मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदीर न्यासाला सुरक्षित, विश्वासार्ह व पारदर्शक सेवेसाठी आयएसओ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ही तमाम मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या आयएसओ प्रमाणपत्राचा अर्थ व सविस्तर विश्लेषण महाराष्ट्र टाईम्सने सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत दिले आहे.
श्री सिध्दीविनायक मंदिराचा परिसर दररोजच गर्दीने ओसंडून वाहत असतो तरी कोणत्याही परिस्थितीत मंदिरातील शिस्तबद्धता ढळली जात नाही. एक प्रकारे या आयएसओ प्रमाणपत्राने देवस्थाला दिलेल्या देणग्या, अभिषेक-पूजा आदी नित्य देवधर्मासाठी अर्पण करण्यात आलेली दक्षिणा याचा सदुपयोग होत असल्याची हमीच दिली आहे.
मराठी माणसाची भक्तीपीठे असणार्या पंढरपूर, तुळजापूर आदी इतर देवस्थान न्यासांनी या गोष्टीचा आदर्श जरूर डोळ्यासमोर ठेवावा.

No comments:
Post a Comment