Mar 8, 2017
Best of luck to SSC HSC
SSC HSC च्या परिक्षा सुलु झाल्या आहेत.
परीक्षेला बसलेल्यांना नम्र विनंती पेपरात btw,vl,gm,2day,u,b4 असे शॉर्टकट वापरू नका..
तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला बसलायत WhatsAppच्या परीक्षेला नाही...
happy women's day महिला दिनाच्या शुभेच्छा
महिलांना फक्त Chat आणि Chatting ह्या दोनच गोष्टी आवडतात असा लोकांचा (गैर) समज आहे बहुतेक. कारण ठाण्यात आज प्रशांत काॅर्नर आणि अजुनही काही ठिकाणी पाणीपुरी, शेवपुरी वर 50% डिस्काउंट आहे.
फोटोचा आल्बम
कोणताही जुना फोटोंचा आल्बम पाहताना त्या फोटोत आपण स्वतः आणि त्यात आपल्या बरोबर असलेले बाकीचेही अजागळ का वाटतात!
बदल हवाच
आजच्या काळातील परिस्थिती पाहता शालेय अभ्यासक्रमात असलेले वीस मार्कांचे नागरिकशास्त्र आता शंभर मार्कांचे करायला हवे असे वाटते.
महिला दिन शुभेच्छा happy women's day
Zमहिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आज जर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला की माग तुला काय हवे ते तर माझं ठरलय काय मागायचे ते. -
आज या महिला दिनाच्या निमित्ताने केवळ
मुलगी नको म्हणून अवैधरीत्या गर्भपात करण्याचीही तयारी असणार्यांना, असे न करण्याची उदंड सद्बुद्धी देवो आणि गावखेड्यात, आदिवासी पाड्यात पोटभर अन्न व अंगभर कपड्यासाठी हाल सहन करणार्या महिलांना त्यांच्या बेसिक गरजा पुर्ण होवोत, हीच आजच्या दिवशी अगदी पोटतिडकीने मनापासुन देवाजवळ केलेली प्रार्थना
.
Subscribe to:
Posts (Atom)