Dec 30, 2016
Dec 29, 2016
#दंगल
3 दिवसात #100कोटी असा आकडा ऐकायला मिळतोय #दंगल चित्रपटाचा! तोही फक्त भारतातील कलेक्शनचा!!
#demonitisation मुळे एटिएम समोरच्या रांगा, बॅकेत रोज बघायला मिळणारी तुडुंब गर्दी या पार्श्वभूमीवर भारतीयांनी एक वेळ उपाशी राहून चित्रपट पाहिला आहे की काय असे वाटते. असे अर्थातच नाही.मग दोनच शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात.
* #cashlesseconomy चा पहिला फायदा #dangal चित्रपटाला झाला असं म्हणता येईल.
* किंवा मग सगळ्यांच्या 500-1000 च्या सगळ्या नोटा बदलून झाल्या असतील.
What Say?
-
प्रज्ञा
http://majheviewsanireviews.blogspot.in
#दिव्यांग
2016 च्या जानेवारी महिन्यापासून पंतप्रधान
#मोदी सरांनी अपंगांना '#दिव्यांग' म्हणा असा आदेश दिला. अजुन तरी हा शब्द समाजात रुळलेला नाही, आपलासा झाला नाही. याचे कारण म्हणजे हा शब्द कितीही संस्कृताळलेला असला, वाचायला-म्हणायला चांगला वाटला, त्या मागचा हेतू चांगला असला तरी उगाचच एखाद्याचे र्दुर्दैवी अपंगत्व अधोरेखित केल्यासारखे वाटते.
आपल्या आसपासच्या एखाद्याला मनातल्या मनात जरी 'दिव्यांग' म्हंटले तरी काळजाचा ठोका चुकतो.
आपल्यातीलच तर आहेत की हे सगळे, फक्त काही शरीराने अधु असतात, काही बुध्दीने तर काही सदसद्विवेक बुद्धीने!!
-
प्रज्ञा
Subscribe to:
Posts (Atom)