Dec 7, 2015
published in today's newspaper
दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान
मुलांसाठी मराठीत
किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या.
परंतु टिव्हीवर
आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम
कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत.
बालविश्वावरील
कार्यक्रम सुरू झाले तर
प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला
टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.
Dec 6, 2015
होणार सुन मी.......!
होणार सुन मी या घरची' या मालिकेत दाखवण्यात आलेल्या बँकेचा कृपया आम्हाला पत्ता देण्यात यावा जिथे बँके कर्मचारी कार्यालयीन वेळेत कितीही वेळ घरगुती चर्चा करू शकतात. अगदी नातेवाईकापासुन ते नवीन चादरी, पडदे इत्यादींच्या खरेदी पर्यंत!
भारतातील अशी कोणती बँके आहे जी अगदी सामसूम आहे आणि अगदी तुरळक कस्टमर्स आहेत आणि जिथे नातेवाईक कधीही येऊन भेटु शकतात. कामाची घाईगडबड तर अजिबात नाही.
आज कोणत्याही बँक किंवा इतर ऑफिस मध्ये अशी परिस्थिती आढळून येत नाही.
कृपया, संबंधित अधिकारी व चॅनेल नी या गोष्टींचा विचार करावा आणि अतार्किक व अवास्तव गोष्टी दाखवणे बंद कराव्यात.
Dec 4, 2015
#बायgoबाय रिव्ह्यू
नमस्कार,
नवनवीन मराठी चित्रपटांच्या भाऊगर्दीत लक्षवेधक व हटके चित्रपट म्हणून नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक विजय पगारे यांच्या 'बाय गो बाय' या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आजच्या काळात स्त्री-पुरूष समानता असली तरी खेडोपाडयात मात्र आजही पुरुषी वर्चस्व आढळून येते. असे असताना बायकांचे वर्चस्व असलेल्या गावाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट म्हणजे खरोखरच विनोदाची व धमाल करमणूकीची भेळ आहे. बैजाक्काच्या सशक्त
भूमिकेत 'निर्मिती सावंत' यांनी आपले अभिनय कलागुण पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत. संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन जातो तो नायक 'नयन जाधव'! आतापर्यंत वेगवेगळ्या नाटक चित्रपटात सहाय्यक व्यक्तीरेखा साकारलेला 'नयन जाधव' यांनी नायक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाचे चौकार, षटकार ठोकले आहेत. त्यांचा विनोदी अभिनय बघताना आजच्या मराठी चित्रपट सृष्टीतील
'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.
Dec 1, 2015
असंवेदनशील वृत्ती
शनिवारी लोकलट्रेन मधे गर्दीत तोल सांभाळू न शकल्यामुळे एका प्रवाशाचा झालेला मृत्यू सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. या प्रवाशाची लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न दाखवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली व त्याची शेवटच्या क्षणापर्यंतची जगण्याची काळजाचे ठोके चुकवणारी धडपडही सर्वानी बघितली. यातील रेल्वे प्रशासनाची चुक किती, काय, पुढील काळात या बाबतीत उपाययोजना काय आहेत हा तर चर्चेचा विषय आहेच परंतु आश्चर्य वाटते ते सहप्रवाशांच्या वृत्तीचे!
ज्या वेळी हा प्रवासी लोकांना मदतीचे आवाहन करत होता, लोकलच्या गर्दीत आत जागा देण्याची विनंती करत होता तेव्हा त्याच वेळी एक सहप्रवासी या प्रसंगाचे चित्रीकरण करत होता.
हा सर्व प्रकार मन विषण्ण करणारा आहे. अशा वेळेचे चित्रीकरण करणार्यांची मानसिकता नक्की काय असते? हा असंवेदनशीलपणा किंवा
अपघातग्रस्त, मृतांसोबत सेल्फी काढण्याचा प्रकार म्हणजे
मानवी भावना बोथट झाल्याचे एक भयंकर उदाहरण आहे.
Nov 30, 2015
व्यक्ती स्वातंत्र्य
नमस्कार,
आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर हा एक आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्स तसेच वाॅट्सप वैयक्तिकच नव्हे तर बरेचदा ऑफिशियल कारणासाठीही वापरले जाते. प्रत्येकाच्या वाॅट्सपवर एकतरी ऑफिशियल
ग्रूप असतोच! त्यामुळे त्याचा सतत वापर होणार ही वस्तूस्थिती आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काही नियम मात्र काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे आहे 'व्यक्तीस्वातंत्र्य' आणि प्रत्येकाची 'स्पेस' जपणे. समोरची व्यक्ती आपला जोडीदार किंवा इतर कोणतीही जवळची नातलग असली तरी तिच्या अपरोक्ष मोबाइल चेक करणे आणि त्यावर सवाल जवाब करणे
हा एकप्रकारचा मनोविकारच आहे. त्याचबरोबर समोरच्याने एखादी गोष्ट 'सांगितली नाही' म्हणजे ती 'लपवली' असा अर्थ काढु नये. कामाच्या गडबडीत किंवा कधीकधी कमी महत्वाची वाटल्यामुळे ती सांगीतली जात नाही हे समजून घ्यायला हवे.
त्याचबरोबर 'पारदर्शकता' आणि 'क्षमाशील पणा' ही तितकाच महत्त्वाचा! 'चुक' ही प्रत्येकाकडून होते; कधी नकळत कधी चुकुन तर कधीकधी चक्क मुद्दाम!! त्यामुळे कधी अशी चुक निदर्शनास आली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करावी.
व.पु काळेंच्या 'पार्टनर' या पुस्तकातील एक
वाकय खुप समर्पक आहे, "नाते नवराबायकोचे असो वा रक्ताचे ते गुलाबाच्या फुलाप्रमाणे असावे. कळी पासून पाकळ्या जितक्या दुरवर फुलतील तितके फुलाचे सौंदर्य अधीक खुलून दिसते".
Nov 28, 2015
स्त्री प्रधान मालिका
प्रत्येक वाहिनीवरील जवळजवळ सर्वच मालिका स्त्री प्रधान असल्या तरी त्यात आजच्या काळातील स्त्रीचे वास्तव दर्शी चित्र खुप कमी दाखवले जाते. त्यातील स्त्री अगदी सौजन्याचा कळस असते किंवा खलनायिका तरी!
महिलावर्ग या मालिका पाहताना त्यातील व्यक्तिरेखांशी स्वतःला रिलेट करतात. त्यात दाखवल्या जाणार्या परिस्थितीची त्या आपल्या घरात सांगड घालतात. परंतू मालिकांमधले विचार घरात रुजवताना वास्तव मात्र निराळे असल्यामुळे घरगुती नात्यांमधे दुरावा निर्माण होतो.
माझ्या लहानपणी आठवणीतील
मालिकांमध्ये एक होती ‘उडान’, आणि दुसरी होती ‘रजनी.’ या मालिकांमधील व्यक्तीरेखांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक मुलीला ‘उडान’मधली हुशार व कर्तृत्ववान
कविता आणि 'रजनी'सारखं खंबीर आणि सडेतोड व्हायचं होतं . त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्या
तुलसी किंवा पार्वती व्हायचं होतं.
आजच्या घडीला समाजातील वाईट चालीरीती व दुष्ट प्रवृत्ती ला तोंड देण्यासाठी गरज आहे स्त्रीला शारीरिक व मानसिक रित्या सशक्त व धीट बनवण्याची!
टीव्ही हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच टिव्ही ची जबाबदारीही मोठी! चांगली किंवा वाईट अशा व्यक्तीरेखा रंगवण्यापेक्षा आजच्या काळात गरज आहे ती खंबीर, सशक्त, सारासार विचार करणारी,
सदसद्विवेक बुद्धीची व न्यायासाठी झगडणारी परंतु त्याचबरोबर आपल्या घराचे घरपण आणि नाती जपणाऱ्या नायिकेची!

सेन्सॉर बोर्ड चा नियम
सेन्सॉर बोर्डाच्या नवीन पत्रकानुसार असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांना कात्री लावली जाणार हा नियम खरोखरच स्वागतार्ह आहे. प्रत्येक काळातील पिढी आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करत असते. त्यामुळे चित्रपटातील भाषा, संवाद, उच्चार यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठी भाषा ही मुळातच खुप प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे. आपल्याला
समृध्द मराठी साहित्याची परंपरा पूर्वापार लाभली आहे. चित्रपट हे प्रेक्षकांसाठी करमणूकीचे माध्यम असले तरी चित्रपट बनवणाऱ्यानी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला लाभलेल्या या मराठी साहित्याच्या खजिन्याचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत तो पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Subscribe to:
Posts (Atom)