Apr 29, 2017
#Facebook and #maths
शाळेत आपले गणित फारच कच्चे होते हे मनातले दुःख जरा कमी करण्यासाठीच बहुतेक फेसबुक
वरच्या वेगवेगळ्या pages वरची
गणिते कोणतेही बक्षिस किंवा मार्क मिळत नसले तरी लोक भल्या मोठ्या उत्साहाने सोडवत बसतात.
#thinkpositive
#beoptimistic
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#bahubali #ipl #zeemarathi
आधे ...
....
....
उधर - बाहुबली देखने
आधे...
.....
......
इधर गये - IPL देखने
आणि उरलेले. .
#झीमराठी बघतायत.
#खुलताकळीखुलेना
#तुझ्यातजीवरंगला
#माझ्यानवर्याचीबायको
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#bahubali #bollywood
जगातील असंख्य प्रश्नांमधील
आज निदान एक प्रश्न तरी सुटला असेल अशी आशा करू या!
हो..
तोच तो...
Correct. ...
"कटप्पाने बाहुबली को....
क्यु बरं मारा"?
#bollywood #bahubali #bahubali2 #craze
Apr 27, 2017
#mumbailocal #announcement #fun
पुढील स्टेशन ठाणे
अगला स्टेशन थाने
Next station Thane
मुंबईत काही मोजके अपवाद वगळता (उदा सायन-शीव) सगळ्या स्टेशन्सची नावे प्रत्येक भाषेत सारखीच असतात. तरीही ही अशी तीन तीन भाषेत अनाऊंसमेन्ट करण्याची आयडीया कोणाची बरे?
#railway #mumbailocal #announcement #justlikethat
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#colgate #advertisement
दहा पैकी नऊ डॉक्टर 'कोलगेट' चा सल्ला देतात.
पण ते दहा(च) डॉक्टर कोण आहेत, कुठे आहेत?
नात्यातले अच्छे दिन
प्रॉब्लेम हा आहे की माणसं एकमेकांच्या विषयी समोरासमोर कमी आणि मनातल्या मनात जास्त बोलतात.
कसे येणार नात्यांमधले 'अच्छे दिन' !
#acchedin #myquotes
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#fun #marathigrammer #oneliner #teatime
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा -
कूर्मगतीने चालणे -> ( कूर्म = कासव )
कपात चहा काठोकाठ भरून तो कप किचन मधुन
माजघरापर्यंत येताना त्यातला चहा किंचितही बशीत सांडू नये म्हणुन आपण दबकत दबकत, हळूहळू ज्या गतीने चालतो त्या गतीला 'कूर्मगतीने चालणे' असे म्हणतात.
#fun #marathigrammer #oneliner
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#vinodkhanna #विनोदखन्ना #sir #rip #sadnews
विनोद खन्ना म्हंटलं की काही गाणी, चित्रपट आपोआपच डोळ्यासमोर येतात.
रुक जाना नहीं तू कहीं हार के
रुक जाना नहीं तू कहीं हार के
काँटों पे चलके मिलेंगे साए बहार के
ओ राही .. ओ राही
This One My All Time Favourite Song.. Actually The list is unending.
And How Can One Forget -
जब कोई बात बिगड़ जाये जब कोई मुश्किल पड जाये तुम देना साथ मेरा, ...
&
लगी आज सावन की फिर वो झड़ी है वही आग सीने में फिर जल पड़ी है कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम ...
ही गाणी आठवताना ती विनोद खन्नांच्या त्यातील अभिनया सकटच आठवतात यातच सगळे काही आले.
May His Soul Rest in peace.
#vinodkhanna #विनोदखन्ना #sir #rip #sadnews
Apr 26, 2017
गाय आधार कार्ड आणि बरंच काही
दत्त दत्त, दत्ताची गाय
गाईचं आधार कार्ड
नाय नाय..
गाईचं दुध!
गाईची पहीली धार
नाय नाय
पहिली आधार कार्ड गाय
#अरेकायचाललयकाय या सदरातून साभार.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 23, 2017
#oneliner #grammer
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा -
कूर्मगतीने चालणे -> ( कूर्म = कासव )
कपात चहा काठोकाठ भरून तो कप किचन मधुन
माजघरापर्यंत येताना त्यातला चहा किंचितही बशीत सांडू नये म्हणुन आपण दबकत दबकत, हळूहळू ज्या गतीने चालतो त्या गतीला 'कूर्मगतीने चालणे' असे म्हणतात.
#fun #marathigrammer #oneliner
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#पुस्तक दिन #bookday
लहानपणचा सगळ्यात कठीण निर्णय!
या तीन पैकी एकच पुस्तक घ्यायचे असेल तर कोणते घ्यायचे?
कठीणच आहे की नाही!
तिन्ही equally प्रिय.
बरं ते पुरवून पुरवून कसे काय वाचायचे तो एक मोठा प्रश्न! कितीही हळूहळू वाचले तरी काही तासात फडशा पडायचा!!
#reading #hobby #champak #thakthak #chandoba
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 20, 2017
Apr 18, 2017
#ipl #cricket #fans
There are 3 types of people in the world.
One, who never like Cricket.
Second, Superfans...who are born.. only to watch Cricket.
And the third one who like to watch cricket only in the last 5 overs. (Like me)
But still there are few ones (again, like me) who are totally confused which stand we should take while watching IPL Cricket. Having Totally blank reaction when any of the IPL Team like Hyderabad, Delhi, Banglore, Kolkata either wins or looses. When to cherish the moment and when to remain sad for loosing match.
Offffff, the other difficult thing to remember is ...which player belongs to which team this year..?
Like for example, Dhoni or Virat..
Okayyy and also not understanding
How many and whyyy soo many matches they are playing before semis???
#ipl #cricket #fans
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#प्रिये
#प्रिये पोस्टला सोशल मिडिया मध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली.
..
...
....
.....
चला, त्यामुळे एक बरं झालं.. वपु, चाणक्यनिती,
पाटील, नाना यांच्या पोस्ट्सना थोडे दिवस का होईना Compulsory सुट्टी मिळाली.
फेसबुक आणि तापमान
रोज फेसबुक उघडलं की झुकरबर्ग नित्य नेमाने सांगतो की आजचं Temperature खुप जास्त high असणार आहे.
अर्थात फेसबुक उघडायच्या आधीच, घराची खिडकी उघडली तरी कळतच की!
चुलीवरचे जेवण
चूलीवर स्वयंपाक करणेच काय पण कपभर चहा करणे देखील सोपे काम नाही. हवेची झुळुक आल्यावर अचानक त्या दिशेने भडकणारी आग कंट्रोल करत त्यावर स्वयंपाक करणे 'खाऊकाम' नाही. क्षणभर जरी लक्ष नसेल तरी त्या आगीची ज्वाळा त्रासदायक ठरू शकते. चुलीवर काम करणार्या बाईच्या हाताला एकही चटका नाही असे चित्र तुम्हाला कधीच दिसणार नाही. जिथे तुमच्या आमच्या सारख्यांच्या सुसज्ज स्वयंपाक घरात उन्हाळ्यात तासभर पण उभे राहणे कठीण तिथे चुलीसमोर बसून स्वयंपाक करणे किती महाकठीण आहे हे लक्षात घ्या.
त्यामुळे 'सो कॉल्ड' खवय्ये लोकांची 'चुलीवरच्या जेवणाची हौस' भागवण्याच्या ट्रेंड साठी गरीब गरजू महिला चार पैशासाठी तासनतास चुलीसमोर झिजतात किंवा झिजवून घेतल्या जातात हे अजिबात बघवत नाही.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
#प्रिये
#प्रिये ..........
....
....
....
....
चहा
Sorry Sorry, आपलं ते हे, काय ते?
पहा........
#प्रिये ..... पहा.....
-
Http://majheviewsanireviews.blogspot.in
मनातलं काही
माणसांची पारख जशी तुमच्या कठीण काळात होते तशीच तुमच्या सुखाच्या काळातही. तुमच्या वाईट क्षणात एखाद्या व्यक्तीने साथ नाही दिली तर समजू शकतो की चल ठिक है, ते दुःख दुरूनही सहन करण्याची त्या व्यक्तीची पात्रता, क्षमता नाही. चल, माफ किया. किंवा मग अशावेळी ते आपल्याला आलेले फाॅरवर्डेड मेसेजेस आठवावेत की देव फक्त चांगल्या माणसांचीच परिक्षा घेतो, किंवा सोन्याचा कस तावुन सुलाखून लागतो वगैरे वगैरे वगैरे. अशा वेळी, असं वाचलं की जरा तरी जरा बरं वाटतं, नाही?
पण सगळ्यात महाभयंकर माणसे ती आहेत जी तुमचे सुख, आनंदही बघु शकत नाहीत. आता मग, क्या करनेका ऐसे लोगोंका भाय!!
मला वाटतं की प्रत्येकाच्याच वाट्याला आलेले हे पॅकेज डिल आहे. Everybody is living between a group of good and bad people, rather well wishers and bad wishers.
अशी खुप उदाहरणं आहेत जेव्हा आपल्या मनातला आनंद ओसंडून वाहत असतो आणि असं वाटतं की घरी येईपर्यंत तो आनंद आपण भरभरून वाटत सुटावा. सगळ्यांनी तो मोकळ्या हातांनी घ्यावा देखील. पाठीवर शाबासकीची थाप पडावी, ऐकणार्याच्या डोळ्यात चमक दिसावी. आणि असं खुप खुप काही. उदाहरणच द्यायचे झाले तर परिक्षेत चांगल्या मार्काने पास झाल्यावर, स्पर्धा जिंकल्यावर, नोकरी, प्रमोशन वगैरे, आणि असं काहीच नसेल तर आपला हक्काचा वाढदिवस तरी. या वाढदिवसाची मात्र गंमत असते हां, आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा हा दिवस. अगदी वर्षातले दिवाळी दसरे सगळे सण जणू या एका दिवसात एकवटतात आपल्यासाठी. मला आठवतंय, लहान असताना मी तीन चार महिने आधीपासूनच दिवस मोजायला सुरवात करायचे की आता वाढदिवसाला अमुक अमुक दिवस उरले वगेरे. अर्थात प्रत्येकाच्याच या भावना असतात लहानपणी.
पण आपल्याला जे वाटते ते तसेच reciprocate होतेच असे नाही, rather बरेचदा होतच नाही. म्हणजे समोरच्याला तुमच्या आनंदात अजिबात ईंटरेस्ट नसतो. अशावेळी मग वा वा, छान, ok, बरं झालं अशा कोरड्या प्रतिक्रिया ऐकताना मग त्यांच्या नजरेत दिसणारी असुया, किंवा 'हं, उसमे कोनसी बडी बात है' टाईप चे विचार न सांगताही आपसूकच कळतात.
अशा माणसांबरोबर जमवुन घेता येत नाही आणि तोडुनही टाकता येत नाही अशी तारेवरची कसरत जेव्हा होते तेव्हा मग समजवावं आपलं आपल्यालाच की हे बंध 'नायलॉनचेच बंध' आहेत! आणि तसंही
हा जो "उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे" वाला जो एॅटीट्युड आहे ना हा रिन पुरताच मर्यादित नाही राहीला आता, माणसामाणसात, नात्यात पण खोलवर रुजलाय तो.
Can't help it for that.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Be Positive and optimistic
पोळी खाताना आपण नेहमी ताटातील पोळीचे छोट्या छोट्या तुकड्याचे घास करतो आणि मग पोळी संपवतो. तसंच काहीसं आपण आपल्या ध्येया बाबतीत व त्यातून मिळणाऱ्या यशा बाबतीत वागावं. लहान सहान गोष्टी celebrate करायला सुरूवात करायला हवी.
पुढचे संपूर्ण वर्ष कसं जाईल किंवा मागचे वर्षे कसे गेले याचा overall विचार करत बसण्यापेक्षा आजचा दिवस किती छान जाईल किंवा आजचा दिवस किती छान होता यावर रोज purposefully विचार करायचा.
कठीण आहे पण ही सवय मनाला लावून घ्यायला हवी.
500 meter rule
500-Metre Cap Rule, Practicality Speaking, Would Not Affect Much to the Fans. You Know, that People Are Ready to Travel 600 Kilometres Far Away till Goa For the Same!
कमाई
पैसे किती कमावले यापेक्षा माणसं किती कमावली हे जास्त महत्वाचे!
पैसे कोणीही कमावू शकतं. त्यात फरक फक्त आकड्यांचाच असतो.
-
http://majheviewsanireviews.blogspot.in
Apr 7, 2017
विमान प्रवास बंदी
खासदार महाशयांवर भारतीय एअरवेजने त्यांच्या विमानप्रवासावर बंदी आणली आहे. पण आंतरराष्ट्रीय एअरवेजने नाही काही...!
मग जर का विमान प्रवास करायचाच्च असेल तर आंतरराष्ट्रीय एअरवेज ही वापरू शकतातच की ते!
उदाहरणार्थ मुंबई-अहमदाबाद व्हाया ऑस्ट्रेलिया. किंवा मुंबई-दिल्ली व्हाया अॅमस्टरडॅम.
का कही?
डॉटर्स आर नॉट अ टेन्शन, डॉटर्स आर लाईक टेन सन
डॉटर्स आर नॉट अ टेन्शन,
डॉटर्स आर लाईक टेन सन
हे असले मेसेजेस लिहीणारे, आणि हे मेसेजेस फाॅरवर्ड करणारे अत्यंत मागासलेल्या विचारांचेच आहेत असे मला वाटते.
मुलगी होणे किती चांगली गोष्ट आहे हे सांगण्यासाठी अजूनही मुलांशीच तुलना करावी लागते यापेक्षा दुर्दैवी काय असेल .
पुणेरी पुणेकर
चितळ्यांच्या श्रीखंडासाठी वगैरे ठिके पण मी ऐकलं की पुण्यात म्हणे कुठेतरी फोडणीची पोळी चांगली मिळते, तिथेही पुणेकर रांगा लावतात.
जातपात आणि डाळ भात
जातपात वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत हो.
शेवटी सगळी माणसे सारखीच असतात.
उदाहरणच द्यायचं झालं तर...
हाॅटेल मध्ये गेल्यावर अर्धा तास तरी मेनू कार्ड परत परत वाचतात आणि काय खावं, काय मागवावं हे सुचलं नाही की सरळ डाळ तडका आणि जीरा राईस किंवा दाल-खिचडी ऑर्डर करतात.
Http://majheviewsanireviews.blogspot.in
Subscribe to:
Posts (Atom)