस्ट नैना असो वा 'होणार सून मी ह्या घरची' मधील 'श्री' चे बाबा असो; टिव्ही मालिकांमधील ही अशी महत्वाची पात्रे बराच काळ गायब असणे हे प्रेक्षकांसाठी नवीन नाही. हा सगळा प्रकार 'प्रेक्षक समजून घेतील' किंवा 'त्यांना काही कळणार नाही' अशा भावनेने प्रेक्षकांना कायमच गृहीत धरले जाते.
सामान्य प्रेक्षक हा त्याला आवडणारी
मालिका,त्यातील कलाकार यांच्यात भावनिक दृष्ट्या गुंतत जातो. त्यातील पात्रे, कलाकार त्याच्या जवळची माणसे वाटू लागतात. त्यामुळे एखाद्या पात्रांची बराच काळ असणारी अनुपस्थिती मालिका संपल्यावरही जाणवत राहते, कधी उत्सुकतेने तर कधी काळजीपोटी!
अनेकवेळा कलाकारांच्या काही समस्यांमुळे, कधी बिझी शेड्यूल्डमुळे तर कधी भूमिका न आवडल्यामुळे कलाकार मालिका सोडतात हे आजचा सुजाण प्रेक्षक समजू शकतो. परंतू तरीही जर काही कारणास्तव मालिकेच्या ट्रॅक मध्ये, कलाकारांमध्ये जर असे काही बदल होणार असतील तर प्रेक्षकांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना मालिका सुरू होण्याआधी चॅनलने, निर्माता-दिग्दर्शकाने दिली पाहिजे.

No comments:
Post a Comment