Jul 10, 2015

संवादात प्रगल्भता

मागील काही दिवसात विविध
मराठी मालिकेत संवाद लेखनाच्या दर्जात झालेली सुधारणा अतिशय वाखाणण्याजोगी
आहे. 'दिल दोस्ती..' मधील रेशमा, आशु, कैवल्यचे प्रसंगानुरूप
संवेदनशील
संभाषण असो वा 'होणार सुन....'मधील बेबीआत्या व श्री च्या वादविवादातील सडेतोड प्रखरता! 'जुळून येती ..' मधील नानांचे ज्ञानामृत किंवा अगदी सलग दहा वर्षे गावोगावच्या 'होम मिनिस्टर'शी सुसंगत सुसंवाद साधणाऱ्या आदेश बांदेकरांची संवादकला असो!

संवाद हे
प्रभावी माध्यम आहे. सदैव इंटरनेट व सोशल नेटवर्किंग साइट्स मध्ये गुरफटलेल्या आजच्या पिढीला या सुसंवादाचे आणि प्रगल्भ मराठी भाषेचे महत्त्व व व्याप्ती यामुळे निश्चितच लक्षात येईल. 

No comments:

Post a Comment