Mar 27, 2015

दिल दोस्ती. ...

नमस्कार,

मराठी मालिकांच्या विश्वात कायम काही तरी नवीन आणि दर्जेदार कथा देणार्‍या झी मराठी वाहिनीवरून ' दिल दोस्ती दुनियादारी ’
ही ‘फ्रेश’ विषयावरची मालिका सुरू झाली आहे. विषयासोबतच यात नाविन्य आहे ते यातील कलाकारांचं. मालिकेत दाखवण्यात आलेली मैत्री, आपुलकी या सोबतच अडथळे,आव्हाने, संघर्ष सारे काही उल्लेखनीय आहे.

'नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट' सांगणारी आजच्या तरूणाईची युथफुल मालिका त्यांच्याच भाषेत मांडणारी परंतु सर्व प्रेक्षकांना आवडेल अशीच आहे. 

मोबाईलसाठी लाॅकर

आज मोबाईल सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचा वापर बंद करणे तर अशक्य आहे परंतु त्याचबरोबर मोबाईलचा काॅपी साठी होणारा गैरवापर टाळणेही गरजेचे आहे.

त्यामुळे काॅलेज व्यवस्थापनाने याबाबत लाॅकरसिस्टीम सारखी कायम स्वरूपी उपाय योजना  अमलात आणली
पाहिजे. विद्यार्थ्यांना
लायब्ररी व इतर सुविधांप्रमाणे वार्षिक फी आकारून लाॅकर देण्यात आले तर ते सुरक्षेच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल व फक्त परिक्षाच नव्हे तर रोजच लेक्चर्सच्या वेळी मोबाईल लाॅकर मध्ये ठेवण्याचा नियम करता येईल जेणेकरून विद्यार्थी मोबाईल मध्ये कमी आणि अभ्यासात जास्त लक्ष देतील.

Mar 21, 2015

मालिकांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव



झी टीव्ही वर सुरु असलेली 'का रे दुरावा' ही मालिका हळूहळू कथानकाच्या मुळ मुद्द्यावर पकड घेत आहे. मालिकांमधील व्यक्तीरेखांना साजेसा चपखल अभिनय करणारे कलाकार ही देखील एक जमेची बाजू आहे.

मात्र मागच्या आठवड्यात प्रक्षेपित करण्यात आलेल्या भागात एकच खटकणारी गोष्ट म्हणजे आदिती रजेवर असताना फक्त तिच्या  पेन ड्राईव्ह वर असणारा महत्त्वाचा डेटा  घेण्यासाठी कंपनीचा बाॅस घरी येतो. हे न पटण्याजोगे आहे कारण आदिती
पेन ड्राईव्ह वरील फाईल इ मेल वर अटॅच करून ऑफिस मध्ये पाठवू शकत होती.
त्यासाठी बाॅस ला घरी येण्याची काहीच
गरज नव्हती. ही निव्वळ
कथानकाची गरज होती असे म्हटले तरी
मराठी मालिकांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान व संगणकीय माहितीचा अभाव वारंवार दिसून येतो.