Feb 18, 2017

आज या ठिकाणी

भाषण करताना कमीत कमी पाच मिनिटे तरी - 'आज या ठिकाणी' - हे न म्हणता भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करायला हवी. Infact हा Criteriaच ठेवायला हवा.

आश्वासनांचा महापुर

आश्वासनांचा महापुर! आश्वासनेच आश्वासने गडे जिकडे तिकडे चोहीकडे!!

प्रचार

निवडणूकीच्या निमित्ताने भाषणे, रॅली, सभा सगळीकडे उत्साहाने आणि पोटतिडकीने सुरू आहे. चांगलीच गोष्ट आहे. परंतू या प्रचार मोहीमेत रोजच्या रोज इतक्या प्रचारपत्रिका घरी येत आहेत. त्यांचं काय करायचं मग?

100days

संपले (की संपवले) एकदाचे 100 डेज! You Never know what happens next या नोट वर संपवलेत. त्यामुळे थोडे दिवसात '100 days दोबारा' ची तयारी ठेवा. #zeemarathi #100days

Feb 15, 2017

मतदान

महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता मतदारांना प्रश्न पडला आहे की मत कोणाला द्यायचे? पक्ष की उमेदवार! !

Feb 14, 2017

मत मनोगत

वाचकांनो, तुमचे मत ,अभिप्राय जाणुन घ्यायला मला नक्की आवडेल. Comments section मध्ये तुमचे मत जरूर कळवा.

सल्ला (गार)

काही लोक जिथे कुठे भेटतील तिथे लगेचच फुकटचे सल्ले द्यायला उत्सुक असतात. नव्हे, त्यांना असे वाटते की तेच सर्व श्रेष्ठज्ञानी आहेत या पृथ्वीतलावरचे आणि समोरची व्यक्ती बालवाडी नापासच! असाच एक अनुभव लेखक चंद्रशेखर गोखले यांनी शेअर केला. तो असा - आपल्याकडे मुंबईत, दमट हवेमुळे चांदीच्या मुर्ती लगेच काळवंडतात... ते बघून त्यांच्या कडे आलेल्या एका स्नेहींचे मन द्रवले व लगेचच त्यांना ज्ञानाचा पाझर फुटला. त्या म्हणाल्या, " कसे दिसतात नाही हे काळवंडलेले देव? कोणी म्हणणार नाही हे चांदीचे आहेत. आता मी सांगते तो उपाय करा बघा. दर आठ दहा दिवसानी सगळे देव उचलायचे आणि कुकर मधे टाकायचे. सोबत लिंबाच्या दोन फोडी कुकर मधे टाकायच्या आणी चांगल्या दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या. मग कुकर उघडा आणि बघाच की सगळे देव कसे चकाचक होतात!!!!!! ...मजाल आहे एक जरी देव काळा राहिला तर, (अगदी विठ्ठल देखील)!" - आता हद्द झाली की नाही? एवढं काॅन्फीडन्टली असा महाभयंकर सल्ला कसा काय कोणी देऊ शकतं, तेही फक्त देव चकचकीत दिसण्यासाठी? देवा, तुच वाचव रे अशा लोकांपासून! - प्रज्ञा

चला हवा येऊ द्या

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम कधी रंगतो तर कधी नाही..! पण मध्यंतरी आभाळमाया आणि वादळवाटच्या टायटल साँगने उगाचच गहिवरून डोळे ओलावले. एपिसोड वसुल!! #चलाहवायेऊद्या #zeemarathi Http://majheviewsanireviews.blogspot.in

तुतारी आणि गौरी

पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी शौर्य प्रसंगी तुतारी फुंकली जात असे. आता मात्र ती तुतारी, .. .. .. .. 'अखिल भारतीय सदगुणांची महान प्रतीकृती मीच आहे रे' संघटनेची अध्यक्ष असलेल्या गौरीने, सासुबाईंवर इम्प्रेशन मारणारा डायलॉग म्हटला की ऐकु येते. #kahediyapardes #zeemarathi Https://majheviewsanireviews.blogspot.in - प्रज्ञा

झी झी रं झी

स्टार स्पोर्ट्स की झी मराठी या लढाईत नेहमी झी मराठीच जिंकते.

संवाद

बरेचदा असे होते, की आपण आपल्या काही कामात असतो आणि समोरची व्यक्ती त्याच्या आवडीच्या किंवा त्याच्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयावर बोलायला येते. आपण मात्र कुठेतरी जायच्या गडबडीत असतो किंवा हातातले काम आटपायच्या मनस्थितीत असतो. अशावेळी ना त्या व्यक्तीला टाळू शकत, ना त्याच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करू शकत. आणि मग लक्ष नसतानाही जेव्हा लक्ष असण्याचा आव आणावा लागतो तेव्हा प्रॉब्लेमच होतो. ही परिस्थिती जवळपास सर्वच जण फेस करतात. मग अशा वेळी प्रत्येक जण काही ठराविक प्रतिक्रिया देतात. उदाहरणार्थ - 1. हो ना, अगदी बरोबर आहे तुझं! (समोरच्याने काहीही म्हटले तरी आपण हेच म्हणायचे) 2.अगं/अरे माझ्या घरी पण सेम परिस्थिती, माहीत आहे? काही फरक नाही.( उगाच काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं जाणारं वाक्य) 3. खरय तुझं म्हणणं. पण तुला स्वतः ला काय वाटतय यावर, ते आधी मला सांग.! (आपण समोरच्याच काहीही ऐकलेले नसले, तरी हे वाक्य बिनधास्त ठोकू शकतो) 4. कुणी काही करू दे, आपण चांगलंच वागायचं.! (कोणत्याही situation मध्ये लागु होणारे वाक्य) 5.नको मनावर घेऊ, अजिबात लक्ष देऊ नकोस. आणि आपण कोणाचे वाईट केले आहे का? मग आपलं कशाला वाईट होईल? ( हे 100 पैकी 100 जणांना वाटते. ) आणि सगळ्यात आवडीचा, फेमस असणारा डायलॉग - 6. वातावरणच बघ ना किती खराब आहे. Climateच हल्ली चांगले नाही. ( हे वाक्य आता वर्षभरात कोणत्याही रुतु मध्ये कधीही लागु होते.) What Say! Http://majheviewsanireviews.blogspot.in - प्रज्ञा

फोटोग्राफी

घरगुती फोटो काढताना सहसा आपण बॅकग्राऊंडचा विचार करत नाही. उशा-चादरीचा ढीग रचलेल्या काॅटच्या पुढे, खिडकीला टेकुन-जिथे मागे कपडे वगैरे वाळत घातलेले असतील, किंवा भरगच्च वस्तुंनी ओथंबून वाहत असलेल्या टिव्ही शोकेस च्या बाजुला अशा कोणत्याही ठिकाणी अँगल, फ्रेम वगैरे चा विचार न करता आपण बेधडक फोटो काढतो आणि धपाधप शेअर करत राहतो. त्यात ते फोटो जर आपल्या लेकरांचे, मुलाबाळांचे असतील तर, तर कोण बॅकग्राऊंड वगैरे बघतोय? तेव्हा लक्ष फक्त आपल्या पिल्लांकडे असतं! बरोबर ना? आपल्या माधुरी दीक्षित-नेने पण याला अपवाद नाहीत हां! Celebrity असली तरी काय झालं. आखीर 'मां' तो 'मां' होती है! फोटो काढताना मुलांचे स्माईल महत्वाचे! मागे असलेली असंबद्ध फोटो फ्रेम असो वा पॅरागाॅनची स्लीपर!! क्या फरक पडता है! #madhuridixitnene - Http://majheviewsanireviews.blogspot.in

आश्वासने

आश्वासनांचा महापुर! आश्वासनेच आश्वासने गडे जिकडे तिकडे चोहीकडे!!

आज या ठिकाणी. ..........

भाषण करताना कमीत कमी पाच मिनिटे तरी - 'आज या ठिकाणी' - हे न म्हणता भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करायला हवी. Infact हा Criteriaच ठेवायला हवा.