Oct 29, 2015

परिक्षकाचे परिक्षण

झी मराठी वरील 'फू बाई फू' आणि
कलर्स मराठी वरीलच 'कॉमेडी ऐक्सप्रेस विदाऊट टिकीट फुल टाईमपास'च्या धर्तीवर सुरू झालेला
'काॅमेडीची बुलेटट्रेन' हा  विनोदाचा कार्यक्रम
दर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता सादर केला जातो. यातील परिक्षकाचे काम बघणारे मकरंद अनासपुरे आणि रेणुका शहाणे यांचे परिक्षण खटकते.
प्रत्येक कलाकारांच्या विनोद सादरीकरणावर त्यांची एकसमान आणि सर्व साधारण प्रतिक्रिया असते. सादर केलेल्या विनोदी
कलाकृतींमधील कलाकारांची
देहबोली, अभिनय, हावभाव, ऊच्चार, संवादफेक,  आवाजातील उतारचढाव व त्याच बरोबर त्रुटींचे विवेचन करणे असे सर्वागीण परिक्षण करणे परिक्षकाकडून अपेक्षित असते. मात्र या कार्यक्रमातील जजेस कडून  सरसकट सगळ्या कलाकारांना दिलेली  समान प्रतिक्रिया दिली जाते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही विनोदी अभिनय न केलेल्या रेणुका शहाणे या विनोदी कार्यक्रमात 'जज' असणे हेच सुसंगत वाटत नाही.

Oct 17, 2015

उत्सव नात्यांचा?!?!

झी मराठी वाहिनीची टॅग लाईन 'उत्सव नात्यांचा' अशी असली तरी त्या वरील बर्‍याच मालिका ' 'उत्सव खोट्याचा' या धर्तीवर सुरू आहेत.

'का रे दुरावा'  या मालिकेतील जय आदिती नोकरी मिळवण्यासाठी व नंतर ती टिकवून ठेवण्यासाठी खोटेपणाची परिसीमा गाठत आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी होतकरू लोकांना
नोकरी मिळण्याची एवढी देखील वानवा नाही.

'दिल दोस्ती.. ' मध्ये रेशमा तिच्या वैवाहिक जीवनात निर्माण झालेला प्रॉब्लेम आई वडिलांपासून लपवण्यासाठी रोज सर्रास खोटे बोलत आहे.

'नांदा सौख्य भरे' मध्ये ललिता जहागीरदारही तिच्या श्रीमंतीच्या देखाव्यासाठी खोटे बोलत आहे तर 'होणार सून ...' मध्ये ही कधी श्री-जान्हवी तर कधी पिंट्या कथेची गरज म्हणून वेगवेगळ्या कारणांमुळे खोट्याचा आधार घेत आहेत.

दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम आहे व त्यावरील दाखविण्यात आलेल्या गोष्टींचे अनुकरण सहजपणे केले जाते म त्यामुळे
करमणूक व मनोरंजन करताना सामाजिक जाणिवा व जबाबदारीची भावना
जागृत ठेवणे हे लेखक-दिग्दर्शकाचे कर्तव्य आहे.


Oct 8, 2015

अशैक्षणिक कामातून मुक्त

शिक्षकांवरील अशैक्षणिक  कामांचा भार कमी करण्याबाबतची शिक्षण सचिव नंदकुमार यांची घोषणा स्वागतार्ह आहे.
शिक्षकी पेशाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य हे आजचा विद्यार्थी व उद्याचा सुजाण नागरिक घडवणे हेच आहे.
या घोषणेची अंमलबजावणी झाली तर शिक्षकांना त्यांच्या वर्गाची व पर्यायाने शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करता येईल.
त्याच बरोबर
शैक्षणिक वर्षांतील नियोजित अभ्यासक्रम शिकवण्याव्यतिरिक्त
विद्यार्थ्याच्या अभ्यासेतर कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या
सर्वांगीण विकासासाठीही वेळ देता येईल.

Oct 7, 2015

कथेत पाणी की पाणचट कथा

सध्या बर्‍याच टिव्ही मालिकांमध्ये चक्क वेळ काढूपणा सुरू आहे. 'जय मल्हार' मालिकेत महिने लोटले तरी बानुम्हाळसेला गत जन्माची आठवण होत नाही. 'होणार सुन...' मध्ये तर जान्हवी खरोखरच नऊ महिने घेईल असे दिसतेय. 'जुळून येती...' मध्ये तर कथा पटकथेचा लवलेशही उरला नाही. जे कथानक घेऊन ही मालिका सुरू झाली होती ते मागच्या वर्षीच पूर्ण झाले होते.
त्या नंतर उगाचच पाणी घालून नवनवीन ट्रॅक आणले जात आहेत. 'दिल दोस्ती...' मध्ये देखील हीच परिस्थिती! सुरवातीच्या काही भागातील खुमासदार
विनोदाचा ताजेपणा हरवत चालला आहे. 'रूंजी', 'पुढचं पाऊल', 'माझे मन तुझे झाले' या मालिकांचीही तीच परिस्थिती!

त्यातल्या त्यात नुकत्याच सुरू झालेल्या 'अस्स सासर सुरेख बाई' व 'नांदा सौख्य भरे'
सध्या तरी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहेत. मुळ कथेत पाणी न घालता वेळीच या संपवल्या तर आठवणीतील अजरामर मालिकेत यांची वर्णी नक्की च लागेल.