होणार सुन मी या घरची' या मालिकेत दाखवण्यात आलेल्या बँकेचा कृपया आम्हाला पत्ता देण्यात यावा जिथे बँके कर्मचारी कार्यालयीन वेळेत कितीही वेळ घरगुती चर्चा करू शकतात. अगदी नातेवाईकापासुन ते नवीन चादरी, पडदे इत्यादींच्या खरेदी पर्यंत!
भारतातील अशी कोणती बँके आहे जी अगदी सामसूम आहे आणि अगदी तुरळक कस्टमर्स आहेत आणि जिथे नातेवाईक कधीही येऊन भेटु शकतात. कामाची घाईगडबड तर अजिबात नाही.
आज कोणत्याही बँक किंवा इतर ऑफिस मध्ये अशी परिस्थिती आढळून येत नाही.
कृपया, संबंधित अधिकारी व चॅनेल नी या गोष्टींचा विचार करावा आणि अतार्किक व अवास्तव गोष्टी दाखवणे बंद कराव्यात.
No comments:
Post a Comment