सलमान खानला सुनावली गेलेली शिक्षा हा सध्या एक राष्ट्रीय पातळीवरील
चर्चेचा विषय झाला आहे.
न्युज चॅनेल्स ते सोशल मिडिया, सर्वत्र सलमानची शिक्षा योग्य की अयोग्य, आता फिल्म इंडस्ट्रीचे काय होणार हा एकच विषय चघळला जात आहे.
ह्या बातमीमुळे देशातील इतर राजकीय घडामोडी, शेतकरी आत्महत्या असो वा नेपाळ भूकंपाने लोकांचे
उध्वस्त झालेले आयुष्य, या सगळ्या गोष्टी आपोआपच दुय्यम स्थानावर गेल्या.
गेली दोन दशके, सलमान खान आपली करमणूक करत आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट जिव्हारी लागणे साहजिकच आहे पण तरीही त्यानेच केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली आहे हे सत्य नाकारता येणार नाही.
भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वच जण समान आहेत ही गौरवास्पद बाब परत एकदा सिद्ध झाली आहे व एक नागरिक म्हणून आपण त्याचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.

No comments:
Post a Comment