Jan 23, 2017

हम बेवफ़ा हरगिज़ न थे .....

हम बेवफ़ा हरगिज़ न थे पर हम वफ़ा कर ना सके हमको मिली उसकी सजा हम जो ख़ता कर ना सके धर्मेंद्रवर चित्रीत करण्यात आलेले हे खरंतर खुप श्रवणीय गाणे! शब्द ही छान आहेत. पण बॅकग्राऊंडला 'झिंगालाला हं झिंगालाला हं भर्र...भर्र...' हे म्युझिक का बरे दिले असेल ते मात्र कळले नाही. http://majheviewsanireviews.blogspot.in

#veenaworld आवरा रे त्या जाहिराती

"सकाळी लवकर उठायला जमेल ना?????" . . वीणा वर्ल्ड घरगुती शाकाहारी जेवणाबरोबरच एक 24 तास कंपनी देणारा आणि टोमणे मारणारा सेक्रेटरी कम पर्सनल टुर कोऑर्डीनेटर पण हनीमून पॅकेज मध्ये फ्री देतात, आणि ते पण भरघोस डिस्काउंट देऊन! #काहेदियापरदेस #veenaworld #आवरारेत्याजाहिराती - प्रज्ञा Http://majheviewsanireviews.blogspot.in

विकता का उत्तर

माझी अडीच वर्षाची 'तेजस्वी' या चित्रातील CPU, Monitor, keyboard हे सगळे पार्टस् दाखवते. पण आज तिने विचारले की .... या सगळ्यांत काँप्युटर कुठेय !!!!!!!!!

तुतारी

पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी शौर्य प्रसंगी तुतारी फुंकली जात असे. आता मात्र ती तुतारी, .. .. .. .. 'अखिल भारतीय सदगुणांची महान प्रतीकृती मीच आहे रे' संघटनेची अध्यक्ष असलेल्या गौरीने, सासुबाईंवर इम्प्रेशन मारणारा डायलॉग म्हटला की ऐकु येते. Https://majheviewsanireviews.blogspot.in - प्रज्ञा

Jan 1, 2017

तुमचेही मत महत्वाचे

तुम्ही सगळे माझ्या घराबाहेर च्या कुटुंबातील सदस्यच आहात. म्हणून एक लिंक तुमच्या बरोबर शेअर करतेय. स्पर्धा परीक्षा या आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. माझ्या लहानग्या चिमणीनेही भाग घेतला आहे एका गोड स्पर्धेत! तुम्ही या लिंक वर क्लिक करा आणि तुमचे मत जरूर द्या. 'Tejasvi ' has participated in 'Cutest Baby' competition. Please click on the link below to give your precious vote to her. http://www.parentingnation.in/baby-photo-contest-india/Babyname_Tejasvi_Pandit_307133

Give Your Vote too

As you all have become my extended family, sharing something with you all - My Daughter, 'Tejasvi ' has participated in 'Cutest Baby' competition. Please click on the link below to give your precious vote to her. http://www.parentingnation.in/baby-photo-contest-india/Babyname_Tejasvi_Pandit_307133

मोलाचा आशिर्वाद

आज चालता चालता लेकीने एका अनोळखी वयस्कर बाईला 'आssssज्ज्जी' अशी हाक मारली. तिने वळून पाहिलं. अचानक अशी हाक ऐकुन तिला झालेला आनंद तिच्या नजरेत दिसत होता. थांबुन तिने फक्त लेकीच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढे निघून गेली. मग परत एकदा जाणवलं की ज्यांच्या पुढे वाकता येईल, ज्यांच्या थरथरत्या हातांचा, मायेचा, आशिर्वादपर स्पर्श मस्तकाला होईल अशी वडीलधारी माणसं आयुष्यात असणं ही प्रत्येकाच्याच बाबतीत किती भाग्याची गोष्ट आहे! - प्रज्ञा

शुभेच्छा

कोणालाही कमी न लेखता, उणीवा न काढता, असलेल्या श्रीमंतीचा बडेजाव न करता किंवा वाट्याला आलेल्या गरीबीने खचून न जाता जगायला शिकलो ना, तर नववर्षातील येणारा प्रत्येक दिवस सगळ्यांना छानच जाईल. कारण, "पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे अधिक महत्वाचे असतात"....! त्यामुळे तुमच्याकडच्या समृद्ध अनुभवाने इतरांनाही जगायला शिकवा. #happynewyear #नववर्षाच्या शुभेच्छा - प्रज्ञा