Jul 30, 2018

फोडणीचा भात

रात्री उरलेल्या भाताचं काय करायचं याच्या असंख्य रेसिपीज वेगवेगळ्या चॅनलवर, वर्तमानपत्राच्या काॅलम्स मध्ये येत राहतात. शिळ्या भाताचे कटलेट, पॅटिस इथपासून ते भाताची शेवचकली कशी पाडावी इथपर्यंत! पण ते फक्त वाचण्याबघण्या पर्यंतच मर्यादित असतं! सगळ्या रेसिपीजमध्ये जिकतं कोण तर फक्त आणि फक्त फोडणीचा भातच! तेलाच्या खमंग फोडणीत बारीक चिरलेला लसूण खरपूस तळायचा आणि मग भरपूर कोथिंबीर पेरून ताटलीत ओतल्यावर ( सर्व्ह केल्यावर म्हणा हवंतर ) तयार फोडणीच्या भातात तो शोधुन वेचुन स्वाहा करायचा. याला दुसरं बेटर ऑप्शन काय असणार बरं! आमच्या एका ओळखीच्या घरी, भाताच्या अक्षरशः पाव पट तेलात हा भात परततात. त्यांच्याकडच्या लोकांनी त्याला तळलेला भात असंच नाव ठेवलंय! आता हा फोडणीचा भात कशाबरोबर खायचा हे ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे. आम्हाला तर चहा बरोबर पण पळतो. वरकरणी सोपा पदार्थ वाटत असला तरी प्रत्येकाच्या हातचा चांगला होईलच असं अजिबात नाही! स्कीलवर्क आहे हे ही! Afterall Cooking is an Art and The Secret Ingredient is 'Love'

आयुष्य

आयुष्य फक्त दोन गोष्टींमुळे काँम्प्लिकेटेड होतं. एक, कठीण असणाऱ्या गोष्टी फार सोप्या समजुन करायला जाणं; आणि दोन, खरोखर सोप्याच असणाऱ्या गोष्टी कठीण समजून अर्धवट सोडून देणं!

Aug 9, 2017

#Thedramacompany

काल चॅनेल सर्फ करता करता सोनी टिव्ही वर 'द ड्रामा कंपनी' हा टुकार काॅमेडी शो पाहिला. मिथुन चक्रवर्ती 'जज' आणि कृष्णा, सुदेश, अली असगर व बाकी इतर फ्लाॅप/हिट शोज मधले वेचलेले कलाकार. आणि हा. . सैराट मधला तानाजी. हा सगळा संच घेऊन काॅमेडी करण्याचा दिनवाणा, केविलवाणा आणि वैतागवाणा प्रयत्न चालू होता. त्यात कसलेसे प्रमोशन करायला गोहर खान आलेली. ( #bigboss7 ). या कार्यक्रमाचा #trp सांगण्याएवढाही नाही आणि तो कधी उंचावणारही नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही इतका त्यातील काॅमेडीचा दर्जा सुमार आहे. पण शो च्या शेवटी प्रमोशनसाठी आलेली #गोहर म्हणाली की "लवकरच हा भारतातला नंबर वन शो होणार आहे". ( हाच एक हशा पिकवणारा डायलॉग म्हणायला हरकत नाही ) .. .. .. याला म्हणतात, 'उंदराला मांजर साक्ष'. #thedramacompany #comedyshow #trp #sonytv Http://majheviewsanireviews.blogspot.in

व्यक्ती तितक्या प्रकृती

एक ओळखीचं कुटुंब आहे. त्यांना राहतं घर विकून नवीन घर घ्यायचं आहे. राहतं घर आई आणि मुलगा दोघांच्या नावावर आहे. पण मुलगा म्हणतो की हे घर विकून नवीन घर जे घेईन त्यात मात्र आईचे नाव नकोय मला. कारण का? .. तर तो म्हणतो "आईचे वय आता 70 आहे. म्हणजे ती काय जास्त दिवस नाही आता. उद्या तिचे बरंवाईट झालं तर बहीण भाऊ हिस्सा मागायला येतील. कोणी सांगीतले झंझट करायला. So being on safer and better side, नवीन घराच्या मालकी पत्रावर मी आईचे नाव लावणारच नाही." .. याला व्यवहार चातुर्य म्हणायचं की मनाचा कठोरपणा? Practical असावं माणसाने, पण इतके? अरे माणसा, तुझ्या तरी आयुष्याची गॅरेंटी कुठेय? देव काय वरती वयाच्या sequence ने बोलवत नाही. #feelings #relations #family #professionalism #profitandloss #selfishness #toomuchpracticallife

स्वातंत्र्य

एकटेपणा आणि स्वातंत्र्य यात फार फरक आहे. एकटं राहणारी सगळी माणसे स्वतंत्र असतातच असे नाही. या उलट, काही व्यक्ती कितीही लोकांच्या गराड्यात असल्या तरी स्वातंत्र्य उपभोगू शकतात. #lifeispuzzle #liveit #thoughts

कालिकाई मनोकामना - पत्र स्पर्धा

*पत्रस्पर्धा* अलीकडची कित्येक वर्ष आपण मंडळी एकमेकांना पत्र लिहीनासेच झालो आहोत. पत्र हा विषयच आपल्या आयुष्यातून बाद झाला आहे. या टेक्नोसॅव्ही दुनियेला थोडंसं मागे टाकून आपण काही वर्ष मागे जाण्याचा प्रयत्न करूया. *'दिल की कलम से'* या सदराअंतर्गत आपण आपल्या भावना, काही न सांगितलेल्या गोष्टी, गैरसमजामुळे अर्धवट राहिलेलं संभाषण, कबुल न करता आलेल्या चुका त्या-त्या व्यक्तीला पोचविण्याचा प्रयत्न करूया. मग ती व्यक्ती आपली प्रेयसी/प्रियकर, आई- वडील, भाऊ-बहिण, किंवा किंचित ओळख असलेली व्यक्ती सुद्धा असू शकते. चला तर मग ‘लिहिते व्हा’. तुम्ही लिहिलेले पत्र ‘कालिकाई मनोकामना’ मासिकात तुमच्या नावाने प्रसिद्ध केले जाईल. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू. नोट : शब्दसंख्या ३५० ते ४०० मॅटर पाठवण्यासाठी पत्ता- कालिकाई मिडिया प्रा. लि. १०२, श्रीकृष्ण पार्क, राघोबा शंकर पथ, दत्त मंदिर जवळ, चेंदणी, ठाणे (प) ४००६०१ इमेल – kaalikaimanokamna@gmail.com Phone – 9820797848 / 022-25366320 Facebook page – www.facebook.com/manokamnamagazine/ #kaalikaimanokamna #magazine #letterwriting #competition

खाद्य संस्कृती

भारतीय खाद्य संस्कृतीत बाकी राज्यांच्या तुलनेत आसामी खाद्य संस्कृती बद्दल फारसं बोललं, ऐकलं जात नाही. त्यामुळे काहीशी उपेक्षित अशी ही संस्कृती आहे. जेवढा मान, कौतुक पंजाबी , राजस्थानी , महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, बंगाली, गोवन पदार्थाना आहे तेवढं कौतुक आसामच्या वाट्याला आलेले नाही ही कटु सत्य परिस्थिती. याच खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा माझा हा संपूर्ण लेख आणि अजूनही इतर अनेक विषयांवरील रंजक लेख वाचा या महिन्यातील कालिकाई मनोकामना मासिकात. - #kaalikaimanokamana #magazine #marathi #aasam #foodculture #goodfood #myhobby